Rashi Bhavishya: ऑक्टोबरचा शेवटचा आठवडा तुमच्यासाठी काय घेऊन येणार? वाचा मेष ते मीन राशींचे भविष्य

October Last Week Horoscope: ऑक्टोबर महिन्याचा शेवटचा आठवडा म्हणजेच 26 ते 31 ऑक्टोबर दरम्यान ग्रहांची स्थिती सर्व राशींच्या आयुष्यावर कसा प्रभाव टाकणार, हे जाणून घेणे महत्त्वाचे ठरणार आहे. या काळात कोणत्या राशींना नशिबाची साथ मिळेल आणि कोणत्या राशींनी सावध राहण्याची गरज आहे, जाणून घ्या मेष ते मीन राशींचे सविस्तर राशिभविष्य.

Rashi Bhavishya: ऑक्टोबरचा शेवटचा आठवडा तुमच्यासाठी काय घेऊन येणार? वाचा मेष ते मीन राशींचे भविष्य
राशीभविष्य
Image Credit source: Instagram
| Edited By: | Updated on: Oct 26, 2026 | 11:47 AM

वैदिक ज्योतिषानुसार, ऑक्टोबर महिन्याचे शेवटचे 6 दिवस म्हणजेच 26 ते 31 ऑक्टोबर 2026 हा काळ ग्रहांच्या स्थितीच्या दृष्टीने महत्त्वाचा असणार आहे. या काळात सूर्य तूळ राशीत, बुध वक्री अवस्थेत तूळ राशीत, तर शुक्र वक्री अवस्थेत संचार करणार आहेत. मंगळ आणि केतू सिंह राशीत, शनी वक्री अवस्थेत मीन राशीत, तर राहू कुंभ राशीत असतील. तसेच, 31 ऑक्टोबर रोजी देवगुरू बृहस्पती सिंह राशीत महागोचर करणार आहेत. या ग्रहस्थितीचा मेष ते मीन अशा सर्व 12 राशींवर परिणाम होण्याची शक्यता आहे. जाणून घ्या, ऑक्टोबरचा शेवटचा आठवडा तुमच्या राशीसाठी कसा असेल.

मेष

कामकाजाची स्थिती काहीशी कमकुवत राहण्याची शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी सावध राहा. रागावर नियंत्रण ठेवा. अतिभावनिकतेमुळे कामात अडथळे येऊ शकतात. आर्थिक परिस्थिती बिघडण्याची, खर्च वाढण्याची शक्यता आहे. भागीदारीतही अडचणींचा सामना करावा लागू शकतो.

Loading...

वृषभ

नात्यांमध्ये अडचणी येऊ शकतात. धैर्य आणि आत्मविश्वासात काहीशी कमतरता जाणवू शकते. इतरांची मदत घेतल्यास कामे मार्गी लागण्यास मदत होईल. व्यवसायाची स्थिती कमकुवत राहू शकते. विशेषतः पैशांशी संबंधित कोणताही निर्णय घाईघाईने घेऊ नका.

मिथुन

आत्मविश्वास वाढेल. कामांमध्ये यश मिळेल. आर्थिक परिस्थिती चांगली राहील. मानसिक तणाव जाणवू शकतो. उत्पन्नासोबत खर्चही वाढू शकतात. नोकरीच्या ठिकाणी परिस्थिती अनुकूल राहील. कुटुंबासोबत आनंददायी वेळ घालवण्याची संधी मिळेल.

कर्क

कार्यक्षेत्रात बदल होण्याची शक्यता आहे. उत्पन्नात सुधारणा होईल. कमाईचे नवीन स्रोत निर्माण होतील. जुन्या मार्गांतूनही पैसे मिळण्याची शक्यता आहे. रागावर नियंत्रण ठेवा. रक्ताशी संबंधित कोणतीही समस्या असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या. योग्य निर्णय घेण्यात यश मिळेल. खर्चावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे.

सिंह

आत्मविश्वास काहीसा कमी होऊ शकतो आणि नकारात्मक विचार त्रास देऊ शकतात. पैसे कमावण्यासाठी संघर्ष करावा लागेल, मात्र उत्पन्न सुरू राहिल. नोकरी आणि कामकाजाची स्थिती चांगली राहील. व्यवसायात यश मिळेल. कुटुंबातील वातावरण शांत राहील. लांबच्या प्रवासाचे योग आहेत.

