
ज्योतिषशास्त्रात (Astrology) जन्मकुंडलींद्वारे वेगवेगळ्या कालखंडांबद्दल भाकीतं केली जातात. दैनंदिन राशीभविष्य हे रोजच्या घडामोडींचे अंदाज देते, तर साप्ताहिक, मासिक आणि वार्षिक राशीभविष्य यामध्ये अनुक्रमे येता आठवडा, महिना आणि वर्षाचा अंदाज असतो. दैनिक राशिफल (Horoscope Today 29 December 2025) हे ग्रह-नक्षत्रांच्या हालचालीवर आधारित एक भविष्यवाणी आहे, ज्यामध्ये सर्व राशींचे (मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनू, मकर, कुंभ आणि मीन) तपशीलवार वर्णन केले आहे. ही कुंडली काढताना ग्रह-नक्षत्रांसह पंचांगाच्या समीकरणाचे विश्लेषण केले जाते. दैनंदिन राशीभविष्य तुम्हाला नोकरी, व्यवसाय, व्यवहार, कुटुंब आणि मित्रांसोबतचे संबंध, आरोग्य आणि दिवसभरातील शुभ-अशुभ घटनांचे भाकीत देते.
मेष राशीसाठी आजचा दिवस प्रगतीचा आणि आर्थिक लाभाचा ठरेल. तुमच्या व्यवसायात नवीन संधी उपलब्ध होतील, ज्यामुळे उत्पन्नाचे स्रोत वाढतील. कौटुंबिक जीवनात सुख-शांती नांदेल. एखादे शुभ कार्य करु शकता. प्रवासाचे योग असून तुम्ही एखाद्या धार्मिक तीर्थयात्रेला जाण्याचे नियोजन करू शकता. मात्र, कामाच्या ठिकाणी आपल्या गुप्त शत्रूंपासून आणि विरोधकांपासून सावध राहणे गरजेचे आहे. अन्यथा ते तुमच्या कामात अडथळे आणू शकतात.
वृषभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस अत्यंत उत्साही असणार आहे. तुम्ही नवीन उपक्रम किंवा व्यवसाय सुरु करण्यासाठी पावले उचलल्यास त्यात यश मिळण्याची दाट शक्यता आहे. मित्र परिवार आणि नातेवाईकांकडून तुम्हाला भावनिक आणि व्यावहारिक पाठिंबा मिळेल. कुटुंबासोबत वेळ घालवण्यासाठी तुम्ही एखाद्या सहलीचे नियोजन करु शकता. आज एखाद्या प्रभावशाली व्यक्तीची भेट होईल, जी तुमच्या करिअरमध्ये नफ्याचे नवीन मार्ग उघडण्यास मदत करेल.
मिथुन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस मानसिक शांतता देणारा ठरेल. तुमचे मन प्रसन्न असल्याने तुम्ही कठीण कामेही सहजपणे पूर्ण करु शकाल. तुमच्या बोलण्याच्या कौशल्यामुळे समाजात तुमचा मान वाढेल. प्रलंबित कामे वेगाने मार्गी लागतील. नवीन व्यवसायाची पायाभरणी करण्यासाठी आजचा काळ अनुकूल आहे. मात्र, तुमच्या पत्नीच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. त्यांची वेळीच काळजी घेणे भविष्यातील त्रास टाळण्यास मदत करेल.
कर्क राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस तुमच्यासाठी निर्णायक ठरू शकतो. कामाच्या ठिकाणी तुम्ही काही कठोर किंवा मोठे निर्णय घ्याल, ज्याचे सकारात्मक परिणाम तुम्हाला दीर्घकाळ मिळत राहतील. आर्थिक आघाडीवर थोडी ओढाताण जाणवू शकते, परंतु मित्र आणि सहकारी मदतीसाठी धावून येतील. नवीन प्रकल्पाची जबाबदारी तुमच्यावर सोपवली जाण्याची शक्यता आहे. कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल. नवीन पाहुण्यांच्या आगमनाने घरातील उत्साह द्विगुणित होईल.
सिंह राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस संमिश्र फळ देणारा असेल. व्यवसायाच्या दृष्टीने एखाद्या महत्त्वाच्या व्यक्तीची भेट भविष्यात मोठा आर्थिक फायदा मिळवून देणारी ठरेल. कामाच्या ठिकाणी सहकाऱ्यांकडून अपेक्षेपेक्षा जास्त मदत मिळेल. ज्यामुळे नवीन प्रकल्प वेळेत पूर्ण होईल. कुटुंबात एखादे मंगल कार्य घडण्याची शक्यता असून तुम्ही सहलीचा आनंद घ्याल. नवीन घर किंवा जमीन खरेदी करण्याचे तुमचे स्वप्न आज पूर्ण होण्याच्या दिशेने वाटचाल करेल.
कन्या राशीच्या व्यक्तींसाठी आजचा दिवस काहीसा तणावपूर्ण राहू शकतो. मनामध्ये अज्ञात भीती आणि अस्वस्थता जाणवेल, ज्यामुळे कामावर लक्ष केंद्रित करणे कठीण जाईल. कुटुंबातील एखाद्या सदस्याचे आरोग्य बिघडण्याची शक्यता असल्याने धावपळ होऊ शकते. व्यवसायात गुंतवणुकीचा निर्णय घेताना विचारपूर्वक घ्या, अन्यथा आर्थिक नुकसान सोसावे लागेल. जवळच्या व्यक्तीकडून अपेक्षाभंग होण्याची शक्यता असल्याने मनावर ताबा ठेवा. वाद टाळा.
तूळ राशीच्या व्यक्तींना आज आरोग्याशी संबंधित किरकोळ तक्रारी जाणवू शकतात. त्यामुळे आहाराकडे लक्ष द्या. कामानिमित्त एखादा लांबचा प्रवास करावा लागण्याची शक्यता आहे. जो थकवा देणारा ठरेल. काही विशिष्ट कामे पूर्ण करण्यासाठी तुम्हाला तुमच्या विरोधकांशी तडजोड करावी लागेल किंवा नम्र राहावे लागेल. व्यवसायात पूर्वी केलेल्या गुंतवणुकीतून फायदा मिळण्यास सुरुवात होईल. कौटुंबिक वातावरण सकारात्मक राहील. तुम्हाला सर्वांचा पूर्ण पाठिंबा मिळेल.
वृश्चिक राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस भावनिक आव्हानांचा असेल. जवळच्या व्यक्तीच्या किंवा विशेषतः पालकांच्या अचानक बिघडलेल्या प्रकृतीमुळे तुमची चिंता वाढू शकते. व्यवसायात तुमच्या भागीदाराकडून मिळालेला सल्ला आणि पाठिंबा तुम्हाला संकटातून बाहेर काढण्यास मदत करेल. एखादा मोठा आणि महत्त्वाकांक्षी प्रकल्प तुम्ही आज हाती घ्याल. ज्यामध्ये निश्चित यश मिळेल. मात्र, कामाच्या ठिकाणी होणारे अडथळे दूर करण्यासाठी तुम्हाला तुमच्या वाणीवर आणि रागावर संयम ठेवावा लागेल.
धनु राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस आनंदाची बातमी घेऊन येईल. बऱ्याच काळापासून प्रलंबित असलेली कामे आज यशस्वीपणे पूर्ण होतील. ज्यामुळे तुमचा आत्मविश्वास वाढेल. जुन्या मित्राची भेट झाल्याने आठवणींना उजाळा मिळेल आणि मन प्रसन्न होईल. नवीन प्रकल्प किंवा नोकरीत बदल करण्यासाठी आजचा दिवस उत्तम आहे. कुटुंबात लग्नाचे बोलणे पुढे सरकू शकते. जोडीदाराकडून तुम्हाला भरभरून प्रेम आणि सहकार्य मिळेल.
मकर राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस शारीरिक कष्टाचा आणि धावपळीचा असेल. नवीन कामाची जबाबदारी अंगावर पडल्यामुळे तुम्हाला अधिक मेहनत आणि वेळ द्यावा लागेल. तुमचे सहकारी तुमच्या कामाच्या पद्धतीवर खुश असतील. तुम्हाला सहकार्य करतील. आर्थिक चणचण भासल्यास मित्रांकडून वेळेवर मदत मिळण्याची शक्यता आहे. घरामध्ये नवीन पाहुण्याचे किंवा चिमुकल्याचे आगमन झाल्यामुळे आनंदाची लाट येईल. कौटुंबिक जबाबदाऱ्या वाढतील.
कुंभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस भाग्याचा ठरेल. तुमची जी कामे गेल्या अनेक दिवसांपासून थांबली होती, ती आज पूर्णत्वास जातील. व्यवसायात तुम्हाला एखाद्या मोठ्या कराराची किंवा भागीदारीची संधी मिळू शकते, जी प्रगतीसाठी महत्त्वाची ठरेल. मात्र, वाहन चालवताना किंवा रस्त्यावरून चालताना पूर्ण सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. बदलत्या हवामानामुळे सर्दी-खोकल्यासारखे आजार उद्भवू शकतात, त्यामुळे आरोग्याची काळजी घ्या. वेळेवर औषधे घ्या.
मीन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस थोडा कठीण जाऊ शकतो. चालू असलेल्या कामात अचानक अडथळे आल्यामुळे तुमचा हिरमोड होण्याची शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी विरोधक तुमच्याविरुद्ध सक्रिय राहतील. सहकाऱ्यांशी मतभेद होऊ शकतात. व्यवसायातील व्यवहारात मंदी जाणवेल. त्यामुळे मोठ्या गुंतवणुकीचे निर्णय आज पुढे ढकला. मालमत्तेच्या वादावरून कुटुंबात काही प्रमाणात तणाव निर्माण होऊ शकतो, जो शांततेने सोडवणे हिताचे ठरेल.
(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)