
ज्योतिषशास्त्रात (Astrology) जन्मकुंडलींद्वारे वेगवेगळ्या कालखंडांबद्दल भाकीतं केली जातात. दैनंदिन राशीभविष्य हे रोजच्या घडामोडींचे अंदाज देते, तर साप्ताहिक, मासिक आणि वार्षिक राशीभविष्य यामध्ये अनुक्रमे येता आठवडा, महिना आणि वर्षाचा अंदाज असतो. दैनिक राशिफल (Horoscope Today 18 February 2025) हे ग्रह-नक्षत्रांच्या हालचालीवर आधारित एक भविष्यवाणी आहे, ज्यामध्ये सर्व राशींचे (मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ आणि मीन) तपशीलवार वर्णन केले आहे. ही कुंडली काढताना ग्रह-नक्षत्रांसह पंचांगाच्या समीकरणाचे विश्लेषण केले जाते. दैनंदिन राशीभविष्य तुम्हाला नोकरी, व्यवसाय, व्यवहार, कुटुंब आणि मित्रांसोबतचे संबंध, आरोग्य आणि दिवसभरातील शुभ-अशुभ घटनांचे भाकीत देते.
मेष राशीच्या व्यक्तींसाठी आजचा दिवस सामान्य राहील. तुम्हाला तुमच्या कामात यश मिळवण्यासाठी कठीण परीक्षा द्यावी लागेल. विद्यार्थ्यांना प्रगतीचा मार्ग सापडेल. अचानक खर्चाचा बोजा वाढेल. यामुळे चिंता वाढतील. नवीन व्यवसाय सुरु करण्यासाठी आजचा दिवस शुभ आहे.
आज वृषभ राशींच्या व्यक्तींचा दिवस ऊर्जा आणि आत्मविश्वासाने परिपूर्ण असेल. जुन्या गुंतवणुकीतून तुम्हाला चांगला परतावा मिळेल. यामुळे आर्थिक परिस्थिती सुधारेल. मात्र व्यवसायात कोणतीही जोखीम पत्करु नका. आज कुटुंबियांशी मतभेद होतील. मात्र रागावर नियंत्रण ठेवा. आरोग्याबद्दल निष्काळजीपणा नको.
आजचा दिवस जितका चांगला तितकाच त्रासदायकही असणार आहे. आरोग्याबद्दल सावधगिरी बाळगा. निर्णय घेताना गोंधळू नका. ऑफिसमध्ये वरिष्ठांशी एखाद्या कारणामुळे वाद संभवतात. यामुळे तुमची प्रतिमा खराब होऊ शकते. बऱ्याच काळापासून रखडलेली कामे आज यशस्वी होतील. आहाराकडे लक्ष द्या.
कर्क राशीच्या व्यक्तींसाठी आजचा दिवस आव्हानात्मक असणार आहे. तुमच्या बोलण्यावर नियंत्रण ठेवा. राग टाळा. आज तुमची एखाद्या जवळच्या व्यक्तीशी भेट होईल. प्रवासाची संधी उपलब्ध होईल. कौटुंबिक जीवनातील समस्या शांततेने सोडवा. मालमत्तेबाबत वाद होण्याची शक्यता आहे. अडकलेले पैसे परत मिळतील.
आज सिंह राशीच्या व्यक्तींनी घाईघाईत कोणतेही निर्णय घेणे टाळा. अज्ञात भीतीमुळे मन अस्वस्थ राहील. कुटुंबातील सदस्यांशी वाद होऊ शकतात. रागावर नियंत्रण ठेवा. पालकांच्या आरोग्याकडे लक्ष द्या. वैवाहिक जीवन आनंदी राहील. कोणत्याही अनोळखी व्यक्तीवर विश्वास ठेवू नका. गुंतवणूक करणे टाळा.
कन्या राशीच्या व्यक्तींना नवीन संधी मिळतील. आज तुम्हाला आर्थिक लाभ संभवतो. तसेच तुमच्या घरात एखाद्या प्रिय व्यक्तीच्या आगमनामुळे आनंदाचे वातावरण असेल. एखाद्या ज्येष्ठ सदस्याच्या मदतीने तुमच्या कौटुंबिक समस्या सोडवण्यास मदत होईल. आरोग्याची काळजी घ्या. परदेशात शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना चांगली बातमी मिळेल.
आजचा दिवस शुभ राहील. आज तुमची कोणतीही कामे अडथळ्याशिवाय पूर्ण होतील. रागावर नियंत्रण ठेवा. एकाच वेळी अनेक कामांची जबाबदारी घेऊ नका. विद्यार्थ्यांनी अभ्यासावर अधिक लक्ष केंद्रीत करा. अनावश्यक खर्च टाळा, अन्यथा तुम्हाला पैसे उधार घ्यावे लागू शकतात.
करिअरमध्ये किंवा नोकरीत नवीन संधी मिळेल. समाजात आदर वाढेल. संयम बाळगा. घाईघाईत कोणताही निर्णय घेऊ नका. तुमच्या जोडीदाराकडून आज तुम्हाला एखादे सरप्राईज मिळेल. कोणावरही आंधळेपणाने विश्वास ठेवू नका. कोणालाही मोठी रक्कम उधार देऊ नका.
धनू राशीच्या व्यक्तींची आर्थिक परिस्थिती सुधारेल. उत्पन्नाचे नवीन स्त्रोत निर्माण होईल. वैवाहिक जीवनात समस्या येऊ शकतात. जोडीदाराशी मतभेद होण्याची शक्यता आहे. कौटुंबिक जीवनातील समस्या एकमेकांशी बोलून सोडवा. ऑफिसमध्ये नवीन कामांची जबाबदारी तुमच्यावर येईल.
मकर राशींच्या लोकांना आज नवीन आव्हानांना तोंड द्यावे लागू शकते. गाडी चालवताना काळजी घ्या. तुमची रखडलेली काम यशस्वी होतील. व्यवसायाचा विस्तार होण्यास मदत होईल. गुंतवणुकीचे निर्णय सुज्ञपणे घ्या. मुलांच्या आरोग्याकडे लक्ष द्या.
कुंभ राशींच्या व्यक्तींसाठी आजचा दिवस फारच लाभदायक असणार आहे. आज तुम्हाला व्यवसायात नफा होईल. तुमचे मन एखाद्या गोष्टीबद्दल निराश राहू शकते. किरकोळ समस्यांचा सामना करावा लागेल. खर्चावर नियंत्रण ठेवा.
मीन राशीच्या व्यक्तींना आज नोकरी आणि व्यवसायात अनुकूल वातावरण असेल. गुंतवणुकीच्या नवीन संधी उपलब्ध होतील. काही लोकांचे लग्न जमू शकते. मेहनतीचे फळ मिळेल. तुम्हाला आज सर्व कामात यश मिळेल. आर्थिक लाभाच्या नवीन संधी मिळतील.
(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)