AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पाकिस्तान सीमेवर काहीतरी मोठं घडतंय, धोक्याची घंटा?, थेट असीम मुनीर यांनी युद्धाबाबत..

गेल्या अनेक वर्षांपासून भारत पाकिस्तान संबंध तणावात राहिली आहेत. त्यामध्येच पहलगाममध्ये झालेल्या हल्ल्यानंतर संबंध अधिकच ताणले गेले. पाकिस्तानातून आलेल्या दहशतवाद्यांनी मोठा हल्ला भारतात केला.

पाकिस्तान सीमेवर काहीतरी मोठं घडतंय, धोक्याची घंटा?, थेट असीम मुनीर यांनी युद्धाबाबत..
India Pakistan borderneral Asim Munir
| Updated on: Dec 14, 2025 | 12:12 PM
Share

पाकिस्तानचे लष्करप्रमुख फील्ड मार्शल जनरल असीम मुनीर गेल्या काही दिवसांपासून भारताबद्दल धक्कादायक विधाने करताना दिसत आहेत. नुकताच त्यांनी भारताच्या सीमेजवळ येऊन मोठे विधान करत थेट इशाराच दिला. असीम मुनीर म्हणाले की, पाकिस्तानी सैन्य बाह्य आणि अंतर्गत दोन्ही धोक्यांना तोंड देण्यासाठी पूर्णपणे सज्ज आहे. जनरल मुनीर यांनी भारतीय सीमेजवळ असलेल्या पाकिस्तानमधील गुजरांवाला आणि सियालकोट छावणी परिसरांना भेट दिली. जनरल मुनीर यांना लष्कराची कार्यक्षम सज्जता आणि लढाऊ क्षमता मजबूत करण्यासाठीच्या प्रमुख उपक्रमांची माहिती देण्यात आली. असीम मुनीर यांच्या सध्या अमेरिेकेच्या चक्कर जास्तच वाढल्या असून भारताविरोधात मोठं षडयंत्र रचले जातंय. त्यामध्येच त्यांनी अशाप्रकारे विधान केले.

यादरम्यान असीम मुनीर यांनी अधिकाऱ्यांसोबत संवाद साधत त्यांचे मनोधैर्य वाढवण्याचे काम केले. भारताने ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून पाकिस्तान सैन्याचे तीन तेरा वाजवले. भारताने केलेल्या हल्ल्याचा प्रतिउत्तरही पाकिस्तान सैन्य देऊ शकले नाही. दुसरीकडे अफगाणिस्तानने काही दिवसांपूर्वीच पाकिस्तानी सैन्याच्या चाैक्यांना टार्गेट करत पाकच्या सैनिकांना ठार केले. यासोबतच 7 सैनिकांना ओलिसही ठेवले.

अफगाणिस्तानच्या हल्ल्यानंतर पाकिस्तानी सैनिक चाैक्या सोडून पळताना दिसले. यामुळे पाकिस्तानी सैन्याचे आता मनोधैर्य कमी झाले. दोन्ही बाजूंनी पाकड्यांचा बॅंड वाजत आहे. जनरल मुनीर यांनी एका क्षेत्रीय प्रशिक्षण सरावाची आणि प्रगत सिम्युलेटर प्रशिक्षण सुविधेचीही पाहणी केली. त्या तुकडीच्या उच्च व्यावसायिक मानकांची आणि एकूण सज्जतेच्या स्थितीची प्रशंसा केली.

युद्धाबद्दल बोलताना जनरल मुनीर म्हणाले की, आजच्या संघर्षांमध्ये वेग, अचूकता, परिस्थितीची संपूर्ण जाणीव यासोबतच त्वरित निर्णय घेण्याची क्षमता या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. तांत्रिक प्रगतीशी जुळवून घेण्याच्या महत्त्वावरही भर दिला. मुनीर यांचा दौरा आणि विधान भारत आणि पाकिस्तान यांच्यातील वाढलेल्या तणावाच्या काळात आले आहे. पाकिस्तानातून आलेल्या दहशतवाद्यांनी पहलगाममध्ये हल्ला केला. या हल्लयात 26 भारतीय लोकांचा जीव केला. या हल्ल्यानंतर देशभरात संतापाचे वातावरण बघायला मिळाले. या हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानला सडेतोड उत्तर दिले.

प्रश्नचिन्ह निर्माण होईल असं...; वडेट्टीवारांचं मोठं विधान
प्रश्नचिन्ह निर्माण होईल असं...; वडेट्टीवारांचं मोठं विधान.
शिवसेना-संघाची विचारसरणी मिळतीजुळती! शिंदेंच्या विधानाची चर्चा
शिवसेना-संघाची विचारसरणी मिळतीजुळती! शिंदेंच्या विधानाची चर्चा.
आज 'या' मार्गावर असणार मेगाब्लॉक
आज 'या' मार्गावर असणार मेगाब्लॉक.
साताऱ्यातील ड्रग्स फॅक्टरी प्रकरणावरून राजकीय वर्तुळात खळबळ:
साताऱ्यातील ड्रग्स फॅक्टरी प्रकरणावरून राजकीय वर्तुळात खळबळ:.
लिओनल मेस्सीच्या दौऱ्यात गोंधळ अन् लाठीचार्ज
लिओनल मेस्सीच्या दौऱ्यात गोंधळ अन् लाठीचार्ज.
19 डिसेंबरला राजकारणात मोठी घडामोड! पृथ्वीराज चव्हाणांचा खळबळजनक दावा
19 डिसेंबरला राजकारणात मोठी घडामोड! पृथ्वीराज चव्हाणांचा खळबळजनक दावा.
मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई
मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई.
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल.
शरद पवारांना भारतरत्न देण्याची मागणी, सदावर्ते, पडळकरांनी उडवली खिल्ली
शरद पवारांना भारतरत्न देण्याची मागणी, सदावर्ते, पडळकरांनी उडवली खिल्ली.
42 हजार मिळतात म्हणून पीएचडी? दादांच PhD शिष्यवृत्तीवरचं वक्तव्य वादात
42 हजार मिळतात म्हणून पीएचडी? दादांच PhD शिष्यवृत्तीवरचं वक्तव्य वादात.