व्रत
व्रत हे धर्माचे साधन मानले जाते. जगातील सर्व धर्मांनी कोणत्या ना कोणत्या स्वरूपात व्रतचा स्वीकार केला आहे. व्रताचे पालन केल्याने पापांचा नाश होतो, पुण्य प्राप्ती होते, शरीर आणि मन शुद्ध होते, इच्छित फलप्राप्ती आणि शांती, सिद्धी प्राप्त होते, अशी धार्मिक मान्यता आहे.
भानू सप्तमीच्या दिवशी अशाप्रकारे करा सूर्यदेवाची पूजा, करियरमध्ये मिळेल अपार यश
भानु सप्तमीच्या दिवशी सूर्यदेवाच्या उपासनेला विशेष महत्त्व आहे. या दिवशी सूर्यदेवाला अर्घ्य दिल्याने शुभ फल प्राप्त होते. या दिवशी सूर्यदेवाला जल अर्पण करताना त्यात काळे तीळ टाकावेत. तसेच पिवळी फुले व जवा अर्पण करा. यानंतर दिवा लावून आरती करावी. सूर्यदेवाची चालीसा आणि सूर्यकवच पठण करा. आणि शेवटी आनंद आणि समृद्धीची इच्छा आणि कामना करा.
- Nitish Gadge
- Updated on: Mar 2, 2024
- 9:45 am
Mahashivratri 2024 : महादेवाच्या या पाच अवतारांबद्दल फार कमी लोकांना आहे माहिती, अशी आहे पौराणिक कथा
भगवान शिवाच्या पाच अवतारांपैकी सद्योजात अवतार हा पहिला अवतार आहे. त्या कल्पात ब्रह्मदेवाचे ध्यान करत असताना ब्रह्माजींच्या कुशीतून गोरा लोहितकुमार जन्माला आला. तेव्हा सद्योजात शिवाचा अवतार आहे हे जाणून ब्रह्माजी आनंदी झाले आणि पुन्हा पुन्हा त्यांचा विचार करू लागले. त्यानंतर ब्रह्माजींच्या चिंतनातून परब्रह्मरूपातील प्रसिद्ध ज्ञानीकुमारांचा जन्म झाला.
- Nitish Gadge
- Updated on: Mar 6, 2024
- 11:03 am
मार्च महिन्याच्या पहिल्या दिवशी अवश्य करा हे उपाय, आर्थिक चणचण होईल दूर
ज्योतिषशास्त्रात शुक्रवार हा माता लक्ष्मीचा दिवस म्हणून ओळखला जातो. या दिवशी माता लक्ष्मीची पूजा केल्याने आर्थिस समस्या दूर होतात अशी धार्मिक मान्यता आहे. आज मार्च महिन्याचा पहिला दिवस देखील शुक्रवार पासूनच सुरू होत आहे. या दिवशी काही विशिष्ट उपाय केल्यास आर्थिक चणचण दूर होण्यास मदत होईल.
- Nitish Gadge
- Updated on: Mar 1, 2024
- 9:03 am
Yashoda Jayanti 2024 : मुलांच्या सुख समृद्धीसाठी अवश्य करा हे व्रत, असे आहे यशोदा जयंतीचे महत्त्व
हे व्रत मातांसाठी खूप खास मानले जाते. हे व्रत आईच्या मुलावरील प्रेमाचे प्रतीक आहे. या दिवशी माता आपल्या मुलांच्या दीर्घायुष्यासाठी आणि आनंदी आयुष्यासाठी उपवास करतात. या दिवशी माता यशोदा आणि भगवान श्रीकृष्णाच्या बालस्वरूपाची पूजा करून उपवास केल्यास संतानप्राप्तीची मनोकामना लवकर पूर्ण होते, अशी श्रद्धा आहे.
- Nitish Gadge
- Updated on: Mar 1, 2024
- 8:29 am
Gudi Padwa 2024 : यंदा किती तारखेला साजरा होणार गुढी पाडवा? अशाप्रकारे करा गुढीची पूजा
Gudi Padwa रामायण काळात दक्षिण भारत बालीच्या जुलमी राजवटीत होता. सीताजींचा शोध घेत असताना जेव्हा प्रभू राम सुग्रीवाला भेटले तेव्हा त्यांनी श्रीरामांना बालीच्या अत्याचाराची माहिती दिली. त्यानंतर प्रभू रामाने बालीचा वध करून तेथील लोकांना त्याच्या कुशासनातून मुक्त केले. हा दिवस चैत्र प्रतिपदेचा होता असे मानले जाते. म्हणूनच या दिवशी गुढी किंवा विजय पताका फडकवली जाते.
- Nitish Gadge
- Updated on: Apr 4, 2024
- 12:59 pm
Kalashtami 2024 : मार्च महिन्यात या तारखेला साजरी होणार कालाष्टमी, महत्त्व आणि पूजा विधी
कालाष्टमी व्रताच्या दिवशी सकाळी ब्रह्म मुहूर्तावर उठून स्नान करावे. भगवान कालभैरवाचे ध्यान करताना पूजा करावी. स्वच्छ कपडे घालावेत. मंदिराची स्वच्छता करून गंगाजल शिंपडावे. कालभैरवाची मूर्ती लाल रंगाच्या चौरंगावर लाल कापड पसरून स्थापित करावी.
