Sadesati Tips: शनीच्या साडेसातीने त्रस्त आहात? मग या चुका अवश्य टाळा

| Updated on: Sep 11, 2022 | 7:21 PM

ज्योतिषशास्त्रानुसार शनि एखाद्याच्या जन्मराशीमध्ये पहिल्या, दुसऱ्या व बाराव्या स्थानात असेल तर शनिची साडेसाती म्हटली जाते. तसेच जेव्हा शनि संक्रमण करत चौथ्या व आठव्या स्थानात असतो तेव्हा अडीच वर्ष शनिचा प्रभाव राहतो.

Sadesati Tips: शनीच्या साडेसातीने त्रस्त आहात? मग या चुका अवश्य टाळा
शनिदेव
Image Credit source: Social Media
Follow us on

Sadesati Tips:  शनी ग्रहाच्या साडेसात वर्ष चालणाऱ्या ग्रह दशेला साडेसाती म्हणतात. सर्व ग्रहांमध्ये शनी हा सर्वात हळू फिरणारा ग्रह आहे. शनीला एका राशीतून दुस-या राशीत जाण्यासाठी अडीच वर्षे लागतात. साडेसातीमध्ये अडीच वर्षांचे तीन टप्पे असतात. त्यांना अडीचकी म्हणतात. शनी देव (Shani Dev) हे न्याय देण्यासाठी प्रसिद्ध आहेत. प्रत्येक व्यक्तीला त्याच्या कर्मानुसार फळं देण्याचं काम ते करतात. त्यामुळेच चांगलं काम करणाऱ्यानं साडेसातीला घाबरण्याची गरज नसते, असं म्हणतात. ज्योतिषशास्त्रानुसार शनि एखाद्याच्या जन्मराशीमध्ये पहिल्या, दुसऱ्या व बाराव्या स्थानात असेल तर शनिची साडेसाती म्हटली जाते. तसेच जेव्हा शनि संक्रमण करत चौथ्या व आठव्या स्थानात असतो तेव्हा अडीच वर्ष शनिचा प्रभाव राहतो.

शनी साडेसतीचा प्रभाव

शनी हा न्यायदेवता म्हणून ओळखला जातो. शनि मनुष्याला त्याच्या कर्मानुसार फळ देतो. त्यामुळे ज्या लोकांच्या कुंडलीत शनी शुभ आहे त्यांच्यासाठी साडेसातीचा काळ फारसा वाईट नसतो. दुसरीकडे शनीचा प्रकोप असेल तर प्रत्येक कामात अडथळे किंवा विघ्न येतात. मेहनतीला यश मिळत नाही.

साडेसातीच्या काळात या गोष्टी टाळाव्या

साडेसातीच्या काळात व्यक्ती मानसिकदृष्ट्या अस्वस्थ राहतो. या काळात धोकादायक काम करणे टाळावे. घरात किंवा कामाच्या ठिकाणी कोणाशीही वाद घालू नये. वाहन चालवताना नेहमी काळजी घ्यावी. रात्रीच्या वेळी एकट्याने प्रवासाला जाऊ नये. शनिवार व मंगळवारी मांस आणि मद्यापासून दूर राहावे. या दोन्ही दिवशी काळे कपडे किंवा चामड्याच्या वस्तू खरेदी करणे टाळावे.

हे सुद्धा वाचा

साडेसातीचा प्रभाव कमी करण्यासाठी उपाय

  1. प्रत्येक शनिवारी विधीनुसार शनिदेवाची पूजा केल्यास  कृपा प्राप्त होते.
  2. गरजूंना मदत करा, शनीशी संबंधित गोष्टी शक्यतो दान करा.
  3.  शनीला बळ देण्यासाठी उजव्या हाताच्या मधल्या बोटात लोखंडी अंगठी घाला. घराच्या दारावर घोड्याची नाल लावा
  4.  दर शनिवारी शनीला तांबे आणि तिळाचे तेल अर्पण करा.
  5.  शनिवारी शनि स्तोत्राचे पठण करा.
  6. शनिवारी  नियमितपणे कावळ्याला धान्य खाऊ घाला. मुंग्यांना मध किंवा साखर खाऊ घाला.
  7.  गरजू लोकांची शक्य तितकी मदत करा.

(वरील माहिती उपलबध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही,तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)