30 ऑक्टोबरला अशुभ असा गुरु चांडाळ योग येणार संपुष्टात, पुढचे सहा महिने या राशींसाठी ‘अच्छे दिन’

Guru Chandal Yog : ज्योतिषशास्त्रानुसार एखाद्या दीर्घ कालासाठी गोचर करणाऱ्या ग्रहाने राशी बदल केला की त्याचे दूरोगामी परिणाम होतात. असंच आता राहु आणि केतुबाबत अशीच काहीशी स्थिती आहे. चला जाणून घेऊयात.

30 ऑक्टोबरला अशुभ असा गुरु चांडाळ योग येणार संपुष्टात, पुढचे सहा महिने या राशींसाठी अच्छे दिन
30 ऑक्टोबरपासून गुरु राहुची युती तुटणार, सहा महिने तीन राशींना फलदायी
| Updated on: Oct 13, 2023 | 3:05 PM

मुंबई : ज्योतिषशास्त्रानुसार गुरु ग्रहाने मीन राशीतून मेष राशीत प्रवेश करताच राहुच्या संपर्कात आला होता. गुरु आणि राहुची अभद्र युती झाली होती. त्यामुळे अशुभ असा गुरु चांडाळ योग तयार झाला आहे. त्यामुळे राशीचक्रावर परिणाम दिसून आला आहे. आता 30 ऑक्टोबरला ही युती तुटणार आहे. गुरु आणि राहुची युती तुटताच गुरु चांडाळ योग संपुष्टात येणार आहे. गुरु ग्रह मेष राशीतच राहणार आहे. तर राहु वक्री चाल करत मीन राशीत प्रवेश करणार आहे. यामुळे तीन राशीच्या जातकांचं नशिब फळफळणार आहे. पुढचे सहा महिने तीन राशीच्या जातकांसाठी चांगले जातील. गेल्या काही दिवसांपासून असलेल्या इच्छा पूर्ण होतील. चला जाणून घेऊयात या लकी राशींबाबत

तीन राशीच्या जातकांना होणार लाभ

मेष : या राशीतच गुरु आणि राहुची युती होती. त्यामुळे युती संपुष्टात येताच या राशीच्या जातकांना लाभ मिळणार आहे. आत्मविश्वासात वाढ होईल. तसेच वैवाहिक जीवन सुखकारक होईल. आर्थिक स्थिती सुधारेल आणि उद्योगधंद्यात प्रगती दिसून येईल. अविवाहित जातकांचं विवाह निश्चित होऊ शकतो. आरोग्य विषयक तक्रारीही दूर होतील.

मिथुन : गुरु चांडाळ योग संपताच उत्पन्नातील अडसर दूर होणार आहे. कारण ही युती उत्पन्न स्थानात तयार झाली होती. काही जणांसोबत संबंध खराब झाले असतील तर त्यात सुधारणा होईल. जुन्या गुंतवणुकीतून चांगला लाभ मिळेल.पत्नीकडून तुम्हाला शुभ समाचार मिळेल. तसेच करियरमध्ये प्रगती दिसून येईल. समाजात मानसन्मान वाढेल.

सिंह : स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या जातकांना सहा महिन्यांचा कालावधी चांगला जाईल. सरकारी नोकरीचं स्वप्न पूर्ण होऊ शकतं. त्याचबरोबर अविवाहित जातकांना चांगलं स्थळ चालून येईल. नशिबाची पूर्ण साथ मिळेल. राजकारणाशी निगडीत लोकांना मोठं पद मिळू शकते. मीडिया आणि चित्रपट क्षेत्राशी निगडीत लोकांना अपेक्षित लाभ मिळेल.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)