AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

यावर्षी किती तारखेला साजरी होणार होळी? पहिल्यांदा कधी साजरा झाला हा रंगांचा उत्सव?

हिरण्यकश्यपू अमरत्वाचे वरदान मिळाल्याने उन्मत्त झाला होता. त्याच्या पोटी भक्त प्रल्हाद जन्माला आला. अत्यंत विष्णुभक्त प्रल्हादाला मारण्यासाठी हिरण्यकश्यपूने आपली बहीण होलिका हिला प्रल्हादाला मांडीवर घेऊन चितेवर बसण्यास सांगितले. तिला अग्नीपासून भय नव्हते. प्रत्यक्षात विष्णूचे नामस्मरण करणारा प्रल्हाद चितेवर जळताना सुखरूप राहिला. पण होलिका मात्र जळून भस्मसात झाली.

यावर्षी किती तारखेला साजरी होणार होळी? पहिल्यांदा कधी साजरा झाला हा रंगांचा उत्सव?
होळी Image Credit source: Social Media
Nitish Gadge
Nitish Gadge | Edited By: | Updated on: Mar 06, 2024 | 6:18 PM
Share

मुंबई : होळी हा वर्षातील सर्वात मोठा रंगांचा सण आहे जो फाल्गुन महिन्यात साजरा केला जातो. हा दोन दिवसांचा उत्सव आहे. पहिल्या दिवशी होलिका दहन आणि दुसऱ्या दिवशी वेगवेगळ्या रंगांनी होळी खेळली जाते. या दोन्ही दिवसांचे स्वतःचे वेगळे महत्त्व आहे. मात्र, दरवर्षीप्रमाणे यंदाही होळी (Holi 2024) नेमकी कोणत्या तारखेला येईल याबाबत लोकांमध्ये संभ्रम आहे. 24 की 25 मार्च जाणून घ्या कोणत्या दिवशी साजरी होणार होळी? पंचांगानुसार या वर्षी फाल्गुन महिन्याची पौर्णिमा 24 मार्च रोजी सकाळी 9.54 वाजता सुरू होईल. जो दुसऱ्या दिवशी दुपारी 12:29 वाजता संपेल. त्यामुळे होलिका दहन 24 मार्च, रविवारी होणार आहे. होलिका दहनाचा शुभ मुहूर्त 11:13 ते दुपारी 12:27 पर्यंत आहे. म्हणजेच होलिका दहन 1 तास 14 मिनिटे करता येते.

24 मार्च रोजी होलिका दहन होणार आहे. त्यामुळे 25 मार्चला रंगणी धुलिवंदन खेळता येईल. देशभरात रंगांनी होळी साजरी केली जाते. या दिवशी अनोळखी लोकही आपले बनतात आणि शत्रूसुद्धा एकमेकांना मिठी मारून होळीच्या शुभेच्छा देतात.

होलिका दहन पूजा

होलिका दहनासाठी रस्त्याच्या कडेला किंवा चौकाचौकात लाकूड, काठ्या, झुडपे गोळा करून एक आठवडा अगोदर होलिका तयार केली जाते. होलिका दहनाच्या दिवशी हा लाकडाचा ढीग होलिकेच्या रूपात जाळला जातो. होलिकेच्या पूजेसाठी होलिका आणि प्रल्हाद यांच्या मूर्तीही शेणापासून बनवल्या जातात. तांदूळ, फुले, कापूस, फुलांच्या माळा, हळद, मूग, गुलाल, नारळ, बताशा आणि 5 ते 7 प्रकारची धान्ये पूजा साहित्यात वापरली जातात. यानंतर होलिकेची प्रदक्षिणा करून होलिका दहन केले जाते.

होळीची पौराणिक कथा

हिरण्यकश्यपू अमरत्वाचे वरदान मिळाल्याने उन्मत्त झाला होता. त्याच्या पोटी भक्त प्रल्हाद जन्माला आला. अत्यंत विष्णुभक्त प्रल्हादाला मारण्यासाठी हिरण्यकश्यपूने आपली बहीण होलिका हिला प्रल्हादाला मांडीवर घेऊन चितेवर बसण्यास सांगितले. तिला अग्नीपासून भय नव्हते. प्रत्यक्षात विष्णूचे नामस्मरण करणारा प्रल्हाद चितेवर जळताना सुखरूप राहिला. पण होलिका मात्र जळून भस्मसात झाली. तितक्यात नरसिंह खांबातून प्रगट झाले आणि त्यांनी दुष्ट प्रवृत्ती हिरण्यकश्यपूचे पोट फाडून त्याचा वध केला. वाईट शक्तींना जाळून भस्म करण्यासाठी होलिका दहन करण्याची परंपरा सुरू झाली. या दिवशी महादेवांनी कामदेवांना भस्मसात केले.

