हनुमान जयंतीला पंचग्रही योग, तब्बल 57 वर्षांनी आली अशी संधी, या राशींचा वाईट काळ संपला, आता फक्त नशीब धावणार

12 एप्रिल शनिवारी सर्वत्र मोठ्या उत्साहात हनुमान जयंती साजरी केली जाणार आहे. या दिवशी चैत्र पौर्णिमेसोबतच वैशाख स्नानाला देखील प्रारंभ होणार आहे.

हनुमान जयंतीला पंचग्रही योग, तब्बल 57 वर्षांनी आली अशी संधी, या राशींचा वाईट काळ संपला, आता फक्त नशीब धावणार
| Updated on: Apr 09, 2025 | 10:08 PM

12 एप्रिल शनिवारी सर्वत्र मोठ्या उत्साहात हनुमान जयंती साजरी केली जाणार आहे. या दिवशी चैत्र पौर्णिमेसोबतच वैशाख स्नानाला देखील प्रारंभ होणार आहे. दर वर्षी चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षातील पौर्णिमेला हनुमान जयंती साजरी करण्यात येते. या तिथीला हनुमानांचा जन्म झाला होता, असं मानलं जातं, त्यामुळे दरवर्षी या तिथीला त्यांची जंयती साजरी करण्यात येते. हिंदू धर्म शास्त्रानुसार जगात सात चिरंजीव आहेत, त्यामध्ये हनुमानांचा देखील समावेश होतो. यावर्षी तब्बल 57 वर्षांनी हनुमान जयंतीला ग्रहांचा खूपच दुर्लभ योग बनला आहे. हा योग अनेक राशींसाठी शुभ ठरणार आहे. या राशींच्या हाती मोठा जॅकपॉट लागणार आहे, जाणून घेऊयात या राशींबद्दल

या वर्षी हनुमान जंयतीला तब्बल 57 वर्षांनंतर पंचग्रही योग बनत आहे. यापूर्वी असा योग 1968 साली बनला होता. एकाच राशीमध्ये मीन राशीमध्ये सूर्य, शनि देव, राहु, शुक्र आणि बुध हे ग्रह येणार आहेत. या पंचग्रही योगासोबतच लक्ष्मी नारायण योग, मालव्य योग, बुधादित्य योग, त्रिग्रही योग यासोबतच अनेक शुभ योग या काळात तयार होणार आहेत, ज्यामुळे अनेक राशींचं भाग्य उजळणार आहे.

मिथुन राशी – हनुमान जयंतीला पंचग्रही योग बनत आहे. या ग्रहस्थितीचा मिथुन राशींच्या लोकांना मोठा फायदा होणार आहे, या राशींवर हनुमानजींची विशेष कृपा राहणार आहे. ज्यामुळे या राशींच्या लोकांना प्रगतीच्या नव्या संधी मिळणार आहेत. मित्र आणि तुमच्या कामाच्या ठिकाणी सहकाऱ्यांची तुम्हाला खूप मदत होणार आहे. प्रमोशनचा योग आहे, तसेच उत्पन्नाचं एखादं दुसरं साधन देखील मिळू शकतं.

कन्या राशी – हनुमान जयंतीला पंचग्रही योग बनत आहे.तो जसा मिथुन राशीला शुभ आहे, तसाच कन्या राशीला देखील शुभ आहे. कन्या राशीवर देखील हनुमानजींची विशेष कृपा राहणार आहे. व्यवसायात मोठा फायदा होणार आहे. नोकरीमध्ये प्रमोशनचा योग आहे. मकर राशीला देखील या ग्रहस्थितीचा मोठा फायदा होणार आहे.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)