Lal Kitab मधील नवग्रहांचे सरळ आणि सोपे उपाय? अडचणी चुटकीसरशी होतील दूर

Lal Kitab Totke: ज्योतिषशास्त्रानुसार पृथ्वीवर जन्म घेतलेला प्रत्येक व्यक्तींच आयुष्य नवग्रहांच्या स्थितीवर अवलंबून असतं. कुंडलीतील 12 घरात ग्रह त्याच्या स्थानानुसार फळं देतात. ग्रहांच्या अशुभ स्थितीसाठी लाल किताबात काही उपाय देण्यात आले आहेत.

Lal Kitab मधील नवग्रहांचे सरळ आणि सोपे उपाय? अडचणी चुटकीसरशी होतील दूर
Astrology: लाल किताबातील उपायामुळे ग्रहांच्या अडचणी होतील दूर, अशी वाढवाल ग्रहांची उर्जा
Follow us
| Updated on: Feb 08, 2023 | 4:55 PM

मुंबई- ज्योतिषशास्त्रात नवग्रहांच्या स्थितीवरून भविष्याची मांडणी केली जाते. कोणता ग्रह कोणत्या स्थानात बसला आणि कोणता ग्रह काय फळ देतो यावर ज्योतिषशास्त्र अवलंबून असतं. कुंडलीतील ग्रह कमकुवत असल्यास त्याची अशुभ फळं भोगावी लागतात. त्यासाठी ज्योतिषशास्त्रात काही उपाय सांगण्यात आले आहेत. त्यामुळे ग्रहांची स्थिती कशी यावर फळं अपेक्षित असतात.ग्रहांची स्थिती अशुभ असल्यास वैदिक ज्योतिषशास्त्राप्रमाणे लाल किताबमधील उपाय देण्यात आले आहेत.लाल किताब ज्योतिषशास्त्रातील दुसरं अंग असल्याचं संबोधलं गेलं आहे. साध्या सोप्या उपयांमुळे ग्रहांची स्थिती आपल्या बाजूने होते, असं लाल किताबात सांगण्यात आलं आहे. लाल किताबातील उपायामुळे ग्रह अनुकूल फळं देतात. लाल किताबातील उपाय सोपे असल्याने सामान्य जातक त्या उपायांचा तात्काळ वापर करू शकतो. आज आम्ही तुम्हाला लाल किताबनुसार ग्रहांच्या अनुकूल फळासाठी उपाय सांगणार आहोत.

सूर्य- नवग्रहात सूर्यदेवांना राजाचं स्थान देण्यात आलं आहे. सूर्यदेवांना प्रसन्न करण्यासाठी गंगाजल आणि चांदीचा तुकडा देव्हाऱ्यात नक्की ठेवावा. या व्यतिरिक्त माकडांना गूळ चणे खाण्यास द्यावे.

चंद्र- चंद्राची स्थिती चांगली ठेवण्यासाठी स्मशान किंवा रुग्णालयात पाणपोई लावावी. तसेच ससा पाळावा. पाण्यात नाणे टाकावे. पांढऱ्या कपड्यात साखर बांधून वाहत्या पाण्यात सोडावं. यामुळे चंद्र चांगली फळं देईल.

मंगळ- हा ग्रहाला शक्ति देण्यासाठी सूर्याला अर्घ्य देताना पाण्यात गुळ टाकावं. रेवडी वाहत्या पाण्यात सोडावी. घरात कोणतंही हत्यार ठेवू नये. तसेच मारुतिरायाला शेंदूर अर्पण करावं. लाल रंगाचा कपडा कायम जवळ ठेवावा आमि भाऊ आणि वहिनीची सेवा करावी.

बुध- बुध ग्रहाची स्थिती उत्तम करण्यासाठी बकरीचं दान करावं. रात्री मूग भिजत घालून जनावरांना खायला घालावे. या दिवशी मांस खाऊ नका. गळ्यात तांब्याचा सिक्का परिधान करावा.

गुरु- गुरु ग्रहाची स्थिती व्यवस्थित करण्यासाठी केसर टिळा लावावा. तसेच गळ्यात चांदीची चैन परिधान करावी. सापासाठी दूध ठेवावं. पिवळ्या कपड्यात चण्याची डाळ बांधून विष्णुंच्या मंदिरात दान करावी. रोज मंदिराची साफसफाई करावी.

