AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

14 एप्रिलपासून महिनाभरासाठी सूर्य राहुची युती, ग्रहण योगामुळे चार राशींचं वाढणार टेन्शन

या वर्षातलं पहिलं सूर्यग्रहण 20 एप्रिल 2023 रोजी मेष राशीत होणार आहे. दुसरीकडे त्यापूर्वीच ग्रहण योगाची स्थिती मेष राशीत निर्माण होणार आहे. महिनाभरासाठी हा योग असणार आहे.

14 एप्रिलपासून महिनाभरासाठी सूर्य राहुची युती, ग्रहण योगामुळे चार राशींचं वाढणार टेन्शन
सूर्य आणि राहुची मेष राशीत युती, ग्रहण योगामुळे तीन राशींच्या अडचणीत होणार वाढ
| Updated on: Apr 11, 2023 | 2:48 PM
Share

मुंबई – ज्योतिषशास्त्रानुसार चंद्र आणि सूर्य जेव्हा राहु-केतुच्या संपर्कात येतात तेव्हा ग्रहण योगाची स्थिती निर्माण होते. सूर्य महिनाभरानंतर एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतो. तर चंद्र दर सव्वा दोन दिवसांनी राशी बदल करतो. त्यामुळे हे दर सूर्य दर सहा महिन्यांनी आणि चंद्र महिन्यातून दोन या ग्रहांच्या संपर्कात येतो. आता 14 एप्रिल 2023 रोजी राहु आणि सूर्याची युती मेष राशीत होणार आहे. त्यामुळे ग्रहण योग तयार होणार आहे. हा योग ज्योतिषशास्त्रात अशुभ योग म्हणून गणला जातो. त्यात शनिची तिसरी दृष्टी सूर्यावर पडणार आहे. त्यामुळे महिना खडतर जाईल. खासकरून 20 एप्रिल ते 28 एप्रिल हा कालावधी त्रासदायक ठरणार आहे.

19 एप्रिल रोजी चंद्र मीन राशीतून मेष राशीत प्रवेश करणार आहे. त्यामुळे सूर्य आणि चंद्र हे दोन्ही ग्रह राशीच्या विळख्यात येणार आहे. त्यामुळे ही 22 एप्रिल 2023 पर्यंत असणार आहे. 22 एप्रिल 2023 रोजी चंद्र सकाळी 5 वाजून 2 मिनिटांनी वृषभ राशीत प्रवेश करेल. त्यानंतर चंद्राचं ग्रहण सुटेल, पण सूर्याचं ग्रहण 14 मे पर्यंत राहणार आहे. चला जाणून घेऊयात चार राशींबाबत.

या चार राशींना बसणार फटका

वृषभ – ग्रहण योगाचा अशुभ परिणाम वृषभ राशीच्या जातकांना बसणार आहे. कारण या राशीच्या 12 व्या म्हणजेच व्यय स्थानात ग्रहण योग असणार आहे. त्यामुळे अकारण पैशांची उधलण होईल. तसेच खोटे आरोपही तुमच्यावर लागू शकतात. त्यामुळे सावधपणे पावलं उचला. 20 एप्रिल ते 28 एप्रिल दरम्यान अति महत्त्वाची कामं करू नका. कारण एखादा करार तुमच्यासाठी नुकसानदायक ठरू शकतो.

कन्या – या राशीच्या अष्टम भावात सूर्य आणि राहुच्या युतीमुळे ग्रहण योग तयार होत आहे. त्यामुळे आरोग्याबाबत काळजी घेणं गरजेचं आहे. विनाकारण डॉक्टरांकडे फेऱ्या माराव्या लागू शकतात. तसेच मोठ्या प्रमाणात पैसे खर्च होतील. हृदयविकाराच्या रुग्णांनी या काळात काळजी घेणं गरजेचं आहे. धंद्यात एखादा मोठा फटका बसू शकतो. त्यामुळे कोणताही निर्णय घेताना काळजी घ्या.

वृश्चिक – या राशीच्या षष्टम भावात सूर्य आणि राहुची युती तयार होत आहे. त्यामुळे आजार, शत्रू, भीती, न्यायालयीन प्रकरणात अडकू शकता. यासाठी 20 एप्रिल ते 28 एप्रिल या कालावधीत काळजी घेणं गरजेचं आहे. हितशत्रू तुमच्यावर डाव साधून तुम्हाला अडकवण्याचा प्रयत्न करतील. न्यायालयीन प्रकरणात काळजी घेणं गरजेचं आहे. त्यामुळे कौटुंबिक वातावरण गढूळ होईल. त्यामुळे या काळात शांत राहणाच्या जास्तीत जास्त प्रयत्न करा.

कुंभ – या राशींच्या जातकांच्या तिसऱ्या स्थानात राहु आणि सूर्याची युती होईल. त्यामुळे कोणतंही काम करताना सावधगिरी बाळगा. कारण एखादा निर्णय तुमच्या अंगलट येऊ शकतो. व्यवसायात कोणालाही उधार देऊ नका. कारण पैसे परत मिळणं कठीण होईल. वैवाहित जीवनात कलह वाढू शकतात. त्यामुळे जोडीदारासोबत चांगाल संवाद ठेवा. अन्यथा वाद विकोपाला जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट, व्हिडीओ आले समोर
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले...
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले, शुगर असलेल्यांनीच...
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ व्हायरल
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा..
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा मोठा दावा
ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
Disha Salian Case : ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरेंच्या वकिलांनी...
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरे यांच्या वकिलांनी... सतीश सालियान यांनी दिला 7 दिवसांचा अल्टिमेटम
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील बड्या नेत्याची प्रतिक्रिया, नेमकं...
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील बड्या नेत्याची प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
पाऊस गायब, पाण्याची चिंता वाढली; विक्रम पाचपुतेंनी सुचवला कृत्रिम...
पाऊस गायब, पाण्याची चिंता वाढली; विक्रम पाचपुतेंनी सुचवला कृत्रिम पावसाचा पर्याय
UPI शुल्कावर राज ठाकरेंचा संताप; म्हणाले, ‘डिजिटल सापळ्यात...
UPI शुल्कावर राज ठाकरेंचा संताप; म्हणाले, 'डिजिटल सापळ्यात’ नागरिकांना अडकवले
नांदेडमध्ये कृषिमंत्र्यांच्या ताफ्यासमोर शेतकऱ्यांची घोषणाबाजी
Nanded | नांदेडमध्ये कृषिमंत्र्यांच्या ताफ्यासमोर शेतकऱ्यांची घोषणाबाजी