Shukra Uday: 50 दिवसांनी होणार शुक्राचा उदय, कुंभ राशीसह चमकणार ‘या’ 3 राशींचे नशीब 

शुक्राच्या उदयाने काही राशींना आर्थिक फायदा होणार आहे. याशिवाय काही राशींना परदेश भ्रमणाचेदेखील योग आहेत.

Shukra Uday: 50 दिवसांनी होणार शुक्राचा उदय, कुंभ राशीसह चमकणार या 3 राशींचे नशीब 
जोतिषशास्त्र
Image Credit source: Social Media
| Updated on: Nov 19, 2022 | 7:25 PM

मुंबई, सुखाचा प्रदाता शुक्र वृश्चिक राशीत प्रवेश करणार आहे. 02 ऑक्टोबरला शुक्राचा अस्त झाला होता आणि आता 50 दिवसांनंतर रविवार, 20 नोव्हेंबरला शुक्राचा उदय (Venus will rise) होणार आहे. जोतिष तज्ञांच्या मते शुक्राचा उदय तिन्ही राशीच्या लोकांसाठी खूप फायदेशीर असेल. या लोकांना करिअर, व्यवसाय आणि आर्थिक बाबतीत खूप फायदा होईल. शुक्राच्या उदयामुळे कोणकोणत्या राशींचे भाग्य उजळणार आहे, जाणून घेऊया.

  1. वृश्चिक- योगायोगाने तुमच्या राशीत शुक्राचा उदय होणार आहे. शुक्राच्या उदयामुळे तुमच्या राशीला खूप चांगले परिणाम मिळतील. वृश्चिक राशीच्या लोकांना धनप्राप्तीचे योग आहेत. तुमच्या उत्पन्नात वाढ होण्याची शक्यता आहे. उत्पन्नाचे स्रोतही वाढू शकतात. नोकरदार आणि व्यावसायिक दोघांनाही मोठा फायदा होण्याची शक्यता आहे. मान-सन्मान वाढेल. शुक्राचा उदय तुमच्यासाठी आरोग्याच्या दृष्टीने अतिशय शुभ मानला जातो.
  2. कुंभ- शुक्राचा उदय कुंभ राशीच्या लोकांसाठी खूप चांगला परिणाम देईल. करिअर आणि व्यवसायात चांगला फायदा होईल. नोकरीत वेतनवाढ आणि पदोन्नती मिळू शकते. नोकरदारांनाही नवीन संधी मिळतील. व्यवसायात दुप्पट नफा मिळू शकतो. या दरम्यान, आपण एक मोठा फायदेशीर सौदा देखील मिळवू शकता. कुंभ राशीच्या लोकांची महत्वाची कामं जी काही कारणास्तव आत्तापर्यंत रखडलेली होती ती आता लवकर पूर्ण होतील.
  3. मीन- उदयास येणारा शुक्र मीन राशीच्या लोकांसाठीशुभ ठरणार आहे. शुक्राचा उदय तुमच्या राशीच्या नवव्या घरात होणार आहे. परदेश प्रवासाचा योग संभवतो. शुक्राचा उदय होताच तुमच्या नशिबाचा उदय निश्चित आहे. अभ्यास किंवा करिअरच्या निमित्ताने तुम्ही परदेशातही जाऊ शकता. जे लोकं खूप दिवसांपासून परदेशात जाण्याचे स्वप्न पाहत होते, त्यांची इच्छा देखील या काळात पूर्ण होऊ शकते. परदेशातून पैसे मिळू शकतात. भांडणं, वाद आणि तणावातूनही सुटका होईल.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही,तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)