Zodiac Signs Girls Who Lie : खोटं बोलण्यात पारंगत असतात या राशीच्या मुली, जोडीदाराशी खोटं बोलून करून घेतात आपलं काम

Girl Zodiac Signs Lie In Relationships : प्रत्येकाची अशी एखादी सवय असते जी पुढे जाऊन त्याची ओळख बनते. काही लोकं खोटं बोलण्यात पारंगत असतात. ज्योतिषशास्त्रात काही राशी सांगितलेल्या आहेत, ज्या राशीच्या मुली आपल्या जोडीदाराला खोटं बोलून फसवण्यात माहिर असतात.

Zodiac Signs Girls Who Lie : खोटं बोलण्यात पारंगत असतात या राशीच्या मुली, जोडीदाराशी खोटं बोलून करून घेतात आपलं काम
astrology news
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Apr 19, 2025 | 7:19 PM

प्रत्येक व्यक्तीची अशी एखादी सवय असते जी पुढे जाऊन त्याची ओळख बनते. त्यांच्या या सवयी त्यांच्या नात्यावर देखील परिणाम करत असतात. काही लोकांना खोट बोलण्याची सवय असते. खोटं बोलण्यात ही माणसं पारंगत असतात. पण ज्योतिषशास्त्रानुसार, अशा काही राशी आहेत, ज्या राशीच्या मुली या सतत काहीतरी खोटं बोलत असतात. त्यांच्या या स्वभावामुळे या राशीच्या मुलींच्या नात्यावर देखील याचा परिणाम होतो. या मुली आपल्या जोडीदाराशी कधीच खरं बोलत नाही. त्यामुळे जोडीदाराशी त्यांचे नेहेमी वाद होत असतात. आज आम्ही तुम्हाला त्या राशी कोणत्या ते सांगणार आहे.

कोणत्या राशीच्या मुली कायम बोलतात खोटं

मिथुन राशी : या राशीच्या मुली या स्वभाव मनमौजी असतात. कोणतीही गोष्ट लगेचच गंभीरतेने घेत नाहीत. या मुली दुहेरी स्वभावाच्या असतात. जिथे जशी गरज असेल तसंच त्या स्वतःला दुसऱ्यासमोर दाखवतात. या राशीच्या मुली आपल्या जोडीदाराला एवढ्या आत्मविश्वासाने खोटे बोलतात की कोणीही त्यांचे खोटे पकडू शकत नाही. त्यामुळे त्यांच्या या खोटं बोलण्याच्या सवयीने त्यांच्या नात्यावर परिणाम होतो.

​कर्क राशी : या राशीच्या मुली खूप तल्लख बुद्धीच्या असतात. जेव्हा त्यांना वाटते की आपल्यावर संकट येणार आहे तेव्हा त्या गोष्टी पलटवण्यासाठी त्या धडधडीत खोटं बोलतात. आपल्या जोडीदाराला एखादी खोटी गोष्ट खरी बनवून सांगण्यात या मुलींचा हातखंडा असतो. खोटं बोलणे हा त्यांचा डाव्या हाताचा खेळ मानला जातो. ज्योतिषानुसार या राशीच्या मुलींचा स्वामी हा चंद्र असतो त्यामुळे या राशीच्या मुलींमध्ये जन्मत:च एखाद्याला गंडवण्याची कला असते. त्यामुळे त्या खोटं बोलत असल्या तरी त्यांच्या जोडीदाराला कळून येत नाही.

सिंह राशी : या राशीच्या मुली खोटं बोलण्यात बादशहा असतात. आपल्या फायद्याची गोष्ट असेल तर ती तिखट मीठ लावून दुसऱ्यांसमोर मांडतात. जोडीदाराला अशी गोष्ट सांगताना स्व:ला चांगलं दाखवण्यासाठी या मुली सर्रास खोटं बोलतात. परिस्थिती पाहून या राशीच्या मुली ठरवतात की त्यांना खरं बोलायचं आहे की खोटं.

वृश्चिक राशी : वृश्चिक राशीच्या मुलींवर थोडाही विश्वास ठेऊ शकत नाही. या मुली आपल्या जोडीदाराशी खोटे बोलण्यात उस्ताद असतात. आपल्या जोडीदाराला खोटं बोलून त्या आपलं काम करून घेतात. जेव्हा त्यांच्यावर एखादे संकट येते तेव्हा त्या मनधडक गोष्टी तयार करतात. जोडीदाराला खोटं बोलून फसवल्याने बऱ्याच वेळा त्यांच्या नात्यात वाद देखील होतात. तरीही या मुली आपला स्वभाव बदलू शकत नाही.

मीन राशी : या राशीच्या मुली या स्वार्थी असतात. नेहमी स्वतःचाच विचार करतात. अनेकवेळा या मुली जोडीदाराला आपल्या बोलण्यात आणण्याचा प्रयत्न करतात. आपली गोष्ट गळी उतरवण्यासाठी अनेकदा त्या जोडीदारासमोर चांगले असण्याचे नाटक करतात. त्यांच्या या स्वभावामुळे या मुली आपल्या जोडीदाराला कायम अंधारात ठेवतात.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही.)