कन्या

अडकलेले पैसे परत मिळू शकतात. आर्थिक परिस्थितीत सुधारणा होईल. उत्पन्न वाढण्याचे संकेत असून नोकरीत पदोन्नती मिळू शकते. भागीदारीतूनही फायदा होऊ शकतो. भौतिक सुख सुविधांमध्ये वाढ होईल. प्रेमसंबंध अधिक चांगले होतील. जोडीदारासोबत आनंददायी वेळ घालवता येईल.

तूळ

आत्मविश्वासाची कमतरता जाणवू शकते. काही कामांमध्ये यश मिळेल, तर काही कामांमध्ये अडथळे येऊ शकतात. उत्पन्न सुरू राहील; मात्र पैशांशी संबंधित निर्णय घेताना भावनिक होणे टाळा. खर्च वाढू शकतात. विरोधकांवर मात करण्याची आणि न्यायालयीन प्रकरणांमध्ये यश मिळण्याची शक्यता आहे. व्यवसायात यश मिळेल.

वृश्चिक

हा काळ चढ-उतारांचा ठरू शकतो. मानसिक तणाव जाणवू शकतो. कामावर लक्ष केंद्रित केल्यास फायदा होईल. आर्थिक व्यवहारांमध्ये विशेष सावधगिरी बाळगा. कोणताही निर्णय घाईघाईने घेऊ नका. व्यवसायाची स्थिती काहीशी कमकुवत राहू शकते. नफा मिळवण्यासाठी अधिक प्रयत्न करावे लागतील.

धनु

न्यायालयीन प्रकरणांशी संबंधित अडचणींचा सामना करावा लागू शकतो. आरोग्याच्या समस्या जाणवू शकतात. आर्थिक परिस्थिती चांगली राहील. उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होतील. बोलताना शब्दांचा वापर जपून करा. रागावर नियंत्रण ठेवा. एखादे रखडलेले काम पूर्ण होईल. व्यवसायात चांगली परिस्थिती राहील. नवीन करार करण्याची संधी मिळू शकते.

मकर

आरोग्यात चढ-उतार होऊ शकते. मेहनतीचे योग्य फळ मिळेल. कामांमध्ये यश मिळेल. कार्यक्षेत्रात स्वतःची क्षमता सिद्ध करण्याच्या संधी मिळतील. नातेसंबंधांमध्ये काही अडचणी येऊ शकतात. समन्वय राखण्याचा प्रयत्न करा. नवीन कामाची सुरुवात करण्यासाठी हा काळ चांगला ठरू शकतो. आर्थिक परिस्थितीही अनुकूल राहिल.

कुंभ

आर्थिक परिस्थितीत चढ-उतार होतील. पैसे मिळतील; मात्र खर्चही वाढण्याची शक्यता आहे. भागीदारीत अडचणी येऊ शकतात, त्यामुळे सावध राहा. वादविवादांपासून दूर राहा. केवळ नशिबावर अवलंबून न राहता कामांमध्ये योग्य नियोजन आणि प्रयत्नांवर भर द्या.

मीन

सकारात्मक ऊर्जा कायम राहील. कामांमध्ये यश मिळेल. आर्थिक लाभ होऊ शकतो. मानसिक तणाव जाणवू शकतो. नशिबाची साथ मिळेल. अडकलेले पैसे परत मिळू शकतात. भागीदारीतून फायदा होऊ शकतो. तुमचे प्रयत्न यशस्वी ठरतील. कुटुंबातील सदस्यांमध्ये चांगला समन्वय राहील.

(डिस्क्लेमर: सदर लेखातील माहिती केवळ ज्योतिषशास्त्रीय गृहीतके आणि उपलब्ध माहितीवर आधारित आहे. आम्ही यातील तथ्यांची किंवा दाव्यांची पुष्टी करत नाही. अंधश्रद्धेला प्रोत्साहन देणे हा आमचा हेतू नाही.)

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us