
मुंबई, काहीवेळा कुंडलीतील ग्रह-नक्षत्रांच्या वाईट स्थितीचाही वैवाहिक जीवनावर परिणाम होतो. काही लोकांना लग्नात खूप विलंबाचा सामना (Delay in marriage) करावा लागतो तर काही लोकांना त्यांच्या वैवाहिक जीवनात वारंवार अडथळे येतात. काही जणांच्या कुंडलीतील दोषांमुळे लग्नानंतरही अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. काही लोकांच्या कुंडलीत असे योग असतात, ज्यामुळे विवाहात अडथळे येतात. चला जाणून घेऊया लग्नात येणाऱ्या अडथळ्यांमागची कारणे आणि ते कसे दूर करता येतील.
कुंडलीत मंगळ दोष असल्यास विवाहात वारंवार अडथळे येतात. सातव्या घराचा स्वामी दुर्बल राशीमध्ये स्थित असेल तर राशीचे लोकं दुर्बल होतात. त्याचा परिणाम होऊन लग्नालाही उशीर होतो. पत्रिकेत गुरू ग्रहाची अशुभ ग्रहाशी युती असेल तरी वैवाहिक जीवनात अनेक समस्यांना सामोरे जावे लागते.
कुंडलीमध्ये शुक्र ग्रह कमजोर असल्यास विवाहात अडथळ्यांना सामोरे जावे लागते. जन्म कुंडलीच्या नवव्या भागाला नवांश कुंडली म्हणतात. ज्योतिष शास्त्रानुसार नववंश कुंडलीमध्ये दोष असला तरी त्या व्यक्तीचे लग्न होण्यास उशीर होतो.
लवकर विवाहासाठी मंगळ दोषाचे निराकरण करावे लागेल. ज्याच्या लग्नाला उशीर होत असेल त्याने जास्तीत जास्त पिवळे कपडे घालावेत. दुर्गा सप्तशतीतील अर्गलस्तोत्रमचे रोज पठण केल्याने अविवाहितांना लाभ होतो. गणपतीची आराधना करून त्याला लाडू अर्पण करा.
असे केल्याने अविवाहित लोकांच्या विवाहात येणारे सर्व अडथळे दूर होतात. अविवाहित मुलींनी गणपतीला मालपुवा अर्पण करावा. लवकर विवाहासाठी, नवग्रह यंत्र आपल्या पूजास्थानी स्थापित करा आणि दररोज त्याची पूजा करा. दर गुरुवारी पाण्यात चिमूटभर हळद टाकून आंघोळ केल्याने लवकर लग्न होण्यास मदत होते. शिव-पार्वतीची विधिवत पूजा केल्याने विवाहाची मनोकामना पूर्ण होते, असे मानले जाते.
(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)