AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

300 वर्षानंतर महाशिवरात्रीला जुळून येतोय विशेष योग, पूर्ण होतील सर्व मनोकामना

महाशिवरात्रीला शिवाची उपासना करून आणि सर्वार्थ सिद्धी योगाचे व्रत पाळल्यास मनुष्याला परम यश प्राप्त होते. यावेळी तब्बल 300 वर्षांनंतर महाशिवरात्रीला हा त्रिकोणी योग तयार होणार आहे. या दुर्लभ योग आणि शुभ मुहूर्तावर भगवान शंकराची आराधना केल्याने भक्तांना अपेक्षित फल प्राप्त होते.

300 वर्षानंतर महाशिवरात्रीला जुळून येतोय विशेष योग, पूर्ण होतील सर्व मनोकामना
महाशिवरात्रीImage Credit source: Social Media
Nitish Gadge
Nitish Gadge | Edited By: | Updated on: Mar 06, 2024 | 11:05 AM
Share

मुंबई : हिंदू धर्मात महाशिवरात्रीला (Mahashivratri) विशेष महत्त्व आहे. यावर्षी महाशिवरात्री 8 मार्च 2024 रोजी शुक्रवारी येत आहे. या दिवशी व्रत पाळण्याने व यथायोग्य पूजा केल्याने व्यक्तीला प्रत्येक क्षेत्रात यश प्राप्त होते आणि जीवनात सुख-समृद्धी प्राप्त होते. या दिवशी एक अत्यंत दुर्मिळ संयोग तयार होत आहे. असा योग सुमारे 300 वर्षांनंतर तयार होत आहे, ज्यामुळे काही राशीच्या लोकांवर भगवान शंकराची विशेष कृपा होईल.

यावेळी महाशिवरात्री अतिशय विशेष मानली जाते, कारण या दिवशी शुक्र प्रदोष व्रताचा योगायोग आहे. या दिवशी प्रदोष व्रत व्यतिरिक्त इतर अनेक दुर्मिळ योग तयार होत आहेत. अशा परिस्थितीत यावेळी महाशिवरात्रीचे व्रत करून भगवान भोलेनाथाची पूजा केल्यास सर्व मनोकामना पूर्ण होतील, असा विश्वास आहे. वर्षात येणाऱ्या 12 शिवरात्रींपैकी महाशिवरात्रीचे वेगळे महत्त्व आहे.

असा त्रिग्रही योग 300 वर्षांनंतर तयार होत आहे

महाशिवरात्रीला शिवाची उपासना करून आणि सर्वार्थ सिद्धी योगाचे व्रत पाळल्यास मनुष्याला परम यश प्राप्त होते. यावेळी तब्बल 300 वर्षांनंतर महाशिवरात्रीला हा त्रिकोणी योग तयार होणार आहे. या दुर्लभ योग आणि शुभ मुहूर्तावर भगवान शंकराची आराधना केल्याने भक्तांना अपेक्षित फल प्राप्त होते. महाशिवरात्रीच्या दिवशी शिवलिंगाला मधाने अभिषेक करणे शुभ असते. शिवाला उसाच्या रसाने अभिषेक केल्याने माता लक्ष्मी प्रसन्न होते. पती-पत्नीने मिळून शिवलिंगाला बेलपत्र अर्पण केल्यास त्यांचे वैवाहिक जीवन सुखी राहते.

महाशिवरात्रीच्या दिवशी असा योगायोग तब्बल 300 वर्षांनंतर घडत आहे.  मकर राशीमध्ये मंगळ आणि चंद्राचा संयोग आहे, ज्यामुळे चंद्र मंगल योग तयार होत आहे. यासोबतच कुंभ राशीत शुक्र, शनि आणि सूर्य यांच्या संयोगामुळे त्रिग्रही योग तयार होत असून राहू आणि बुध यांचा संयोग मीन राशीत होत आहे. असा योगायोग अनेक राशीच्या लोकांच्या आयुष्यात आनंद आणू शकतो.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
ठाकरे बंधूंची एकत्र पत्रकार परिषद! 4 ऑक्टोबरच्या मोर्चापूर्वी...
ठाकरे बंधूंची एकत्र पत्रकार परिषद! 4 ऑक्टोबरच्या मोर्चापूर्वी राज-उद्धव ठाकरे घेणार मोठा निर्णय?
EVM मॅनेज केला जात आहे? रोहित पवारांच्या दाव्यांनी राजकारणात खळबळ
EVM मॅनेज केला जात आहे? रोहित पवारांच्या दाव्यांनी राजकारणात खळबळ
आदित्य ठाकरेंचा दुष्काळ पाहणी दौरा, शेतकऱ्यांना तातडीने मदती करण्याची
आदित्य ठाकरेंचा दुष्काळ पाहणी दौरा, शेतकऱ्यांना तातडीने मदती करण्याची मागणी
दुष्काळात लग्न साधं करण्याच्या आवाहनावर राऊत आक्रमक; विखेंना...
दुष्काळात लग्न साधं करण्याच्या आवाहनावर राऊत आक्रमक; विखेंना दिलं उत्तर
मुंबईत गोंधळ केलेला चालणार नाही, तुम्हाला...ठाकरे बंधूंच्या मोर्चावर..
मुंबईत गोंधळ केलेला चालणार नाही, तुम्हाला...ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदावर्तेंचा थेट इशारा
मतदारांची नावे वगळल्याचा आरोप; ठाकरे बंधूंचा 4 ऑक्टोबरला निवडणूक...
मतदारांची नावे वगळल्याचा आरोप; ठाकरे बंधूंचा 4 ऑक्टोबरला निवडणूक आयोगाविरोधात मोर्चा
SIR प्रक्रियेवर निवडणूक आयोगाचा खुलासा; ‘सर्व निर्णय सहमतीने...
SIR प्रक्रियेवर निवडणूक आयोगाचा खुलासा; सर्व निर्णयांबाबत दिलं स्पष्टीकरण, महाराष्ट्रात...
अधिकारी फिरकलेच नाहीत; शेतकऱ्याचा थेट कृषिमंत्र्यांना फोन, म्हणाले...
अधिकारी फिरकलेच नाहीत; शेतकऱ्याचा थेट कृषिमंत्र्यांना फोन, म्हणाले...
पुण्यातील 10 चौकात 104.5 डेसिबल ध्वनी पातळीची नोंद; बापट म्हणाले...
पुण्यातील लक्ष्मी रोडवरील प्रमुख 10 चौकात 104.5 डेसिबल ध्वनी पातळीची नोंद, बापट म्हणाले...
28 पदकांसह भारताची शानदार कामगिरी; नेमबाजी ठरली सर्वाधिक पदकांची मानकर
28 पदकांसह भारताची शानदार कामगिरी; नेमबाजी ठरली सर्वाधिक पदकांची मानकरी