- Nitish Gadge
- Updated on: Feb 27, 2024
- 7:22 pm
यावर्षी किती तारखेला साजरी होणार होळी? पहिल्यांदा कधी साजरा झाला हा रंगांचा उत्सव?
हिरण्यकश्यपू अमरत्वाचे वरदान मिळाल्याने उन्मत्त झाला होता. त्याच्या पोटी भक्त प्रल्हाद जन्माला आला. अत्यंत विष्णुभक्त प्रल्हादाला मारण्यासाठी हिरण्यकश्यपूने आपली बहीण होलिका हिला प्रल्हादाला मांडीवर घेऊन चितेवर बसण्यास सांगितले. तिला अग्नीपासून भय नव्हते. प्रत्यक्षात विष्णूचे नामस्मरण करणारा प्रल्हाद चितेवर जळताना सुखरूप राहिला. पण होलिका मात्र जळून भस्मसात झाली.
- Nitish Gadge
- Updated on: Mar 6, 2024
- 6:18 pm
Mahashivratri 2024 : महादेवाला बेल का वाहतात? अनेकांसाठी नवीन आहे माहिती
पौराणिक कथेनुसार, समुद्रमंथनाच्या वेळी हलहल विष बाहेर पडल्यामुळे, संपूर्ण जगाला त्याची उष्णता सहन करणे अशक्य झाले. देव आणि दानवांनाही त्रास झाला. मग सर्वांनी भगवान शंकराची पूजा केली आणि हलहल विषापासून मुक्त होण्यासाठी मदत मागितली. मग भगवान शिवाने ते हलहल विष प्यायले आणि त्यातून सर्वांना मुक्त केले. विषाची उष्णता इतकी होती की त्याचा प्रभाव कमी झाला नाही..
- Nitish Gadge
- Updated on: Mar 6, 2024
- 11:04 am
300 वर्षानंतर महाशिवरात्रीला जुळून येतोय विशेष योग, पूर्ण होतील सर्व मनोकामना
महाशिवरात्रीला शिवाची उपासना करून आणि सर्वार्थ सिद्धी योगाचे व्रत पाळल्यास मनुष्याला परम यश प्राप्त होते. यावेळी तब्बल 300 वर्षांनंतर महाशिवरात्रीला हा त्रिकोणी योग तयार होणार आहे. या दुर्लभ योग आणि शुभ मुहूर्तावर भगवान शंकराची आराधना केल्याने भक्तांना अपेक्षित फल प्राप्त होते.
- Nitish Gadge
- Updated on: Mar 6, 2024
- 11:05 am
हवन करताना पहिली आहूती वास्तुपूरूषाच्या नावाने का दिली जाते?
मत्स्य पुराणात असे सांगितले आहे की भगवान शिव आणि अंधकासुर नावाच्या राक्षसामध्ये युद्ध झाले होते. त्या वेळी भगवान शंकराच्या घामाचे काही थेंबही पृथ्वीवर पडले होते. भगवान शंकराच्या घामाच्या त्या थेंबातून पराक्रमी आणि सर्वशक्तिमान वास्तुपुरुषाचा जन्म झाला. त्याच्या जन्मानंतर, त्याच्या विशाल शरीराने आणि शक्तीने सर्व देव भयभीत झाले आणि त्या भयंकर राक्षसापासून त्याचे रक्षण करण्यासाठी ब्रह्मदेवाची प्रार्थना करू लागले.
- Nitish Gadge
- Updated on: Feb 24, 2024
- 11:53 am
Shanidev : या दोन राशीच्या लोकांवर होणार शनिदेवाची कृपा, तीन राशीच्या लोकांना राहावे लागेल सावध
शनीच्या उदयानंतर सिंह राशीच्या लोकांना काळजीपूर्वक विचार करावा लागेल. या काळात सिंह राशीच्या लोकांनी कोणतीही गुंतवणूक करण्यापूर्वी 100 वेळा काळजीपूर्वक विचार करावा. हे तुमच्यासाठी हानिकारक असू शकते. हे तुमच्यासाठी चांगले नाही, त्यामुळे अशा परिस्थितीत सावधगिरी बाळगा.
- Nitish Gadge
- Updated on: Feb 24, 2024
- 10:44 am
Horoscope Today 24 February 2024 : आजचे राशी भविष्य, या राशीच्या लोकांनी आर्थिक व्याव्हारात सावध राहावे
आजचा दिवस तुमच्यासाठी चांगला जाईल. आज घरात आणि बाहेर सर्वत्र तुमची प्रशंसा होईल. सर्वजण तुमच्याशी चांगले वागतील. आज समाजकार्य करण्यासाठी दिवस चांगला आहे. तुम्ही एनजीओ सुरू करू शकता किंवा कोणत्याही सामाजिक संस्थेत सामील होऊ शकता. आज ऑफिसमध्ये काम करताना तुमची बरोबरी होणार नाही. तुमच्या कनिष्ठांनाही तुमच्याकडून काम शिकण्याची इच्छा असेल.
- Nitish Gadge
- Updated on: Feb 24, 2024
- 12:01 am