AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Karjat Forest Tree Cutting : मनसे मैदानात उतरली, थेट राज ठाकरेंनीच कर्जतच्या जंगलाचा विषय हातात घेतला, आता थेट 28 तारखेला..मोठी घोषणा

Karjat Forest Tree Cutting : "निसर्गाचा ऱ्हास करून कोणताही विकास करायचा नाही. मुख्यमंत्री काय देव आहेत का ते बोलतात ते सगळ बरोबर असतं का?. 1975 साली बनवलेली एक चित्रफित आहे ती ट्विट केली आहे. सरकारने बनवलेली चित्रफित सरकारनेच बघावी"

Karjat Forest Tree Cutting : मनसे मैदानात उतरली, थेट राज ठाकरेंनीच कर्जतच्या जंगलाचा विषय हातात घेतला, आता थेट 28 तारखेला..मोठी घोषणा
Karjat Forest Tree Cutting MNS
| Updated on: Oct 26, 2026 | 11:18 AM
Share

कर्जतमधील वृक्षतोडीचा मुद्दा तापत चालला आहे. टोरेंट कंपनीसाठी ही वृक्ष तोड सुरु आहे. विरोधक या मुद्यावरुन चांगलेच आक्रमक झाले आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने सुद्धा या मुद्याची गंभीर दखल घेतली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे येत्या 28 तारखेला कर्जत दौऱ्यावर जाणार आहेत. कर्जत तालुक्यातील भीमा शंकरला भेट देणार आहेत. ग्रामस्थ आणि आदिवासी नागरिकांशी चर्चा करणार आहेत. त्यानंतर संध्याकाळी पाच वाजता पोलीस ग्राउंडला सभा घेणार आहेत. गुजरातच्या कंपनीसाठी झाडांची तोड सुरू असल्याचा आरोप संदीप देशपांडे यांनी केला आहे. कर्जतमधील जंगलात आतापर्यंत 2 हजार 75 झाडे तोडल्याचा दावा करण्यात येतोय.

वृक्षतोडीला परवानगी कशी दिली? असा मनसेचा सवाल आहे. 90 हजार झाडे लावण्यासाठी जागा कुठून आणणार? संदीप देशपांडे यांचा प्रश्न. “दिल्लीतील दोन लोक सह्याद्रीचं भविष्य ठरवणार नाहीत,” अशी टीका केली. निसर्गाचा ऱ्हास करून कोणताही विकास नको, अशी मनसेची भूमिका आहे. 28 ऑक्टोबरला राज ठाकरे कर्जतमध्ये जंगलाची पाहणी करणार. त्यानंतर जाहीर सभा घेणार आहेत. वृक्षतोडीविरोधात 28 ऑक्टोबरला पूर्ण ताकदीने आंदोलन करणार असल्याचा मनसेने इशारा दिला आहे.

गुजरातच्या कंपनीसाठी ही झाड तोडतायत

“गुजरातच्या कंपनीसाठी ही झाड तोडतायत. 28 तारखेला राज ठाकरे कर्जतमध्ये सभा घेणार आहेत. 28 तारखेला जंगालात राज ठाकरे पाहाणी करणार आहेत. 2075 झाडे कापली आहेत. अजून काही झाडं कापणार असा स्थानिकांचा आरोप आहे. ही झाडं तोडायला कशी परवानगी दिली” असा सवाल संदीप देशपांडे यांनी विचारला.

वृक्षतोडीला तुम्ही कशी परवानी देताय?

“वृक्ष तोड ही वैध कशी आहे?. वृक्षतोडीला तुम्ही कशी परवानी देताय? त्या गावातील लोकांना रस्ता करताना परवानगी देत नव्हते. 90 हजार झाडे लावायला जागा कुठे आहे?. दिल्लीत बसलेले दोन लोक सह्याद्रीचं भविष्य ठरवणार नाही. निसर्गाचा ऱ्हास करून कोणताही विकास नकोय” असं संदीप देशपांडे म्हणाले.

