Sunday Remedies: नोकरीत प्रमोशन मिळत नाहीये? सूर्यदेवाची कृपा मिळवण्यासाठी रविवारी करा ‘हे’ उपाय!

जर तुम्ही तुमच्या नोकरीत खूप परिश्रम करूनही तुम्हाला प्रमोशन मिळत नसेल तर, रविवारचा दिवस तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा ठरू शकतो. चला तर मग जाणून घेऊया की, रविवारी कोणते उपाय करणे शुभ मानले जाते.

Sunday Remedies: नोकरीत प्रमोशन मिळत नाहीये? सूर्यदेवाची कृपा मिळवण्यासाठी रविवारी करा हे उपाय!
Sunday Astrology Remedies for Weak
| Updated on: Nov 29, 2026 | 7:38 AM

अनेकदा आपण कामात, कामाच्या ठिकाणी खूप परिश्रम करतो पण मेहनत करूनही अपेक्षित यश मिळत नाही? एवढंच नाही तर वरचे पदही मिळत नाही. तुमचं अनेक दिवसांपासून प्रमोशन रखडलं आहे किंवा करिअरमध्ये वारंवार अडथळे येत आहेत? ज्योतिषशास्त्र आणि धार्मिक मान्यतेनुसार, रविवारचा दिवस अशा समस्यांवर उपाय करण्यासाठी विशेष मानला जातो. या दिवशी सूर्यदेवाची मनोभावे पूजा केल्याने आत्मविश्वास, मान-सन्मान आणि सकारात्मक ऊर्जा वाढते, अशी श्रद्धा आहे. चला आजच्या दिवशी नेमके कोणते उपाय करायचे याबद्दल जाणून घेऊयात.

रविवारचा दिवस सूर्योपासनेसाठी का आहे खास?

हिंदू धर्मात रविवार हा सूर्यदेवाला समर्पित मानला जातो. सूर्यदेवांना ग्रहांचा राजा म्हटलं जातं. ज्योतिषशास्त्रानुसार, सूर्य हा मान-सन्मान, प्रतिष्ठा, नेतृत्वक्षमता, आत्मविश्वास आणि यशाचा कारक आहे. त्यामुळे नोकरीत प्रगती व्हावी, कामाच्या ठिकाणी आपली ओळख निर्माण व्हावी आणि करिअरमधील अडचणी दूर व्हाव्यात, यासाठी रविवारी सूर्यदेवाची उपासना करण्याला विशेष महत्त्व दिलं जातं. या दिवशी सूर्याला अर्घ्य देण्यासोबतच मंत्रजप, स्तोत्रपठण आणि गरजूंना दान करण्याची परंपरा आहे. चला तर जाणून घेऊया, रविवारी कोणते उपाय करणं शुभ मानलं जातं.

Loading...

1. उगवत्या सूर्याला अर्घ्य अर्पण करा

रविवारी सकाळी लवकर उठून स्नान करा आणि स्वच्छ कपडे परिधान करा. त्यानंतर तांब्याच्या भांड्यात पाणी घेऊन त्यात थोडं लाल चंदन किंवा कुंकू आणि लाल फूल टाका. उगवत्या सूर्याच्या दिशेने उभं राहून श्रद्धेने अर्घ्य अर्पण करा. धार्मिक मान्यतेनुसार, नियमित सूर्याला अर्घ्य दिल्याने आत्मविश्वास आणि सकारात्मकता वाढते. तसेच करिअरमध्ये यश मिळण्यास मदत होते, अशी श्रद्धा आहे.

2. सूर्यदेवाच्या मंत्रांचा करा जप

रविवार हा सूर्योपासनेसाठी उत्तम दिवस मानला जातो. या दिवशी सूर्यदेवाची पूजा करताना खालील मंत्रांचा जप करू शकता. श्रद्धेनुसार, मंत्रांचा जप केल्याने मन एकाग्र होण्यास, आत्मविश्वास वाढण्यास आणि नकारात्मक विचार दूर ठेवण्यास मदत होते.

3. सूर्याला अर्घ्य देताना लाल फूल किंवा बाजरी अर्पण करा

नोकरीत अनेक दिवसांपासून अडथळे येत असतील किंवा प्रमोशनची संधी मिळत नसेल, तर रविवारी सूर्याला अर्घ्य देताना पाण्यात लाल फूल किंवा थोडी बाजरी मिसळण्याची परंपरा आहे. यानंतर सूर्यदेवाच्या मंत्रांचा जप करा. ज्योतिषीय मान्यतेनुसार, हा उपाय करिअरमधील अडचणी दूर व्हाव्यात आणि कामात यश मिळावं या इच्छेने केला जातो.

रविवारचे उपाय करताना श्रद्धा आणि सातत्य ठेवा

रविवार हा सूर्योपासनेसाठी महत्त्वाचा दिवस मानला जातो. त्यामुळे या दिवशी मनोभावे सूर्यदेवाची पूजा करा, गरजूंना मदत करा आणि वडीलधाऱ्यांचा आशीर्वाद घ्या. धार्मिक श्रद्धेनुसार हे उपाय शुभ मानले जातात. मात्र, नोकरीतील प्रगतीसाठी मेहनत, कौशल्यवृद्धी आणि योग्य संधींचा पाठपुरावा करणंही तितकंच महत्त्वाचं आहे.

(Disclaimer: या लेखात दिलेली माहिती धार्मिक श्रद्धा, ज्योतिषीय मान्यता आणि पारंपरिक प्रथांवर आधारित आहे. या उपायांमुळे नोकरीत प्रमोशन किंवा करिअरमध्ये यश मिळण्याची हमी नाही. या माहितीची पुष्टी TV9 मराठी करत नाही.)

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us