October Grah Gochar : ऑक्टोबर महिन्यात ग्रहांची मोठी उलथापालथ, राहु-केतुसह सहा ग्रहांच्या गोचरामुळे तीन राशींच्या जातकांना फायदा
मुंबई : ज्योतिषशास्त्रात काही ग्रह एका ठरावीक कालावधीनंतर राशी बदल करतात. त्यांचा राशी बदलचा वेग जास्त असतो. चंद्र, बुध, शुक्र, मंगळ, सूर्य हे ग्रह वेगाने राशी बदल करतात. या ग्रहांचा गोचर कालावधी कमी अधिक आहे. पण राहु-केतु, शनि आणि गुरु हे दीर्घ कालानंतर राशीबदल करतात. त्यामुळे या ग्रहांचा गोचर कालावधी जवळ आला की राशीचक्रात मोठी उलथापालथ पाहायला मिळते. ऑक्टोबर महिना त्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. या महिन्यात सूर्य, शुक्र, राहु, केतु आणि बुध ग्रह राशी बदल करणार आहे. त्यामुळे राशीचक्रावर परिणाम दिसून येईल. चला जाणून घेऊयात कोणता ग्रह कधी राशी परिवर्तन करणार ते आणि कोणत्या राशींना सकारात्मक परिणाम मिळतील ते..
ग्रह गोचर ऑक्टोबर 2023
- बुध : ग्रहांमध्ये राजकुमाराचा दर्जा असलेला बुध ग्रह 1 ऑक्टोबर 2023 रोजी रात्री 8 वाजून 29 मिनिटांनी कन्या राशीत प्रवेश करेल. त्यानंतर 19 ऑक्टोबरला दुपारी 1 वाजून 6 मिनिटांनी कन्या राशीतून तूळ राशीत प्रवेश करेल.
- शुक्र : भौतिक सुखांचा कारक असलेला शुक्र ग्रह 2 ऑक्टोबर 2023 रोजी रात्री 12 वाजून 43 मिनिटांनी सिंह राशीत गोचर करेल.
- मंगळ : ग्रहांमध्ये सेनापतीचा दर्जा असलेला मंगळ ग्रह 3 ऑक्टोबर 2023 रोजी संध्याकळी 5 वाजून 12 मिनिटांनी तूळ राशीत गोचर करेल.
- सूर्य : नवग्रहांमध्ये राजा असलेला सूर्य ग्रह 18 ऑक्टोबर 2023 रोजी दुपारी 1 वाजून 18 मिनिटांनी कन्या राशीतून तूळ राशीत प्रवेश करेल.
- राहु : मायावी ग्रह आणि पापग्रहाचा दर्जा असलेला ग्रह 30 ऑक्टोबर 2023 रोजी दुपारी 2 वाजून 13 मिनिटांनी मेष राशीतून मीन राशीत प्रवेश करेल. यामुळे गुरु आणि राहुची युती संपुष्टात येईल आणि चांडाळ योग संपेल.
- केतु : राहु आणि केतु एकत्रच राशी बदल करतात. कायम एकमेकांवर त्यांची दृष्टी असते. वक्री चालीने राशी परिवर्तन करतात. तसेच एका राशीत दीड वर्षे ठाण मांडून बसतात. केतु 30 ऑक्टोबर 2023 रोजी दुपारी 2 वाजून 13 मिनिटांनी तूळ राशीतून कन्या राशीत प्रवेश करेल.
ग्रहांच्या गोचरामुळे या राशीच्या जातकांना लाभ मिळेल
ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रहांची स्थिती महत्त्वपूर्ण ठरते. त्यामुळे त्याचं आकलन त्यानुसार केलं जातं. ढोबळमानाने विचार करता सहा ग्रहांच्या गोचराचा चार राशीच्या जातकांना लाभ मिळू शकतो. यात मिथुन, सिंह, कन्या आणि धनु राशीच्या समावेश आहे. या राशीच्या जातकांना गेल्या काही दिवसांपासून येत असलेल्या अडचणी दूर होतील. कामाच्या ठिकाणी एखादी मोठी जबाबदारी मिळू शकते. व्यवसायात अपेक्षित फायदा होऊ शकतो.
(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही.)