सुर्य, शनिचा शक्तिशाली राजयोग; आजपासून ‘या’ राशींचा गोल्डन टाईम सुरू

शनि आणि सुर्याचा शक्तिशाली राजयोग तयार झाला असून, या राजयोगामुळे चार राशींच्या लोकांचं भाग्य चमकणार आहे. त्यांना मोठा फायदा होण्याची शक्यता आहे.

सुर्य, शनिचा शक्तिशाली राजयोग; आजपासून या राशींचा गोल्डन टाईम सुरू
| Updated on: Jun 23, 2025 | 8:21 PM

वैदिक ज्योतिषशास्त्रामध्ये सूर्याला ग्रहांचा राजा मानलं जातं. तर शनि देवांना कर्मफळ दाता म्हणून ओळखलं जातं. सूर्य दर महिन्याला आपली राशी बदलतो. तर शनि देवाला आपलं एक गोचर पूर्ण करण्यासाठी अडीच वर्ष लागतात. सुर्य देवाने सोमवारी मिथुन राशीमधून मीन राशीमध्ये प्रवेश केला आहे, त्यामुळे ते आता इथे 90 अंशाच्या कोणात स्थिर होणार आहेत, हे दोन्ही शक्तिशाली ग्रह आहेत, या दोन्ही ग्रहांना एकमेकांचे शत्रू ग्रह म्हणून देखील ओळखलं जातं. मात्र सूर्य देवानं आता मीन राशीमध्ये प्रवेश केल्यानं विशेष योग तयार होत आहे, या योगाचा चार राशींना मोठा फायदा होणार आहे, जाणून घेऊयात या चार भाग्यशाली राशी नेमक्या कोणत्या आहेत ते?

मेष रास – सूर्य आणि शनि केंद्र योगाचा मेष राशींच्या लोकांना मोठा फायदा होणार आहे. हा योग या राशींच्या लोकांसाठी अत्यंत शुभ असणार आहे. पर्सनल आणि प्रोफेशनल लाईफमध्ये तुमचं नशीब चमकणार आहे. व्यापारामध्ये तुम्हाला मोठं यश मिळू शकतं, तसेच व्यापाच्या निमित्तानं तुम्हाला परदेश दौरा देखील करावा लागण्याची शक्यता आहे.

कर्क रास – कर्क राशीसाठी हा योग अत्यंत फलदायी आहे, तुमचं जर गेल्या अनेक दिवसांपासून एखादं महत्त्वाचं काम अडलं असेल तर ते या काळात पूर्ण होण्याचा योग बनत आहे. तसेच या काळात काही अनोळखी ठिकाणांवरून तुम्हाला आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. हा काळ तुमच्यासाठी एवढा शुभ आहे की, तुमच्या कामांमध्ये तुम्हाला आतापर्यंत ज्या अडचणी येत होत्या, त्या सर्व अडचणी आता दूर होणार आहेत. नोकरीमध्ये देखील प्रमोशनचा योग आहे.

तुळ रास – तुळ राशीवाल्या लोकांसाठी देखील शनि देव आणि सुर्य देवांचा हा विशेष योग खूप शुभ ठरणार आहे, अनेक सकारात्मक बदल या काळात तुमच्या आयुष्यात होणार आहेत. त्यामुळे तुम्ही आनंदी असणार आहात. उत्पन्नाचे नव स्त्रोत या काळात तुम्हाला उपलब्ध होऊ शकतात. व्यवसायात देखील मोठा फायदा होणार आहे.

धनु रास – धनु राशींच्या लोकांसाठी देखील सुर्य आणि शनि देवांचा हा योग खूपच फलदायी आहे. या लोकांचं नशीब चमकणार आहे.विविध क्षेत्रात मोठा फायदा या लोकांना होऊ शकतो.

( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)