Ashadhi ekadashi 2022: आषाढीच्या तोंडावर महागाईचा फटका; उपवास करणाऱ्यांच्या खिशाला कात्री!

| Updated on: Jul 09, 2022 | 9:45 AM

आषाढी एकादशीपासून (aashadhi ekadashi) पुढे श्रावण आणि भाद्रपद महिन्यात अनेक सण आहेत. विशेष म्हणजे या सणांना उपवास आणि व्रताचे महत्त्व अधिक आहे.   उद्या सगळीकडे आषाढी एकादशी साजरी करण्यात येणार आहे. आषाढी एकादशीचा उपवास करणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. अर्थात, या उपवासाच्या फराळाची मोठी जय्यत तयारी घरोघरी केली जाते. यंदा मात्र हा फराळ चांगलाचा महागला (inflation) […]

Ashadhi ekadashi 2022: आषाढीच्या तोंडावर महागाईचा फटका; उपवास करणाऱ्यांच्या खिशाला कात्री!
Follow us on

आषाढी एकादशीपासून (aashadhi ekadashi) पुढे श्रावण आणि भाद्रपद महिन्यात अनेक सण आहेत. विशेष म्हणजे या सणांना उपवास आणि व्रताचे महत्त्व अधिक आहे.   उद्या सगळीकडे आषाढी एकादशी साजरी करण्यात येणार आहे. आषाढी एकादशीचा उपवास करणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. अर्थात, या उपवासाच्या फराळाची मोठी जय्यत तयारी घरोघरी केली जाते. यंदा मात्र हा फराळ चांगलाचा महागला (inflation) आहे. फराळाच्या ताटातील मोठा मानकरी असलेल्या बटाट्याने गतवर्षाच्या तुलनेने यंदा 15 रुपयांवर भाव खाल्ला असून तो 35 ते 40 रुपये किलो इतका महागला आहे.  प्रती किलो दराने विकला जात आहे. गरिबांचे काजू म्हणून ओळखल्या जाणारा शेंगदाणा घाऊक बाजारत 10 ते 15 रुपयांनी स्वस्त झाला असला तरी किरकोळ बाजारात चक्क दुपट्टीने महागला आहे. साखर दहा ते पंधरा रुपयांनी महागली आहे. साबुदाणा खाल्ल्याशिवाय उपवासाचे समाधान होत नाही. हा साबूदाणाही गेल्या वर्षांच्या तुलनेत किरकोळ बाजारात किलोमागे 15 ते 20 रुपयांनी महागला आहे.

मागच्या वर्षीच्या तुलनेत यंदाचे भाव

  1. भगर- 2021 चे भाव  50 ते 75 रुपये किलो. 2022 मध्ये 55 ते 120 रुपये किलो
  2. साबुदाणा- 2021 चे भाव 50 ते 45 रुपये किलो. 2022 मध्ये 55 ते 75 रुपये किलो
  3. शेंगदाणे-  2021 चे भाव 75 ते 195 रुपये किलो. 2022 मध्ये 60 ते 135 रुपये किलो
  4. पेंडखजूर- 2021 चे भाव 70 ते 90 रुपये किलो. 2022 मध्ये 70 ते 120 रुपये किलो
  5. हे सुद्धा वाचा
  6. बटाटे- 2021 चे भाव 13 ते 25 रुपये किलो. 2022 मध्ये 21 ते 35 रुपये किलो
  7. साखर- 2021 चे भाव 31 ते 33 रुपये किलो. 2022 मध्ये 42 रुपये किलो
  8. रताळी- 2021 चे भाव 20 ते 45 रुपये किलो. 2022 मध्ये 25 ते 55 रुपये किलो

यासोबतच गॅससुद्धा महागल्याने मागच्या वर्षीच्या तुलनेत यंदा उपवासाचा फराळ बनविण्यासाठी जास्त पैसे खर्च करावे लागतील. इंधनदारवाढीमुळे एकंदरीतच सर्व गोष्टीचे भाव वाढले आहे. त्या तुलनेने सामान्यांची आवक मात्र तितकीच आहे.