
अनेकदा प्रेमामध्ये सर्व काही सुरळीत सुरू असतं, मात्र एखादी छोटी-मोठी गोष्ट घडते आणि अचानक प्रेमसंबंधांमध्ये दुरावा निर्माण होतो. त्यानंतर तुमची प्रेयसी एवढी नाराज होते की ती तुमच्याशी बोलणं तर दूर पण तुम्हाला व्हाट्सअॅपला देखील ब्लॉक करते.तीने जर तुम्हाला ब्लॉक केलं तर सहाजिकच तुम्ही अस्वस्थ होता. नाराज होता, खाण्या-पिण्यात कशातच तुमचं लक्ष लागत नाही. तुम्ही दिवस रात्र तिच्या कॉल किंवा मेसेजची वाट पाहाता. मात्र तरी देखील तीचा मेसेज तुम्हाला येत नाही.
ज्योतिषशास्त्रानुसार अनेकदा तुमच्या कुंडलीमध्ये असलेली ग्रहांची स्थिती आणि काही प्रमाणात नकारात्मक ऊर्जा तुमच्या नात्यांमध्ये अडचण निर्माण करते. जर तुम्हालाही असाच अनुभव आला असेल, तुम्हालाही तुमच्या गर्लफ्रेंडने ब्लॉक केलं असेल तर टेन्शन घेऊ नका, त्यासाठी लाल किताबमध्ये काही सोपे उपाय सांगितल आहेत, अशी मान्यता आहे की, जर तुम्ही हे उपाय केले तर तुमच्या नात्यामध्ये जो दुरावा निर्माण झाला आहे, तो दूर होऊ शकतो, पुन्हा एकदा तुमचं नातं सुरळीत होऊ शकतं, तुमच्या गर्लफ्रेंडचा तुम्हाला स्वत:हून कॉल येऊ शकतो, जाणून घेऊयात या उपयांबाबत
दररोज सकाळी कापूर लावा
आंघोळ केल्यानंतर दररोज सकाळी- तुमच्या देवघरासमोर कापूर लावा, यामुळे घरातील नकारात्मक शक्तिंचा नाश होतो. त्यासोबतच नात्यामध्ये निर्माण झालेला दुरावा देखील दूर होतो.
मंगळवारी हनुमानाला शेंदूर आर्पण करा
मंगळवारच्या दिवशी हनुमानाला शेंदूर अर्पण करावा, तसेच एक लाल फूल देखील वाहावे, त्यामुळे तुमचं मन शांत राहील आणि तुम्हाला तुमच्या प्रेमात देखील यश मिळेल.
शुक्रवारच्या दिवशी लाल गुलाबावर तुमचं आणि तुमच्या प्रेयसीचं नावं लिहून ते गुलाब वाहात्या पाण्यात सोडून द्या, लात किताबनुसार असं केल्यास नात्यातील दुरावा दूर होतो, प्रेमातील अडथळे दूर होऊन नात्यामध्ये गोडवा निर्माण होतो,लाल किताबमध्ये असं देखील सांगितलं आहे की, गुलाबी रंग हा प्रेमाचं प्रतिक असंत त्यामुळे तुमच्या बेडरूमचे पडदे आणि रंग हा गुलाबी ठेवल्यास त्याचा फायदा तुम्हाला तुमच्या प्रेमासाठी होऊ शकतो.
( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)