लक्ष्मीपूजनाच्या दिवशी चंद्र आणि गुरुचा अद्भूत योग, तीन राशींना मिळणार ग्रहांची साथ

ज्योतिषशास्त्रात ग्रहांच्या घडामोडींकडे बारीक लक्ष दिलं जातं. कोणता ग्रह किती अंशात इथपासून त्याचा प्रभाव कसा असेल याचं आकलन केलं जातं. जर एखादा योग महत्त्वाच्या दिवशी जुळून आला की त्याचा प्रभाव काही पटीने वाढतो.

लक्ष्मीपूजनाच्या दिवशी चंद्र आणि गुरुचा अद्भूत योग, तीन राशींना मिळणार ग्रहांची साथ
लक्ष्मीपूजन आणि गजकेसरी योग एकाच दिवशी, तीन राशींना मिळणार लाभ
| Updated on: Nov 08, 2023 | 7:55 PM

मुंबई : दिवाळी हा हिंदू धर्मातील सणांपैकी एक महत्त्वाचा सण आहे. पाडवा आणि लक्षमी पूजनामुळे या सणांचं महत्त्व आणखी वाढतं. महत्त्वाच्या दिवशी ग्रहांची स्थिती उत्तम असेल तर त्याचा प्रभाव चांगला पडतो. 10 नोव्हेंबरपासून दिवाळीचं पर्व सुरु होईल. ज्योतिषशास्त्रानुसार या दिवशी चंद्र आणि गुरुची एकमेकांवर दृष्टी असणार आहे. गुरु ग्रह मेष राशीत, तर चंद्र तूळ राशीत असणार आहे. त्यामुळे गजकेसरी योग जुळून येणार आहे. 11 नोव्हेंबर चंद्र दुपारी 1 वाजून 1 मिनिटांनी तूळ राशीत प्रवेश करेल. चंद्र या राशीत 13 नोव्हेंबरला रात्री 9 वाजून 17 मिनिटांपर्यंत राहील. तर गुरु मेष राशीत असणार आहे. त्यामुळे एकमेकांकडे दृष्टी असणार आहे. तर 12 नोव्हेंबरला लक्ष्मीपूजन असल्याने या दिवसाचं महत्त्व वाढलं आहे. ग्रहांच्याया स्थितीमुळे तीन राशीच्या जातकांना फायदा होणार आहे. अचानक धनलाभ किंवा अडकलेली कामं पूर्ण होऊ शकतात. चला जाणून घेऊयात याबाबत

या तीन राशींना मिळणार लाभ

वृषभ : या राशीच्या उत्पन्न स्थानात गजकेसरी योग जुळून येणार आहे. त्यामुळे जातकांना लाभ मिळू शकतो. वैयक्तिक कुंडलीतील ग्रहांची स्थिती उत्तम असल्यास फायदा होऊ शकतो. कौटुंबिक स्तरावर काही सकारात्मक बदल दिसून येतील. उत्पन्नाचे नवे स्रोत निर्माण होतील. मुलांच्या आयुष्यातील प्रगती दिसून येईल. शेअर बाजारात गुंतवणूक करू शकता. पण तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेऊन पावलं उचला.

मिथुन : या राशीच्या कर्म स्थानात गजकेसरी योग जुळून येत आहे. त्यामुळे कामाच्या ठिकाणी तुम्हाला सकारात्मक बदल दिसतील. नोकरीच्या नवीन संधी चालून येतील. कामाच्या ठिकाणी नवीन जबाबदारी मिळू शकते. करिअरमध्ये प्रगती कराल. वडिलांकडून या कालावधीत उत्तम साथ मिळेल. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना लाभ होऊ शकतो.

धनु : या राशीच्या चतुर्थ स्थानात गजकेसरी योग तयार होत आहे. हे स्थान संपत्ती आणि भौतिक सुखांशी निगडीत आहे. वाहन किंवा प्रॉपर्टी खरेदीचा योग जुळून येईल. रियल इस्टेटशी निगडीत व्यवसाय असेल तर चांगला नफा मिळेल. बेरोजगार तरुणांना नोकरीची ऑफर मिळू शकते. तसेच व्यवसायात हवी तशी प्रगती करता येईल. कौटुंबिक स्तरावर आनंदाचं वातावरण राहील.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)