Astrology 2025 : 500 वर्षानंतर जुळून येत आहे असा योग, तीन राशींसाठी येणार सोनेरी दिवस

आषाढ महिन्याचा शेवट आणि श्रावण महिन्याचं आगमन होत असताना ग्रहांचा दुर्मिळ योग जुळून येत आहे. यामुळे राशीचक्रावर परिणाम होणार यात काही शंका नाही. पण तीन राशीच्या जातकांना या स्थितीचा लाभ मिळणार आहे. 500 वर्षानंतर असा योग जुळून येत आहे.

Astrology 2025 : 500 वर्षानंतर जुळून येत आहे असा योग, तीन राशींसाठी येणार सोनेरी दिवस
Astrology 2025 : 500 वर्षानंतर जुळून येत आहे असा योग, तीन राशींसाठी येणार सोनेरी दिवस
| Updated on: Jul 12, 2025 | 5:58 PM

ज्योतिषशास्त्रानुसार ग्रहांची स्थिती बदलली की राशीचक्रावर परिणाम होतो. त्या त्या राशीच्या जातकांना कर्मानुसार फळं भोगावी लागतात. त्यामुळे ज्योतिष्यांचं लक्ष ग्रहांच्या हालचालींवर लागून असतं. असाच दुर्मिळ योग ग्रहमंडळात जुळून आला आहे. 500 वर्षानंतर आषाढ-श्रावण महिन्यात एकत्रितपणे तीन योग जुळून येत आहेत. यात ग्रहांचा राजा सूर्य आणि बुधाच्या युतीमुळे बुधादित्य योग, शुक्र स्वत:च्या राशीत येणार असल्याने मालव्य योग आणि 26 जुलैला गुरु आणि शुक्राची युती मिथुन राशीत होत आहे. यामुळे गजलक्ष्मी योग तरायर होत आहे. यामुळे काही राशींचं नशिब चमकणार आहे. तसेच अचानक धनलाभ होऊ शकतो. चला जाणून घेऊयात लकी राशींबाबत…

धनु : या राशीच्या जातकांना तीन योग लाभदायी ठरणार आहेत. कारण या राशीच्या सातव्या स्थानात गजलक्षमी योग तयार होत आहे. तसेच गुरुची सप्तम स्थानावरील दृष्टीचा सकारात्मक प्रभाव पडेल. या कालावधीत वैवाहिक जीवन चांगलं राहील. तसेच अविवाहीत लोकांना काही स्थळं चालून येतील. नोकरी करणाऱ्या जातकांना काही चांगल्या ऑफर येतील. त्यामुळे प्रगतीचे अनेक मार्ग या कालावधीत खुले होतील.

मिथुन : या राशीसाठीही तीन योग फलदायी ठरतील. एकतर या राशीतच गजलक्ष्मी राजयोग तयार होत आहे. त्यामुळे आत्मविश्वास दुणावलेला राहील. तसेच या कालावधीत आर्थिक स्थिती झपाट्याने सुधारेल. समाजात मानसन्मान वाढेल. तसेच विदेशात जाण्याचा योगही जुळून येईल. नव्या लोकांच्या भेटीगाठी होतील. या ओळखीचा तुम्हाला निश्चितच फायदा होईल. उद्योगधंद्यात भरभराट होईल.

कर्क : या राशीच्या ग्रहांची स्थिती अनुकूल ठरणार आहे. कारण बुध आणि सूर्याची युती या राशीत होत आहे. बुधादित्य हा योग सर्वात प्रभावी मानला जातो. यामुळे अभ्यास आणि ज्ञानाच्या क्षेत्रात असलेल्या जातकांना फायदा होईल. करिअरमध्ये नवी उंची गाठण्याची संधी मिळेल. आतापर्यंत ठरवलेल्या गोष्टी मनासारख्या होतील. यामुळे समाजात तुमच्या प्रती आदराची भावना निर्माण होईल.

( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)