
ज्योतिषशास्त्रात (Astrology) जन्मकुंडलींद्वारे वेगवेगळ्या कालखंडांबद्दल भाकीतं केली जातात. दैनंदिन राशीभविष्य हे रोजच्या घडामोडींचे अंदाज देते, तर साप्ताहिक, मासिक आणि वार्षिक राशीभविष्य यामध्ये अनुक्रमे येता आठवडा, महिना आणि वर्षाचा अंदाज असतो. दैनिक राशिफल (Horoscope Today 25 December 2025) हे ग्रह-नक्षत्रांच्या हालचालीवर आधारित एक भविष्यवाणी आहे, ज्यामध्ये सर्व राशींचे (मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनू, मकर, कुंभ आणि मीन) तपशीलवार वर्णन केले आहे. ही कुंडली काढताना ग्रह-नक्षत्रांसह पंचांगाच्या समीकरणाचे विश्लेषण केले जाते. दैनंदिन राशीभविष्य तुम्हाला नोकरी, व्यवसाय, व्यवहार, कुटुंब आणि मित्रांसोबतचे संबंध, आरोग्य आणि दिवसभरातील शुभ-अशुभ घटनांचे भाकीत देते.
मेष राशीच्या लोकांना आज नवीन काम सुरू करताना काही अडचणी येऊ शकतात. कुटुंबातील सदस्याचे आरोग्य बिघडण्याची शक्यता आहे. नोकरीत सहकाऱ्यांशी कामावरून वाद होऊ शकतात. खर्च वाढल्याने आणि कौटुंबिक समस्यांमुळे मानसिक ताण जाणवेल.
वृषभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस आरोग्याच्या दृष्टीने सामान्य राहील. कार्यक्षेत्रात यशाचे योग आहेत. भागीदारासोबत नवीन व्यवसाय सुरू करण्याची योजना आखाल. ज्यात यश मिळेल. कामानिमित्त प्रवासाला जावे लागू शकते. कुटुंब, पत्नी आणि मुलांसोबत वेळ आनंदात जाईल.
मिथुन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस आनंदाची बातमी घेऊन येईल. एखादी नवीन संधी तुमची वाट पाहत आहे. मित्राच्या मदतीने मोठ्या संस्थेत काम करण्याची संधी मिळू शकते. ज्यामुळे आर्थिक स्थिती मजबूत होईल. हवामानातील बदलांमुळे होणाऱ्या आजारांपासून सावध राहा.
कर्क राशीच्या लोकांना आज जीवनशैलीत काही बदल करावे लागतील. कार्यक्षेत्रात बदल करणे तुमच्या हिताचे ठरेल. एखाद्या खास व्यक्तीच्या भेटीमुळे तुमची रखडलेली कामे मार्गी लागतील. आर्थिक सुधारणा होईल. अधिकाऱ्यांशी संबंध चांगले राहतील, मात्र कुटुंबातील कोणाचे तरी आरोग्य बिघडू शकते.
सिंह राशीच्या लोकांना आजचा दिवस जपून चालण्याचा आहे. प्रवासात आपल्या सामानाची आणि पैशांची काळजी घ्या, अन्यथा नुकसान होऊ शकते. कोणतीही मोठी ऑफर मिळाल्यास विचारपूर्वक गुंतवणूक करा. कुटुंबात अंतर्गत वादांमुळे मानसिक त्रास होण्याची शक्यता आहे.
कन्या राशीच्या लोकांसाठी व्यापारात मोठी गुंतवणूक करण्याची योजना आखू शकता, ज्यातून लाभाचे योग आहेत. मालमत्ता खरेदीचे विचार मनात येतील. आरोग्याची काळजी घ्या. हंगामी आजारांचा फटका बसू शकतो. पत्नी आणि मुलांच्या भविष्यासाठी मोठा निर्णय घ्यावा लागेल.
तूळ राशीच्या लोकांसाठी नवीन मोठे काम सुरू करण्यासाठी आजचा दिवस चांगला आहे. यात कुटुंब आणि मित्रांचे पूर्ण सहकार्य मिळेल. बोलण्यावर संयम ठेवा आणि वादांपासून दूर राहा, अन्यथा बनलेले काम बिघडू शकते. पत्नी आणि मुलांच्या प्रकृतीमुळे आर्थिक बजेट कोलमडू शकते.
वृश्चिक राशीच्या लोकांसाठी आज तुमचे मन अशांत राहू शकते. कुटुंबातील जवळच्या व्यक्तीबद्दल वाईट बातमी मिळण्याची शक्यता आहे. तब्येत खालावल्यासारखी वाटेल. उत्पन्नाच्या बाबतीत नुकसान सहन करावे लागू शकते. भागीदारीत दुरावा येण्याची शक्यता असून मालमत्तेच्या वादातून न्यायालयीन प्रकरणांना सामोरे जावे लागेल.
धनु राशीच्या व्यक्तींनी आज लांबचा प्रवास करताना वाहन सावधगिरीने चालवा, दुखापत होण्याची शक्यता आहे. व्यवसायात मोठी गुंतवणूक करणे आज टाळावे. नवीन वाहन खरेदीचे योग आहेत. काही कारणास्तव तुम्हाला पत्नी आणि मुलांसह दुसऱ्या ठिकाणी स्थलांतरित व्हावे लागू शकते.
मकर राशीच्या लोकांना मुलांच्या शिक्षणाबाबत आज चिंता राहील. पत्नी आणि मुलांच्या हितासाठी कठोर निर्णय घ्यावे लागतील. संसर्गजन्य आजारांपासून सावध राहा. कौटुंबिक वादात पडू नका, अन्यथा नुकसान तुमचेच होईल.
कुंभ राशीसाठी आजचा दिवस कुटुंबासाठी खूप आनंददायी असेल. बऱ्याच दिवसांनी तुम्ही बाहेर फिरायला जाल, ज्यामुळे घरातील वाद मिटतील. कार्यक्षेत्रात भागीदारांचे सहकार्य मिळेल आणि आर्थिक लाभ होईल. घरात मंगलकार्याचे योग जुळून येतील.
मीन राशीचे लोकांना आज धार्मिक यात्रेला जाण्याचे योग आहेत. व्यवसायात लाभाची स्थिती राहील. प्रवासात स्वतःच्या सामानाची सुरक्षा करा. कुटुंबात पालकांचे आरोग्य बिघडू शकते आणि पत्नीसोबत मतभेद होण्याची शक्यता आहे.
(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)