Aashadhi Ekadashi 2022: आषाढी एकादशी निमित्त पंढरपुरात 15 लाख चुड्यांची निर्मिती

पंढरपूर, आषाढी एकादशी (aashadhi Ekadashi 2022) निमित्त पंढरपुरात (Pandharpur wari 2022) वैष्णवांचा महासागर जमलेला आहे. विठुरायाच्या दर्शनासाठी संपूर्ण देशातून लाखोंच्या संख्येने भाविक पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ होत आहेत. तीर्थ क्षेत्री बांगड्या भरण्याचा मान असतो. अनेक जण तीर्थ क्षेत्रावरून आपल्या प्रिय जणांसाठी बांगड्या नेतात. व्यावहारिक दृष्टिकोनातून पाहिल्यास यामुळे अनेक गरजूंना रोजगारही मिळतो. आषाढी वारीच्या निमित्ताने पंढरपुरात सुवासिनींचे […]

Aashadhi Ekadashi 2022: आषाढी एकादशी निमित्त पंढरपुरात 15 लाख चुड्यांची निर्मिती
Follow us
| Updated on: Jul 08, 2022 | 6:24 PM

पंढरपूर, आषाढी एकादशी (aashadhi Ekadashi 2022) निमित्त पंढरपुरात (Pandharpur wari 2022) वैष्णवांचा महासागर जमलेला आहे. विठुरायाच्या दर्शनासाठी संपूर्ण देशातून लाखोंच्या संख्येने भाविक पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ होत आहेत. तीर्थ क्षेत्री बांगड्या भरण्याचा मान असतो. अनेक जण तीर्थ क्षेत्रावरून आपल्या प्रिय जणांसाठी बांगड्या नेतात. व्यावहारिक दृष्टिकोनातून पाहिल्यास यामुळे अनेक गरजूंना रोजगारही मिळतो. आषाढी वारीच्या निमित्ताने पंढरपुरात सुवासिनींचे चुडे बनवण्याचे काम सुरू आहे. तब्बल 15 लाख चूडे बनविण्यात येत असून यासाठी पंढरपुरात लगबग सुरू आहे. गेली दोन वर्ष कोरोनाच्या सावटाखाली गेली त्यामुळे अनेक कामगारांवर उपासमारीची वेळ आली. विठ्ठलाच्या कृपेने यंदाची वारी निर्बंधमुक्त आहे. त्यामुळे स्थानिक रोजगारांसाठीही हा सोहळा महत्वाचा आहे.

महाराष्ट्रात वेगवेगळ्या तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी, लाखेचा चुडा घालणे शुभ मानले जाते. सौभाग्यवती स्त्रिया पंढरपुरला श्री पांडुरंग व रुक्मिणी माता यांचे दर्शन घेतल्यावर लाखेचा चुडा घालण्याची पद्धत आहे. सुवासिनीच लेण म्हणून लाखेच्या चुड्याला खुप महत्व आहे.

या चुड्या मध्ये सद्गुरू मुखवटा, नामदेव मुखवटा, रुक्मिणी मुखवटा असे नक्षी वरून प्रकार आहेत. कोरोनाच्या दोन वर्षानंतर वारी साठी 15 लाख चुडे पंढरपूर मधील विविध कारखान्यात बनवण्याचे काम सुरू आहे.

हे सुद्धा वाचा

आषाढी वारीच्या निमित्ताने पंढरपुरात  तुळशी माळा बनवण्याच्या कामाला वेग आला आहे. या व्यवसायावर पंढरपुरातील अनेक कुटुंबांचा उदरनिर्वाह चालतो. वारकरी संप्रदायामध्ये तुळशी माळेला अनन्यसाधारण महत्त्व आहे. विठ्ठल भक्तांना प्रिय असलेल्या तुळशी माळा बनवण्याची आता लगबग सुरू आहे. पण सध्या या मार्केट मध्ये चायना तुळशी माळा विक्री साठी येत आहेत. त्यामुळे पारंपरिक व्यवसायिकांना याचा मोठा फटका सहन करावा लागत आहे. याशिवाय वारकऱ्यांची फसवणूक देखील होण्याची शक्यता आहे.

विठोबाला कंठी तुळशी हार आवडीचा आहे. अगदी त्याच पद्धतीने वारकऱ्यांना तुळशीची माळ प्रिय आहे. ज्याच्या गळ्यात तुळशी माळ तो वारकरी अशी ओळख आहे.आषाढी वारी साठी पंढरपुरात काशी कापडी समाजातील लोक तुळशी माळ बनवण्याचा पारंपरिक व्यवसाय करतात. त्यांच्या कुटुंबात आता माळा बनवण्यासाठी लगबग सुरू आहे.

108 मण्यांची लहान, मध्यम आणि मोठी अशा आकारातील तुळशी माळ बनवली जाते. पण सध्या या व्यवसायातसुद्धा चायना माळा विक्रीला आल्या आहेत. त्यामुळे या माळा कशा ओळखायच्या हे एक कोडे आहे. पंढरपूर शहरात लगतच्या गावात तुळशीचे उत्पादन घेतले जाते. तुळशी माळ विक्रीतीतून लाखो रूपयांची उलाढाल होते.

Non Stop LIVE Update
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?.
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण.
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं.
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा.
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?.
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री.
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली.
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज.
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?.
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर.