ऐकावं ते नवलंच ! मुस्लीम आहेत पण मशीद नाही, ‘या’ 2 देशांची न्यारीच तऱ्हा

| Updated on: May 13, 2021 | 7:21 PM

गातील असे दोन देश आहेत, ज्या देशात मुस्लीम लोक असूनसुद्धा तेथे मशीद बांधण्यात आलेली नाही. (slovakia estonia no muslim mosque)

ऐकावं ते नवलंच ! मुस्लीम आहेत पण मशीद नाही, या 2 देशांची न्यारीच तऱ्हा
mosque
Follow us on

नवी दिल्ली : संपूर्ण जगातील एकूण 800 कोटी लोकसंख्येपैकी तब्बल 190 कोटी लोक हे मुस्लीम आहेत. मुस्लीम हा सर्वांत जास्त लोकसंख्या असलेला जगातील दुसऱ्या क्रमांकाचा धर्म आहे. जगातील बहुतांश देशांत मुस्लीम धर्मीय आढळतात. त्यांच्या धार्मिक प्रार्थनेकरीता त्या-त्या देशात मशिदीचे निर्माण करण्यात आलेले आहे. मात्र, जगातील असे दोन देश आहेत, ज्या देशात मुस्लीम लोक असूनसुद्धा तेथे मशीद बांधण्यात आलेली नाही. या देशातील मुस्लीम धर्मियांच्या लोकांना आपल्या घरी किंवा कल्चरल सेंटरमध्येच धार्मिक प्रार्थना करव्या लागतात. स्लोव्हाकिया (Slovakia) आणि एस्टोनिया (Estonia) या दोन देशांमध्ये मुस्लिमांना प्रार्थना करण्यासाठी मशिदी नाहीयेत. (Slovakia and Estonia countries have no mosque for Muslim population prayers konw all details)

मुस्लिमांची लोकसंख्या नगण्य

मिळालेल्या माहितीनुसार स्लोव्हाकिया आणि एस्टोनिया या दोन देशांमध्ये मशिदी नाहीयेत. हे दोन्ही देश सर्व साधनसंपत्तीने परिपूर्ण आणि आनंदात नांदणारे देश आहेत. मात्र, येते मशिदी नसल्यामुळे अनेकांकडून आश्चर्य व्यक्त करण्यात येते. या देशात मशिदी नसण्यामागे एक विशिष्ट कारण आहे. येथे मुस्लिमांची लोकसंख्या नगण्य असल्यामुळे येथे मशिदी नाहीयेत. 2011 च्या जनगणनेनुसार स्लोव्हाकिया या देशात एकूण लोकसंख्येच्या तुलनेत मुस्लिमांची एकूण लोकसंख्या ही पक्त 0.2 टक्के आहे. तर 2011 च्या नजगणनेनुसार एस्टोनिया देशामध्ये मुस्लिमांची लोकसंख्या फक्त 1508 एवढी होती. ही लोकसंख्या एकूण लोकसंख्येच्या तुलनेत फक्त 0.14 टक्के आहे. दरम्यान मागील दहा वर्षांमध्ये येथे मुस्लिमांची लोकसंख्या मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. पण तरीसुद्धा येथे मशीद उभारण्यास मनाई केलेली आहे.

मशीद बांधण्यासाठी सरकारकडून विरोध

मागील काही वर्षापासून या दोन्ही देशांमध्ये मशीद बांधण्यावरुन अनेकवेळा वाद झालेला आहे. 2010 साली स्लोव्हाकिया येथील मुस्लीम धर्माच्या नागरिकांनी देशाची राजधानी ब्रातिस्वाला येते मशीद उभारण्यासाठी परवानगी मागितली. मात्र, तत्कालीन सरकारने ही मागणी फेटाळली. त्यानंतर त्याच वर्षी पुन्हा एकदा मशीद बांधण्यासाठी परवानगी मागण्यात आली. मात्र, यावेळीसुद्धा परवानगी नाकारण्यात आली.

मुस्लीम शरणार्थींना येण्यास बंदी

दरम्यान, 2015 साली युरोपीय शरणार्थी स्लोव्हाकिया या देशात येत होते. यावेळी या देशाने एकूण 200 इसाई धर्मीय लोकांना देशात जागा दिली. मात्र, यावेळी या देशाने मुस्लीम शरणार्थीना जागा दिली नाही. स्लोव्हाकियाच्या या निर्णयामुळे या देशाला जागतिक स्तरावर टीकेचे धनी व्हावे लागले होते.

इतर बातम्या :

Video | मित्राच्या पार्टीसाठी बालकनीत जमले, मध्येच घडला असा प्रकार की दोघे गंभीर जखमी, पाहा व्हिडीओ

Video | स्कुटीचालक मध्ये आला अन् सगळं संपलं, भीषण अपघातामुळे नेटकरी हादरले, सीसीटीव्ही फुटेज व्हायरल

(Slovakia and Estonia countries have no mosque for Muslim population prayers konw all details)