Rajarshi Shahu Maharaj : बहूजन समाजाच्या सामाजिक उन्नतीसाठी राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांनी केलेले कार्य प्रेरणादायी

विसाव्या शतकात ब्रिटिश राजसत्ता असतानाही सामान्य जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी व बहूजन समाजाच्या सामाजिक उन्नतीसाठी राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांनी केलेले कार्य निश्चितच प्रेरणादायी आहे.

Rajarshi Shahu Maharaj : बहूजन समाजाच्या सामाजिक उन्नतीसाठी राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांनी केलेले कार्य प्रेरणादायी
राजर्षी शाहू महाराज यांच्या स्मृती दिनानिमित्त 06 मे रोजी भवानी मंडप पथनाट्याचे आयोजन
Image Credit source: twitter
| Updated on: May 06, 2022 | 6:35 AM

मुंबई – राजर्षी शाहू महाराज (Rajshree Shahu Maharaj) यांच्या स्मृतीशताब्दी वर्षानिमित्त ‘वारसा राजर्षी शाहूंचा, जागर युवाशक्तीचा’ या माध्यमातून राजर्षी शाहू महाराज यांच्या स्मृती दिनानिमित्त 06 मे रोजी भवानी मंडप पथनाट्याचे आयोजन करण्यात आले आहे. शिवराज्याभिषेक महोत्सव समिती, कोल्हापूर (Kolhapur), शिवाजी विद्यापीठ (Shivaji University), कोल्हापूर राष्ट्रीय सेवा योजना व माध्यमिक शिक्षण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने राजर्षी शाहू महाराज यांच्या 100 व्या स्मृती दिनानिमित्त विविध महाविद्यालय व माध्यमिक शाळांच्या माध्यमातून शाहू महाराज यांच्या जीवन व कार्यावर आधारित 100 मिनिटांचे पथनाट्य सादरीकरण केले जाणार आहे. यामध्ये शिवाजी विद्यापीठ अंतर्गत राष्ट्रीय सेवा योजनाचे 1000 स्वयंसेवकही सहभागी होणार आहेत. सदर पथनाट्य सादरीकरणामुळे शाहू महाराज यांचे विचार तरुणांपर्यंत पोहचवावे व तरुण पिढीने शाहू महाराज यांचे विचार आत्मसात करून शाहू महाराज यांचे विचार व कार्य घराघरात पोहोचवावे हा उद्देशही यामागे आहे. पथनाट्य कार्यक्रमाचे विषय युवाशक्तीचा जागर आणि राजर्षी शाहू महाराजांचे कार्य याला अनुसरून आहेत.

सामाजिक परिवर्तनाला गती प्राप्त करून दिली

विसाव्या शतकात ब्रिटिश राजसत्ता असतानाही सामान्य जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी व बहूजन समाजाच्या सामाजिक उन्नतीसाठी राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांनी केलेले कार्य निश्चितच प्रेरणादायी आहे. राजर्षी शाहू महाराज यांनी आपला राज्यकारभार करतांना सामाजिक परिवर्तनाला गती प्राप्त करून दिली. त्यांनी बहूजन समाजाच्या विकासासाठी महत्त्वाची भूमिका बजावली आहे.
सन 2022 हे वर्ष राजर्षी शाहू महाराज यांचे स्मृतिशताब्धी वर्ष म्हणून साजरे करण्यात येत आहे. राजर्षी शाहू महाराजांचे विचार तरुण पिढीपर्यंत पोहोचावेत म्हणून ‘वारसा राजर्षी शाहूंचा, जागर युवाशक्तीचा’ हा पथनाट्य सादरीकरण कार्यक्रम आयोजित केला आहे. यामागे दूरदर्शी राजर्षी शाहूमहाराजांचे विचार तरुण पिढीपर्यंत पोहोचावेत, तरुण पिढीने शाहू महाराज यांचे विचार आत्मसात करून शाहू महाराज यांचे विचार व कार्य हा उद्देश आहे. राज्यभरात या निमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जात आहे त्यातील हा एक उपक्रम आहे.

अकरावी ते बारावी व महाविद्यालयीन विद्यार्थी सहभागी होणार

या पथनाट्य सादरीकरणात आठवी ते दहावी आणि अकरावी ते बारावी व महाविद्यालयीन विद्यार्थी सहभागी होणार आहेत. शिवराज्याभिषेक महोत्सव समिती, कोल्हापूर, छत्रपती शिवाजी विद्यापीठ अंतर्गत राष्ट्रीय सेवा योजना आणि माध्यमिक शिक्षण विभाग यांच्या सहकार्यातून आयोजित केलेला हा कार्यक्रम जुना राजवाडा भवानी मंडप कोल्हापूर येथे दिनांक 6 मे 2022 रोजी सकाळी 8 वाजता संपन्न होईल. राजर्षी शाहू महाराजांच्या विचार धारेवर आधारित सामाजिक प्रबोधनपर पथनाट्य सादरीकरण होणार आहे. यामध्ये शिवाजी विद्यापीठ अंतर्गत कोल्हापूर, सांगली, सातारा येथील विद्यार्थी सहभागी होणार आहेत.