AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मार्च महिन्याच्या पहिल्या दिवशी अवश्य करा हे उपाय, आर्थिक चणचण होईल दूर

ज्योतिषशास्त्रात शुक्रवार हा माता लक्ष्मीचा दिवस म्हणून ओळखला जातो. या दिवशी माता लक्ष्मीची पूजा केल्याने आर्थिस समस्या दूर होतात अशी धार्मिक मान्यता आहे. आज मार्च महिन्याचा पहिला दिवस देखील शुक्रवार पासूनच सुरू होत आहे. या दिवशी काही विशिष्ट उपाय केल्यास आर्थिक चणचण दूर होण्यास मदत होईल.

मार्च महिन्याच्या पहिल्या दिवशी अवश्य करा हे उपाय, आर्थिक चणचण होईल दूर
माता लक्ष्मी
| Updated on: Mar 01, 2024 | 9:03 AM
Share

मुंबई : आज शुक्रवारपासून मार्च महिना सुरू होत आहे. धार्मिक मान्यतांनुसार शुक्रवार हा दिवस संपत्तीची देवी लक्ष्मीला समर्पित मानला जातो. अशा परिस्थितीत मार्च महिन्याच्या पहिल्या दिवशी हे विशेष उपाय केल्यास महिनाभर लाभ मिळू शकतो. या सोप्या उपायांबद्दल जाणून घेऊया. प्रत्येक व्यक्तीला आपल्यावर लक्ष्मीची कृपा असावी असे वाटते, जेणेकरून त्याला आर्थिक समस्यांना सामोरे जावे लागू नये. कोणत्याही दिवशी विशेष पूजा केल्याने देवी लक्ष्मीला प्रसन्न करता येत असले तरी लक्ष्मीची पूजा करण्यासाठी शुक्रवारचा दिवस सर्वोत्तम मानला जातो. अशा स्थितीत मार्च महिनाही शुक्रवारपासून सुरू होत आहे. मार्च महिन्याच्या पहिल्या दिवसासाठी काही खास उपाय (Astro Tips For Money)जाणून घेऊया.

हे काम आधी करा

शुक्रवारी सकाळी उठल्याबरोबर देवी लक्ष्मीचे ध्यान करून तिला नमन करा. स्नान आणि ध्यान केल्यानंतर स्वच्छ कपडे घाला. गुलाबी रंग हा देवी लक्ष्मीचा प्रिय मानला जातो, त्यामुळे तुम्ही शुक्रवारी गुलाबी रंगाचे कपडे घालू शकता. यानंतर श्री यंत्र आणि देवी लक्ष्मीच्या चित्र किंवा मूर्तीसमोर उभे राहून श्री सूक्ताचा पाठ करा.

या गोष्टी दिल्या पाहिजेत

शुक्रवारी लक्ष्मीची पूजा करताना तिला दोन लवंगा अर्पण करा. याशिवाय पूजेच्या वेळी लक्ष्मीला कमळाचे फूल अर्पण करावे. यासोबतच 1 मार्च म्हणजेच शुक्रवारी तांदळाची खीर बनवून देवी लक्ष्मीला अर्पण करा. त्यानंतर ही खीर प्रसाद म्हणून स्वीकारावी.

या गोष्टी लक्षात ठेवा

असे मानले जाते की शुक्रवारी पैशाची देवाणघेवाण करू नये, तसेच साखर किंवा चांदी कोणाला दान करू नये. असे केल्याने व्यक्तीचा शुक्र कमजोर होऊ शकतो. यासोबतच शरीर आणि मनाच्या स्वच्छतेची विशेष काळजी घ्या, तरच तुम्हाला देवी लक्ष्मीची कृपा प्राप्त होऊ शकते.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!
INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!.
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना.
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं.
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न.
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी.
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण.
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर.
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी.
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान.
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप.