AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Kiran Rao : आमिर खानच्या दुसऱ्या बायकोच्या प्रकृतीबद्दल मोठी अपडेट… रुग्णालयातील फोटो समोर

Kiran Rao : अभिनेता आमिर खान याच्या दुसऱ्या बायकोत्या प्रकृतीबद्दल मोठी अपडेट समोर येत आहे... तिने स्वतः रुग्णालयातील फोटो पोस्ट केला आणि म्हणाली..., सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त किरण राव हिची चर्चा...

Kiran Rao : आमिर खानच्या दुसऱ्या बायकोच्या प्रकृतीबद्दल मोठी अपडेट... रुग्णालयातील फोटो समोर
फिल्ममेकर किरण राव
| Updated on: Dec 29, 2025 | 9:52 AM
Share

Kiran Rao : अभिनेता आमिर खान याची दुसरी पत्नी आणि फिल्ममेकर किरण राव हिच्या प्रकृतीबद्दल मोठी माहिती समोर येत आहे. किरण राव हिच्यावर 12MM डायमीटर अपेंडिक्सची शस्त्रक्रिया झाली आहे. रविवारी स्वतः किरण हिने रुग्णालयातील काही फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. पहिल्या व्हिडीओमध्ये किरण हिने रुग्णालयाबाहेरील दृश्य दाखवले आहेत. एका फोटोमध्ये, तिच्या हातावर एक टॅग दिसत आहे, ज्यावर “किरण आमिर राव खान.” असं लिहिलं आहे. तर दुसऱ्या फोटोमध्ये, ती सेल्फी काढताना दिसते. शेवटच्या फोटोमध्ये, ती सोफ्यावर बसून जेवण खाताना दिसते.

किरण राव ने हॉस्पिटल से की पोस्ट, ‘मी 2026 मध्ये पार्टी करण्यासाठी पूर्ण तयार आहे. तेव्हाच माझ्या अपेंडिक्सने मला सांगितलं की जरा हळू… दिर्घ श्वास घ्या आणि आभारी राहा… मी माझ्या मित्रांचा आणि कुटुंबाचा, आमिर, चार्ल्स आणि अमीनचा खूप आभारी आहे, जे माझ्या मदतीसाठी धावत आले. माझे इतर प्रियजन बहुतेकदा माझे सुजलेले ओठ पाहून हसत होते. ही एक ऍलर्जीक प्रतिक्रिया होती.’

View this post on Instagram

A post shared by Kiran Rao (@raodyness)

किरण पुढे म्हणाली, ‘आता मला डिस्चार्ज मिळाला आहे आणि मी घरी परतली आहे… नव्या वर्षाच्या स्वागतासाठी देखील मी तयार आहे.. 2025 माझ्यासाठी चांगला राहिला… मी आशा करते की 2026 हे वर्ष देखील चांगलं वर्ष राहिल…’ एवढंच नाही तर, किरण हिने डॉक्टर आणि रुग्णालयातील टीमचे देखील आभार मानले.

किरणच्या पोस्टवर आयरा खान आणि अदिती राव हैदरी यांनी लाल हृदयाच्या इमोजीसह कमेंट केली. करण जोहर, झोया अख्तर आणि श्रुती सेठ यांनीही प्रतिक्रिया दिली आणि तिच्या लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना केली.

किरण राव हिच्याबद्दल सांगायचं झालं तर, किरण हिने 2005 मध्ये आमिर याच्यासोबत लग्न केलं. पण 2021 दोघे विभक्त झाले. पण दोघे मिळून मुलगा आझाद याचा सांभाळ करत आहेत. किरणने तिच्या कारकिर्दीला सहाय्यक दिग्दर्शक म्हणून सुरुवात केली. 2024 मध्ये तिचा ‘लापता लेडीज’ हा सिनेमा प्रदर्शित झाला. सिनेमाचं सर्वच स्तरातून कौतुक केलं.

पुण्यात न जिंकणाऱ्या जागा भाजप शिवसेनेला देतंय; धंगेकरांचा गंभीर आरोप
पुण्यात न जिंकणाऱ्या जागा भाजप शिवसेनेला देतंय; धंगेकरांचा गंभीर आरोप.
युतीबाबत निर्णय करा, अन्यथा..; शिंदेंच्या मंत्र्याचा भाजपला थेट इशारा
युतीबाबत निर्णय करा, अन्यथा..; शिंदेंच्या मंत्र्याचा भाजपला थेट इशारा.
आठवलेंच्या नाराजीतही प्रेम, सन्मान केला जाईल! दरेकरांनी दिली ग्वाही
आठवलेंच्या नाराजीतही प्रेम, सन्मान केला जाईल! दरेकरांनी दिली ग्वाही.
मुंबई पालिकेसाठी शिवसेना - भाजपच्या जागावाटपावर आज शिक्कामोर्तब
मुंबई पालिकेसाठी शिवसेना - भाजपच्या जागावाटपावर आज शिक्कामोर्तब.
मनसे-उबाठा युतीतील जागावाटपावर उदय सामंत यांचे भाकीत
मनसे-उबाठा युतीतील जागावाटपावर उदय सामंत यांचे भाकीत.
शिंदे साहेब जी जबाबदारी देतील, ती...; बांगर यांनी स्पष्ट केली भूमिका
शिंदे साहेब जी जबाबदारी देतील, ती...; बांगर यांनी स्पष्ट केली भूमिका.
नाशिकमध्ये भाजपविरोधात शिंदे शिवसेना, दादांची राष्ट्रवादी एकत्र?
नाशिकमध्ये भाजपविरोधात शिंदे शिवसेना, दादांची राष्ट्रवादी एकत्र?.
त्याला मुंबई कधी उपाशी ठेवत नाही; शरद पवारांचं मोठं वक्तव्य
त्याला मुंबई कधी उपाशी ठेवत नाही; शरद पवारांचं मोठं वक्तव्य.
कल्याण-डोंबिवलीत जागावाटपावरून महायुतीत तणाव; तातडीची बैठक
कल्याण-डोंबिवलीत जागावाटपावरून महायुतीत तणाव; तातडीची बैठक.
बारामतीकरांनी बरेच चिमटे काढले; अजितदादांचा मंचावरून उपरोधिक टोला
बारामतीकरांनी बरेच चिमटे काढले; अजितदादांचा मंचावरून उपरोधिक टोला.