Vastu Tips : घराच्या कोपऱ्यात फक्त ही एक वस्तू ठेवा दूर होईल वास्तूदोष

घरातील स्वयंपाकघर, बेडरूम, दिवाणखाना इत्यादी ठिकाणी वास्तुदोष असतील तर एकच उपाय करा. घराच्या कानाकोपऱ्यात एकच वस्तू ठेवून यावर तोडगा काढता येणे शक्य आहे.

Vastu Tips : घराच्या कोपऱ्यात फक्त ही एक वस्तू ठेवा दूर होईल वास्तूदोष
तुरटी
Image Credit source: Social Media
| Updated on: Jul 29, 2023 | 8:23 PM

मुंबई : वास्तूदोष घरातील सर्व कामात सतत अडथळा आणतात. व्यक्तीचे नशीब साथ देत नाही, या सर्व समस्यांच्या निदानासाठी वास्तुदोषांची (Vastu Tips) लक्षणे कोणती आणि त्यापासून मुक्ती कशी मिळवायची हे जाणून घेणे अत्यंत आवश्यक आहे. वास्तूदोष बहुतेक उत्तर भारतात ओळखले जातात. विश्वकर्मा, ज्यांना वास्तुशास्त्राचे जनक म्हटले जाते, त्यांनी वास्तुदोषांची लक्षणे आणि त्यावरील उपाय यांचे उत्तम वर्णन केले आहे. असे मानले जाते की सर्व पौराणिक आणि प्राचीन सृष्टी विश्वकर्माने निर्माण केली होती. घरातील स्वयंपाकघर, बेडरूम, दिवाणखाना इत्यादी ठिकाणी वास्तुदोष असतील तर एकच उपाय करा. घराच्या कानाकोपऱ्यात एकच वस्तू ठेवून यावर तोडगा काढता येणे शक्य आहे. तुमच्या घरातील वास्तुदोष बर्‍याच प्रमाणात दूर होतील आणि तुम्हाला कोणत्याही प्रकारची हेराफेरी किंवा तोडफोड करावी लागणार नाही.

कापूरचा उपाय

कोणत्याही स्वरुपात वास्तुदोष असल्यास त्या ठिकाणच्या चारही कोपऱ्यांमध्ये तुपात भिजवलेला कापूर ठेवावा. काही दिवसांनी हा कापूर उडून जाईल, मग पुन्हा ठेवा. याशिवाय कापूर जळत ठेवल्याने घरातील वास्तुदोषही शांत होतो. ज्या घरात नियमितपणे कापूर जाळला जातो, तेथे देवदोष, पितृदोष किंवा कोणत्याही प्रकारच्या ग्रह दोषांचा प्रभाव पडत नाही. वैज्ञानिक संशोधनातून हेही कळले आहे की त्याचा सुगंध जीवाणू, विषाणू इत्यादी रोगकारक जीवांचा नाश करतो, ज्यामुळे वातावरण शुद्ध होते आणि आजारी पडण्याची भीती नसते. टॉयलेटच्या कोपऱ्यात एका काचेच्या भांड्यात तुरटीचे काही तुकडे ठेवा. बाथरूममध्ये एका काचेच्या भांड्यात खडे मिठाचे काही तुकडे ठेवा. यामुळे वास्तूदोष दूर होईल.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)