ज्योतिषशास्त्रात (Astrology) जन्मकुंडलींद्वारे वेगवेगळ्या कालखंडांबद्दल भाकीतं केली जातात. दैनंदिन राशीभविष्य हे रोजच्या घडामोडींचे अंदाज देते, तर साप्ताहिक, मासिक आणि वार्षिक राशीभविष्य यामध्ये अनुक्रमे येता आठवडा, महिना आणि वर्षाचा अंदाज असतो. दैनिक राशिफल (Horoscope Today 28 December 2025 ) हे ग्रह-नक्षत्रांच्या हालचालीवर आधारित एक भविष्यवाणी आहे, ज्यामध्ये सर्व राशींचे (मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ आणि मीन) तपशीलवार वर्णन केले आहे. ही कुंडली काढताना ग्रह-नक्षत्रांसह पंचांगाच्या समीकरणाचे विश्लेषण केले जाते. दैनंदिन राशीभविष्य तुम्हाला नोकरी, व्यवसाय, व्यवहार, कुटुंब आणि मित्रांसोबतचे संबंध, आरोग्य आणि दिवसभरातील शुभ-अशुभ घटनांचे भाकीत देते.
मेष राशी (Aries Daily Horoscope)
आज नव्या कल्पना सुचतील. हाती घेतलेल्या कामांमुळे तुम्हाला अपेक्षेपेक्षा जास्त फायदा होऊ शकतो. मातीच्या व्यवसायात गुंतलेल्यांसाठी आजचा दिवस फायदेशीर ठरेल.
वृषभ राशी (Taurus Daily Horoscope)
आजचा संपूर्ण दिवस पालकांसोबत निवांत वेळ घालवाल. तुमच्या हाताने काही बनवून घरातल्याना खायला घालाल, आनंद वाढेल. सुटीचा दिवस निवांत जाईल.
मिथुन राशी (Gemini Daily Horoscope)
राजकारणात सहभागी असलेल्यांसाठी हा दिवस उत्तम जाईल; समाजाच्या हितासाठी जे काम कराल, त्याचं कौतुक केलं जाईल. तुम्ही कामाच्या ठिकाणी लोकांशी संपर्कात राहण्याचा आणि त्यांच्याशी सुसंवाद साधण्याचा प्रयत्न कराल, परंतु तुमच्या विचारसरणीत कोणताही बदल होतोय का याचा काळजीपूर्वक विचार करा.
कर्क राशी (Cancer Daily Horoscope)
आज तुमचा दिवस आनंदी वातावरणाने सुरू होईल. तुमचे लक्ष इतरांच्या समस्या सोडवण्यावर असेल, म्हणून वैयक्तिक बाबींकडे दुर्लक्ष करू नका. इतरांकडून मिळणाऱ्या मदतीचा तुम्हाला फायदा होईल.
सिंह राशी (Leo Daily Horoscope)
दुपारपर्यंत तुम्हाला चांगली बातमी मिळू शकते. काही गुप्त शत्रू तुमच्याबद्दल अफवा पसरवतील, नको ते बोलतील. त्यांच्यापासून सावध रहा. तुमची प्रतिभा तुमची प्रतिष्ठा वाढवण्यासाठी उपयुक्त ठरू शकते.
कन्या राशी (Virgo Daily Horoscope)
जर तुम्ही आज तुमचे काम शांतपणे हाताळण्याचा प्रयत्न केला तर ते अडचणींशिवाय वेळेवर पूर्ण होईल. आज तुम्ही जुने कर्ज फेडण्यास अखेर यशस्वी व्हाल. आज तुम्ही इतरांचा मूड समजून घ्य़ाल, त्यांना समाधान वाटेल.
तुळ राशी (Libra Daily Horoscope)
ऑफीसमधल्या कुरघोडींनी जीव नकोसा होईल. तुमचा चांगुलपणा सोडू नका. तुमच्या भावाशी किंवा बहिणीशी एखाद्या मुद्द्यावरून मतभेद होण्याची शक्यता आहे. पण संयम ठेवा. भांडण करणं टाळा.
वृश्चिक राशी (Scorpio Daily Horoscope)
सरकारी कामाबाबात तुम्हाला एखाद्या अनुभवी व्यक्तीकडून सल्ला मिळू शकेल, जो खूप उपयुक्त ठरेल. या राशीच्या ज्या व्यक्ती कोचिंग इन्स्टिट्यूट चालवतात ते आजा कामात उत्तम बदल करतील, त्याचा भविष्यात मोठा फायदा होईल.
धनु राशी (Sagittarius Daily Horoscope)
आज तुम्हाला तुमच्या करिअरबद्दल चांगली बातमी मिळेल, ज्यामुळे घरातील वातावरण उजळेल. तुमचे आरोग्य चांगले राहील. पैशांबद्दल मनात विचार येऊ शकतात, सेव्हिंग चांगली करा. तुमच्या जोडीदारासोबत बाहेर जाण्यासाठी हा चांगला काळ आहे.
मकर राशी (Capricorn Daily Horoscope)
आज थोडी मेहनत केल्यास मोठा नफा मिळण्याची शक्यता आहे. तुमच्या जोडीदाराच्या मदतीने तुमची आर्थिक परिस्थिती सुधारेल. आज तुम्ही एखाद्या कार्यक्रमात जाण्याची योजना आखाल, जिथे तुमची एखाद्या दूरच्या नातेवाईकाशी भेट होऊ शकते.
कुंभ राशी (Aquarius Daily Horoscope)
आज, जुन्या मित्राशी फोनवर बोलणं होईल, ज्यामुळे जुन्या आठवणींना उजाळा मिळेल. भूतकाळातील घटना आठवून तुम्हाला दुःख होऊ शकता. ज्या गोष्टींमुळे तुम्हाला वारंवार पश्चात्ताप झाला आहे त्याबद्दलचे विचार बदलण्याचा प्रयत्न कराल.
मीन राशी (Pisces Daily Horoscope)
आजचा दिवस तुमच्या व्यक्तिमत्त्वात सुधारणा करण्यासाठी चांगला आहे. आरोग्याच्या चिंतांमुळे तुम्ही निराश होऊ शकता. पण त्रास करून घेू नका, त्यातूनही मार्ग निघेल. भविष्याबद्दल सकारात्मक गोष्टींवर लक्ष केंद्रित करण्याचा प्रयत्न करा.
( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)