Astrology 2023 : तूळ राशीत चार ग्रहांची होणार युती, तीन राशींना मिळणार पाठबळ
Chaturgrahi Yog in Tula Rashi : ग्रहांच्या गोचर कालावधी वेगवेगळा असल्याने अनेकदा एकाच राशीच एकापेक्षा जास्त ग्रह येतात. तूळ राशीत अशीच काहिशी स्थिती तयार होत आहे. त्यामुळे तीन राशीच्या जातकांना लाभ मिळणार आहे.

मुंबई : ज्योतिषशास्त्रानुसार ऑक्टोबर महिना खूप महत्त्वाचा आहे. कारण या महिन्यात बऱ्याच ग्रहांची उलथापालथ होत आहे. त्यामुळे शुभ अशुभ योगांची स्थिती निर्माण होत आहे. त्यामुळे त्याचा परिणाम थेट राशीचक्रावर होत आहे. या महिन्यात शुक्राच्या तूळ राशीत चतुर्ग्रही योग तयार होत आहे. गेल्या दीड वर्षांपासून केतु ग्रह या राशीत विराजमान आहे कारण 3 ऑक्टोबरला मंगळ ग्रहाने तूळ राशीच गोचर केलं आहे. तर 18 ऑक्टोबरला सूर्य आणि 19 ऑक्टोबरला बुध ग्रह तूळ राशीत प्रवेश करणार आहे. त्यामुळे चार ग्रह तूळ राशीत एकत्र येणार आहेत. यामुळे काही राशींना अडचणींचा, तर काही राशींच्या नशिबाची दारं खुली होणार आहेत. चला जाणून घेऊयात तूळ राशीतील चतुर्ग्रही योगाचा कोणत्या राशींना कसा फायदा होणार ते..
या तीन राशींना मिळणार पाठबळ
सिंह : चतुर्ग्रही योगामुळे या राशीच्या जातकांना लाभ मिळणार आहे. या कालावधीत आत्मविश्वास आणि बळ मिळेल. गेल्या काही दिवसांपासून अडकलेली कामं मार्गी लागतील. नोकरीच्या ठिकाणी सकारात्मक बदल दिसून येईल. किचकट कामंही सहजरित्या पूर्ण कराल. त्यामुळे वरिष्ठ तुमच्यावर खूश होतील. या कालावधीतील गुंतवणूक फलदायी ठरेल. कौटुंबिक वातावरण चांगलं राहील.
कन्या : चतुर्ग्रही योगामुळे या राशीच्या अडचणी कमी होतील. कौटुंबिक वाद दूर होतील. तसेच मुलांकडून उत्तम सहकार्य मिळेल. उत्पन्नाचे नवे स्रोत निर्माण होतील. वाहन, संपत्ती खरीदेचे योग जुळून येतील. कायदेशीर प्रकरणात यश मिळू शकते. नशिबाची उत्तम साथ लाभेल. तसेच करिअरमध्ये एक उंची गाठाला. व्यवसायात भरभराट दिसून येईल.
धनु : या राशीच्या जातकांनाही चतुर्ग्रही योगाचा लाभ मिळेल. गेल्या काही दिवसांपासून खर्च होत असलेल्या पैशांवर लगाम बसेल. नोकरी करणाऱ्या जातकांना नवीन चांगल्या पगाराची नोकरी मिळू शकते. कामाच्या ठिकाणी तुमच्या कामाचा उत्तम प्रभाव पडेल. मोठी जबाबदारी तुमच्या खांद्यावर पडू शकते. कुटुंबासोबत चांगला वेळ व्यतित कराल. मुलांच्या अभ्यासात प्रगती दिसून येईल.
(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही.)