याचं थोबाड उघडून उत्तर द्याच

“विदारक दृश्य आहे. मन विषण्णं करणारी जंगल तोड तिथे झाली. 150 वर्षांपासून असलेली झाडे तोडून टाकली. हा कुठला विकास आहे? ज्यात आयुर्वेदिक झाडं कापली. मुख्यमंत्री म्हणताना ग्रीन प्रोजेक्ट आहे. झाड कापून कुठलं ग्रीन प्रोजेक्ट मुख्यमंत्री करणार?” अशी टीका मनसेकडून करण्यात आली. “ग्रामपंचायतीने कोणताही ठराव केलेला नाही. वृक्ष तोडीला परवानगी कशी देता?. ती वैध कशी झाली याचं थोबाड उघडून उत्तर द्याच” असं संदीप देशपांडे म्हणाले.

Follow Us
मी पक्षाची बाजू मांडली, इतर नेते... रामदास कदमांनी एकनाथ शिंदेंकडे....
Ramdas Kadam : मी पक्षाची बाजू मांडली, इतर नेते... रामदास कदमांनी एकनाथ शिंदेंकडे नाराजी व्यक्त केली
SIT चं खेळणं आम्हाला काय दाखवताय...; जरांगे प्रकरणावरून राऊतांचा....
Sanjay Raut : SIT चं खेळणं आम्हाला काय दाखवताय...; मनोज जरांगे प्रकरणावरून संजय राऊतांचा सरकारवर हल्लाबोल
मनोज जरांगे यांच्या ऑडिओ क्लिपवर बच्चू कडू नेमकं काय म्हणाले?
Bachchu Kadu : मनोज जरांगे यांच्या ऑडिओ क्लिपवर बच्चू कडू नेमकं काय म्हणाले?
संजय राऊतांनी लिहिलं गृहमंत्री अमित शाह यांना पत्र; पत्रास कारण....
Sanjay Raut : संजय राऊतांनी लिहिलं केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना पत्र; पत्रास कारण....
शिवसेना पक्ष-चिन्हाचा फैसला लांबणीवर; खटल्याची पुढील तारीख अखेर ठरली
Shivsena : शिवसेना पक्ष-चिन्हाचा फैसला लांबणीवर; खटल्याची पुढील तारीख अखेर ठरली
कर्जत-भीमाशंकरमध्ये 32 हजार झाडांवर कुऱ्हाड? विवेकानंद पाटील म्हणाले
Vivekanand Patil : कर्जत-भीमाशंकरमध्ये 32 हजार झाडांवर कुऱ्हाड? विवेकानंद पाटील म्हणाले, शेवटपर्यंत....
कर्जत-भीमाशंकरमधील वृक्षतोडीविरोधात राज ठाकरे आक्रमक; आदित्य ठाकरेही..
Bhimashankar Tree Cutting : कर्जत-भीमाशंकरमधील वृक्षतोडीविरोधात राज ठाकरे आक्रमक; आदित्य ठाकरेही आज करणार पाहणी
इचलकरंजीत कमी दरात PME बस सेवा सुरु; नागरिकांना मोठा दिलासा
Ichalkaranji Bus : इचलकरंजीत कमी दरात PME बस सेवा सुरु; नागरिकांना मोठा दिलासा
गोकुळ अध्यक्षपदासाठी महायुती उमेदवार देणार? चर्चांना उधाण
Gokul Election | गोकुळ अध्यक्षपदासाठी महायुती उमेदवार देणार? कोल्हापूरच्या राजकारणात चर्चांना उधाण
खरगेंच्या त्या वक्तव्याने भाजप आक्रमक; मोदींच्या वडिलांबाबतच्या....
Mallikarjun Kharge : खरगेंच्या त्या वक्तव्याने भाजप आक्रमक; मोदींच्या वडिलांबाबतच्या टिप्पणीवर देशभरात आंदोलनं