शुक्र- या ग्रहाची चांगली फळं मिळावी यासाठी गाय आणि आईची सेवा करावी. संगमरवरी लादीवर चंदन घासून ते वाहत्या पाण्यात सोडावं. गुळ खाऊ नका. काळ्या गायीला चारा द्या. स्त्रियांचा अपमान करू नका.

शनि- माकडांना चणे खाण्यास द्या. वटवृक्षाच्या मुळाशी दूध अर्पण करावं आणि त्या मातीचा टिळा लावावा. शनिवारी जमिनीत सुरमा गाडावा. शनिवारी कमीत कमी दहा अंधांना भोजन द्यावं. तसेच गणपती बाप्पाची सेवा करावी.

राहु- राहुचा अशुभ प्रभाव कमी करण्यासाठी चांदीची भारीव गोळी जवळ ठेवावी. आपल्या सासू सासऱ्यांकडून विजेचं कोणतंही सामान घेऊ नये. आईसोबत वाद घालू नये. तसेच स्वयंपाकघरात बसून जेवण करू नये.

केतु- केतूची शुभ फळं मिळवण्यासाठी केसर आणि चंदनाचा टिळा लावावा. आपला सामाजिक व्यवहार व्यवस्थित ठेवावा. सलग 4 दिवस सात केळी वाहत्या पाण्यात सोडावी. काळे आणि पांढरे तीळ पाण्यात प्रवाहीत करावे.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही,तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Non Stop LIVE Update
मग आता सभा घेऊन कुणाच पोर खेळवणार? राज ठाकरेंना कुणी लगावला खोचक टोला?
मग आता सभा घेऊन कुणाच पोर खेळवणार? राज ठाकरेंना कुणी लगावला खोचक टोला?.
किरण सामंतांची भावावर नाराजी? कार्यालयावरील उदय सामंतांचे बॅनर हटवले
किरण सामंतांची भावावर नाराजी? कार्यालयावरील उदय सामंतांचे बॅनर हटवले.
शिवसेना का सोडली? बाळासाहेबांना लिहिलेल्या पत्रात राणेंनी काय म्हटलं?
शिवसेना का सोडली? बाळासाहेबांना लिहिलेल्या पत्रात राणेंनी काय म्हटलं?.
महायुतीत कुठल्या पक्षाला, किती जागा? जागावाटपाचा फॉर्म्युला कसा?
महायुतीत कुठल्या पक्षाला, किती जागा? जागावाटपाचा फॉर्म्युला कसा?.
हेमंत गोडसेंना नाशिक लोकसभेची उमेदवारी, छगन भुजबळ नाराज? काय म्हणाले?
हेमंत गोडसेंना नाशिक लोकसभेची उमेदवारी, छगन भुजबळ नाराज? काय म्हणाले?.
ठाणे लोकसभेतून उमेदवारी जाहीर, नरेश म्हस्केंची पहिली प्रतिक्रिया काय?
ठाणे लोकसभेतून उमेदवारी जाहीर, नरेश म्हस्केंची पहिली प्रतिक्रिया काय?.
अखेर कल्याण-ठाण्याचे उमेदवार शिंदे गटातून जाहीर, कुणाला लोकसभेच तिकीट?
अखेर कल्याण-ठाण्याचे उमेदवार शिंदे गटातून जाहीर, कुणाला लोकसभेच तिकीट?.
मुख्यमंत्र्यांची पुन्हा तत्परता; रस्त्यात अपघात, शिंदेंनी ताफा थांबवला
मुख्यमंत्र्यांची पुन्हा तत्परता; रस्त्यात अपघात, शिंदेंनी ताफा थांबवला.
घोडे समजून ज्यांना घेतलं ती खेचरं अन्.. ठाकरेंची शिंदे-फडणवीसांवर टीका
घोडे समजून ज्यांना घेतलं ती खेचरं अन्.. ठाकरेंची शिंदे-फडणवीसांवर टीका.
आमच्या डोक्यात प्रकाश पडायला 17 वर्ष लागली, अजितदादांचा निशाणा कुणावर?
आमच्या डोक्यात प्रकाश पडायला 17 वर्ष लागली, अजितदादांचा निशाणा कुणावर?.