सगळे भयभीत झाले की कामदेव नसले तर सृष्टी चालणार कशी? तेव्हा महादेवांनी वरदान देवून कामदेवाला जीवनदान दिले. व सर्व देवांनी रंगोत्सव साजरा करून आनंद व्यक्त केला. हा उत्सव पाच दिवस चालला. फाल्गुन कृष्ण पंचमीला म्हणजेच रंग पंचमीला या उत्सवाची सांगता झाली. रंग पंचमी म्हणजे साक्षात कृष्ण आणि राधेचा रंग खेळण्याचा दिवस. या दिवशी सर्व देव रंग खेळतात, असे समजले जाते. चांदीच्या पिचकारीतून केशराचे पाणी शिंपडले जाते. आजही ब्रिजभूमी येथे फार मोठ्या प्रमाणात रंग खेळला जातो. तऱ्हेतऱ्हेचे फुलांचे रंग, गुलाल याने राधा-कृष्ण होळी खेळतात, असा समज आहे.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
शिवसेना सुनावणी, नीट आंदोलन, राजकीय घडामोडींचा आढावा
महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बातम्या: शिवसेना सुनावणी, नीट आंदोलन, राजकीय घडामोडींचा आढावा
आवडत्या शिक्षकाची बदली रोखण्यासाठी विद्यार्थी थेट आमदारांकडे पोहोचले,
आवडत्या शिक्षकाची बदली रोखण्यासाठी विद्यार्थी थेट आमदारांकडे पोहोचले, मग शिंदेंच्या आमदाराने काय प्रतिक्रिया दिली पाहा...
मोठी खळबळ! कुंभमेळा घोटाळ्यात मत्री गिरीश महाजनांच्या 2 नातलगांना अटक,
मोठी खळबळ! कुंभमेळा घोटाळ्यात मत्री गिरीश महाजनांच्या 2 नातलगांना अटक, नेमकं काय घडलं?
CM फडणवीसांचा मोठा निर्णय; भरती परीक्षांबाबत सरकारचा मास्टरप्लॅन
CM फडणवीसांचा मोठा निर्णय; भरती परीक्षांबाबत सरकारचा मास्टरप्लॅन, नेमकं काय घडणार?
इमामपूर रोडवर वाल्मिक कराड समर्थकांकडून गोळीबार; नेमकं काय घडलं?
मोठी बातमी! इमामपूर रोडवर वाल्मिक कराड समर्थकांकडून गोळीबार; नेमकं काय घडलं?
चेन्नईला जाणाऱ्या इंडिगो विमानाच्या इंजिनमध्ये बिघाड
Kolkata To Chennai Flight | चेन्नईला जाणाऱ्या इंडिगो विमानाच्या इंजिनमध्ये बिघाड; विमानाचं तातडीने लँडिंग, चेन्नई विमानतळावर आपत्काल जाहीर
कोर्टाच्या आगामी सुनावणीत मोठं घडणार? सुनावणीच्या अखेरीच कपिल सिब्बल..
कोर्टाच्या आगामी सुनावणीत मोठं घडणार? सुनावणीच्या अखेरीच कपिल सिब्बल यांची मोठी मागणी
शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदावरच सिब्बलांचा सवाल; कोर्टात नेमकं काय घडलं?
Shivsena Case Hearing | एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदावरच सिब्बलांचा सवाल; सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडलं?
फूट म्हणजे नक्की काय? सुप्रीम कोर्टाचा थेट सवाल; सिब्बलांचा युक्तिवाद
Shivsena Hearing | फूट म्हणजे नक्की काय? सुप्रीम कोर्टाचा थेट सवाल; कपिल सिब्बलांचा जोरदार युक्तिवाद
कपिल सिब्बलांचा एक-एक युक्तिवाद, शिंदे गटाची धाकधूक वाढली...
Kapil Sibbal | कपिल सिब्बलांचा एक-एक युक्तिवाद, शिंदे गटाची धाकधूक वाढली; सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडतंय?