AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Vastu Tips : घरात या दिशेला ठेवा पिवळ्या वस्तू, घरातल्या सदस्यांना मिळेल आश्चर्यकारक लाभ

घरामध्ये असणाऱ्या पिवळ्या वस्तू घराच्या या दिशेला ठेवाव्यात. या दिशेला पिवळ्या वस्तू ठेवल्याने आईचे आरोग्य चांगले राहते, पोटाच्या समस्यांपासून सुटका मिळते.

Vastu Tips : घरात या दिशेला ठेवा पिवळ्या वस्तू, घरातल्या सदस्यांना मिळेल आश्चर्यकारक लाभ
वास्तूशास्त्रImage Credit source: Social Media
| Updated on: Sep 05, 2023 | 2:39 PM
Share

मुंबई : वास्तुशास्त्रामध्ये (Vastu Tips) रंगांना विशेष महत्त्व  आहे. आज आपण पिवळ्या रंगाच्या महत्त्वाबद्दल जाणून घेऊया. घरात वापरल्या जाणार्‍या अनेक वस्तू पिवळ्या रंगाच्या असतात. घरामध्ये असणाऱ्या पिवळ्या वस्तू घराच्या नैऋत्य कोपऱ्यात म्हणजेच नैऋत्य दिशेला ठेवाव्यात. दक्षिण-पश्चिम दिशेला पिवळ्या वस्तू ठेवल्याने आईचे आरोग्य चांगले राहते, पोटाच्या समस्यांपासून सुटका मिळते. यासोबतच यकृताचे रारोग्य चांगले राहते आणि पचनक्रिया चांगली होते, त्यामुळे पिवळ्या रंगाशी संबंधित वस्तू नैऋत्य दिशेला ठेवाव्यात.

या दिशेला ठेवा लाल रंगाशी संबंधीत वस्तू

वास्तूनुसार लाल रंगाशी संबंधित वस्तू घराच्या दक्षिण दिशेला ठेवाव्यात. असे केल्याने वास्तूचे शुभ परिणाम प्राप्त होतात. कारण लाल रंग अग्नि तत्वाशी संबंधित आहे आणि दक्षिण दिशा देखील केवळ अग्नि तत्वाशी संबंधित आहे. त्यामुळे लाल रंगाशी संबंधित वस्तू दक्षिण दिशेला ठेवणे चांगले. लाल वस्तू दक्षिण दिशेला ठेवल्याने घरातील मुलीला सर्वप्रकारे लाभ होतो. दृष्टी योग्य राहते आणि त्यांच्याशी संबंधित कोणतीही समस्या उद्भवत नाही.

या दिशेला ठेवा हिरव्या रंगाशी संबंधीत वस्तू

वास्तुशास्त्रानुसार हिरव्या रंगाशी संबंधित वस्तू पूर्व किंवा आग्नेय दिशेला म्हणजेच आग्नेय कोनात ठेवणे चांगले असते. यासोबतच या दिशेला हिरव्या गवताची छोटी बागही करावी. हिरवा रंग आणि या दोन्ही दिशा काष्ठ तत्वाशी म्हणजेच लाकडाशी संबंधित आहेत, त्यामुळे हिरव्या वस्तू पूर्व किंवा आग्नेय दिशेला ठेवणे शुभ असते. घरातील मोठ्या मुलाच्या जीवनाची गती नेहमी पूर्व दिशेला ठेवल्याने वाढते. त्याचे पाय मजबूत होतात. तर दुसरीकडे हिरवी वस्तू आग्नेय कोनात ठेवल्याने मोठ्या कन्येला फायदा होतो. आरोग्याशी संबंधित समस्या दूर होतात.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार.
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप.
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी.
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा.
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले.
माझ्या कार्यकर्त्याकडे कोणी वाकडी मान.....सत्यजीत कदम यांचा इशारा
माझ्या कार्यकर्त्याकडे कोणी वाकडी मान.....सत्यजीत कदम यांचा इशारा.
सटोगे तो बचोगे वरना बटोगे तो पिटोगे , शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी
सटोगे तो बचोगे वरना बटोगे तो पिटोगे , शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी.
अमोल कोल्हे-अजित पवारांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
अमोल कोल्हे-अजित पवारांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण.
मुंबईत हवेचा दर्जा खालावला, AQI थेट 195 वर
मुंबईत हवेचा दर्जा खालावला, AQI थेट 195 वर.