Vastu Tips: वास्तू शास्त्रातल्या सोप्या टिप्स वापरून दूर करा घरातील नकारात्मकता

हिंदू धर्मात वास्तू शास्त्राला अनन्य साधारण महत्त्व आहे.  वास्तुशास्त्रात (VastuShastra) घरातील अनेक गोष्टींसाठी योग्य दिशा आणि नियम सांगण्यात आले आहेत. यामध्ये अशा काही(Vastu Tips) गोष्टी सांगितल्या आहेत, ज्या वापरून तुम्ही घरातली नकारात्मक ऊर्जा दूर करू शकता.  वास्तुशास्त्रानुसार कोणत्या गोष्टींमुळे घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होते ते आपण जाणून घेऊया. वास्तुशास्त्रानुसार प्रत्येक गुरुवारी तुळशीच्या रोपाला पाण्याबरोबर दूध […]

Vastu Tips: वास्तू शास्त्रातल्या सोप्या टिप्स वापरून दूर करा घरातील नकारात्मकता
नितीश गाडगे

|

Jul 20, 2022 | 4:49 PM

हिंदू धर्मात वास्तू शास्त्राला अनन्य साधारण महत्त्व आहे.  वास्तुशास्त्रात (VastuShastra) घरातील अनेक गोष्टींसाठी योग्य दिशा आणि नियम सांगण्यात आले आहेत. यामध्ये अशा काही(Vastu Tips) गोष्टी सांगितल्या आहेत, ज्या वापरून तुम्ही घरातली नकारात्मक ऊर्जा दूर करू शकता.  वास्तुशास्त्रानुसार कोणत्या गोष्टींमुळे घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होते ते आपण जाणून घेऊया.

  1. वास्तुशास्त्रानुसार प्रत्येक गुरुवारी तुळशीच्या रोपाला पाण्याबरोबर दूध अर्पण करावे. असे म्हटले जाते की असे केल्याने घरातील त्रास दूर होतो.
  2. वास्तुशास्त्रानुसार घरात वाळलेली फुले ठेवू नका. असे मानले जाते की यामुळे जीवनात दुःख येते. घराच्या सर्व दारावर समान रेषा काढा. घरातून नकारात्मकता दूर होते.
  3. वास्तुशास्त्रानुसार, साधू आणि संतांचे चित्र दिवाणखान्यात किंवा ड्रॉईंग रूममध्ये ठेवा. असे केल्याने त्यांचे आशीर्वाद घरातील सदस्यांवर राहतात.
  4. घरात रद्दी आणि अनावश्यक वस्तू ठेवू नका.
  5. वास्तुशास्त्रानुसार घराच्या दक्षिण-पूर्व कोपऱ्यात हिरवी झाडे लावा. घरात गोलाकार कडा असलेले फर्निचर ठेवू नका. असे मानले जाते की असे केल्याने नात्यात दुरावा येतो.
  6. वास्तुशास्त्रानुसार आठवड्यातून एकदा कापराचा धूर करणे शुभ मानले जाते. असे केल्याने घरातील नकारात्मकता दूर होते. यासोबतच घरात मोहरीच्या तेलाच्या दिव्यात लवंगा लावणे शुभ मानले जाते. असे म्हणतात की, असे केल्याने घरातील सदस्य निरोगी राहतात आणि घरातून रोग दूर होतात.
  7. वास्तुशास्त्रानुसार घरातल्या आतील झाडं किंवा रोपं आपल्या घरात शांतता आणि शुद्ध हवा पसरवतात. चांगलं आरोग्य आणि चिंता मुक्त जीवनासाठी तुळशीचं रोप लावा.
  8. तुम्हाला चांगली झोप लागावी याकरीता बेडरूम मध्ये लैवेंडर चं रोप लावू शकतात, हा सर्वात चांगला प्रकृतीचा तनाव रहीत उपाय आहे.
  9. जर तुम्हाला उच्च रक्तदाबाचा किंवा आर्थिक समस्या उद्भवत असेल तर मेहेंदी आणि कोळीचे वनस्पती लावा
  10. वास्तुमध्ये पंचतत्वांचा समावेश असतो आणि चांगल्या तसेच सुरक्षीततेसाठी यात संतुलन ठेवणं गरजेचं असतं. केव्हा केव्हा भिंतीवरील चित्र देखील एखाद्याच्या आरोग्यात सुधारणा होण्यासाठी फायदेशीर आहे.

(वरील माहिती उपलबध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही,तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

हे सुद्धा वाचा

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें