Holi 2024 : या वर्षी किती तारखेला होणार होलिका दहन, मुहूर्त आणि पूजा विधी

Holi 2024 Date हिंदू धर्मानुसार होलिका दहन हे वाईटावर चांगल्याच्या विजयाचे प्रतीक मानले जाते. होळी हा सांस्कृतिक, धार्मिक आणि पारंपारिक सण आहे. त्याचा वेगळा उत्सव आणि उत्साह भारतभर पाहायला मिळतो. यावर्षी हा सण किती तारखेला साजरा होणार ते जाणून घेऊया.

Holi 2024 : या वर्षी किती तारखेला होणार होलिका दहन, मुहूर्त आणि पूजा विधी
होलिका दहन
Image Credit source: Social Media
| Updated on: Feb 16, 2024 | 9:55 AM

मुंबई : होळी हा हिंदू धर्माचा प्रमुख सण आहे. वसंताचा महिना सुरू होताच होळीची (Holi 2024) प्रतीक्षा सुरू होते. होलिका दहन फाल्गुन शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेच्या रात्री केले जाते आणि दुसऱ्या दिवशी होळी साजरी केली जाते. हिंदू धर्मानुसार होलिका दहन हे वाईटावर चांगल्याच्या विजयाचे प्रतीक मानले जाते. होळी हा सांस्कृतिक, धार्मिक आणि पारंपारिक सण आहे. त्याचा वेगळा उत्सव आणि उत्साह भारतभर पाहायला मिळतो. होळी हा बंधुभाव, परस्पर प्रेम आणि सद्भावनेचा सण आहे. या दिवशी लोक एकमेकांना रंगात भिजवतात. घरोघरी गाठ्या आणि पदार्थ तयार केले जातात. लोक एकमेकांच्या घरी जाऊन रंग लावतात आणि होळीच्या शुभेच्छा देतात. या वर्षी होळीची नेमकी तारीख आणि शुभ मुहूर्त कोणता हे जाणून घेऊया.

होळी पौर्णिमा तारीख

फाल्गुन पौर्णिमेला होलिका दहन आणि दुसऱ्या दिवशी होळी साजरी केली जाते. यावर्षी फाल्गुन पौर्णिमा तिथी 24 मार्च रोजी सकाळी 09:54 वाजता सुरू होईल. ही तारीख दुसऱ्या दिवशी म्हणजेच 25 मार्च रोजी दुपारी 12:29 वाजता संपेल.

होलिका दहन 2024 मुहूर्त

24 मार्च रोजी होलिका दहन आहे. या दिवशी होलिका दहनाचा शुभ मुहूर्त 11:13 ते 12:27 पर्यंत आहे. अशा परिस्थितीत, तुम्हाला होलिका दहनासाठी एकूण 1 तास 14 मिनिटे वेळ मिळेल.

होळी 2024 कधी आहे?

होलिकेच्या दुसऱ्या दिवशी होळी साजरी केली जाते, म्हणून यावर्षी होळी 25 मार्च रोजी आहे. या दिवशी देशभरात मोठ्या थाटामाटात होळी साजरी केली जाणार आहे.

होलिका दहन पूजेची पद्धत

  • होलिका दहनाची पूजा करण्यासाठी प्रथम स्नान करणे आवश्यक आहे.
  • आंघोळीनंतर होलिकेच्या पूजेच्या ठिकाणी उत्तर किंवा पूर्वेकडे तोंड करून बसावे.
  • पूजेसाठी गाईच्या शेणापासून होलिका आणि प्रल्हादाच्या मूर्ती बनवाव्यात.
  • पूजा साहित्यासाठी हळद-कुंकू, फुले, फुलांच्या माळा, कच्चा कापूस, गूळ, अख्खी हळद, मूग, बताशा, नारळ, ५ ते ७ प्रकारची धान्ये आणि पाणी एका भांड्यात ठेवावे.
  • यानंतर पूर्ण विधीपूर्वक या सर्व पूजा साहित्यासह पूजा करावी. पेढे आणि फळे अर्पण करा.
  • होलिकेची पूजा करण्यासोबतच विधीनुसार भगवान नरसिंहाची पूजा करा आणि नंतर होलिकेभोवती सात वेळा प्रदक्षिणा घाला.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)