विमान प्रवासादरम्यान मोबाईल फ्लाईट मोडवर का ठेवतात? फोन फ्लाईट मोडवर न टाकल्यास काय होत?

विमानातून प्रवास करत असतो त्यावेळी फ्लाईट अटेंडेंटकडून आपल्याला काही सूचना दिल्या जातात. flight mode in airplane

विमान प्रवासादरम्यान मोबाईल फ्लाईट मोडवर का ठेवतात? फोन फ्लाईट मोडवर न टाकल्यास काय होत?
airplane

नवी दिल्ली: आपण ज्यावेळी विमानातून प्रवास करत असतो त्यावेळी फ्लाईट अटेंडेंटकडून आपल्याला काही सूचना दिल्या जातात. त्यामध्ये सीट बेल्ट लावणे, विमान प्रवासादरम्यान फोन स्विच ऑफ करणे किंवा फ्लाईट मोडवर ठेवणे, असे निर्देश दिले जातात. तुम्ही देखील आपल्या फोनमधील फ्लाईट मोड हे फीचर वापरलेलं असेल. फ्लाईट मोडं ऑन केल्यानंतर तुमच्या फोनचं नेटवर्क बंद होतं. जर एखाद्या प्रवाशानं फोन बंद केला नाही किंवा फ्लाईट मोडवर टाकला नाही तर काय होतं? (What happen if you don’t switch your phone on flight mode in airplane check all details)

फ्लाईट मोड म्हणजे नेमकं काय?

प्रत्येक फोनमध्ये फ्लाईट मोड हा ऑप्शन दिलेला असतो. हा ऑप्शन वापरुन नेटवर्कपासून आपल्या फोनचा संपर्क बंद करता येतो. यामुळे फोन स्विच ऑफ होत नाही. मात्र, यावेळी आपल्याला सेल्यूलर नेटवर्कद्वारे कोणताही फोन येत नाही. फोनमधील इतर अ‌ॅप्लिकेशन आपण वापरु शकतो. एअरप्लेन किंवा फ्लाईट मोड सुरु असताना आपण फोनमधील फोटो पाहणे, व्हिडीओ पाहणे आणि गाणी ऐकणे या सुविधांचा वापर करु शकतो. याशिवाय काही फोनमध्ये ब्लूटूथ आणि वाय फाय सुविधा असते. त्यामुळे विमानामध्ये पुरवण्यात येणाऱ्या वाय फाय नेटवर्क द्वारे आपण त्याचा देखली लाभ घेऊ शकतो.

विमानात फ्लाईट मोड ऑन न केल्यास काय?

विमानातील फ्लाईट अटेंडंटनं सूचना देऊनही तुम्ही जर फोन स्विच ऑफ किंवा फ्लाईट मोड वर टाकला नाही तर विमान दुर्घटनाग्रस्त होऊ शकतं.यामुळे विमानाच्या पायलटसमोर अडचण निर्माण होईल. विमान उड्डाण करताना तुमच्या फोनचं नेटवर्क सुरु राहिल्यास विमानाच्या कम्युनिकेशन नेटवर्कमध्ये बाधा येऊ शकते.

विमान उड्डाणादरम्यान पायलट हे रडार आणि कंट्रोल रुमच्या संपर्कात असतात. मात्र, फोन सुरु राहिल्यास पायलटला व्यवस्थित सिग्नल मिळत नाहीत, कनेक्शनमध्ये अडचणी निर्माण होतात. यामुळे तुमचा मोबाईल आणि लॅपटॉप विमान प्रवासादरम्यान सुरु राहिल्यास पायलटला मिळणाऱ्या रेडिओ फ्रिक्वेन्सीला बाधा पोहोचवतात. त्यामुळे विमान प्रवास करत असताना नेहमी तुम्ही तुमचा फोन फ्लाईट मोडवर ठेवणं आवश्यक आहे.

संबंधित बातम्या:

धक्कादायक, लँडिंगआधी काही अंतरावर विमान डोंगराला धडकलं, प्रवास करणाऱ्या सर्व 119 जणांचा मृत्यू

एका प्रवाशासाठी भारतीय विमानाचं थेट पाकिस्तानात लँडिंग; पायलटने निर्णय घेतला, पण…

(What happen if you don’t switch your phone on flight mode in airplane check all details)