AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

योग्य दिशा व आकाराचा आरसा घरात आणतो सुख आणि समृद्धी, जाणून घ्या वास्तू टिप्स

प्रत्येकजण आपल्या घरात चेहऱ्याचे सौंदर्य पाहण्यापासून ते केस विंचरण्यापर्यंत सर्व गोष्टींसाठी आरशाचा वापर करतो. पण तुम्हाला माहित आहे का की घरात आरसे ठेवण्याचे काही विशिष्ट नियम आहेत वास्तूनुसार आरशांची योग्य दिशा आणि आकार याबद्दल जाणून घेऊयात.

योग्य दिशा व आकाराचा आरसा घरात आणतो सुख आणि समृद्धी, जाणून घ्या वास्तू टिप्स
| Edited By: | Updated on: May 03, 2026 | 4:12 PM
Share

वास्तुशास्त्रानुसार घराला व घरात ठेवणाऱ्या प्रत्येक वस्तूला खूप महत्व आहे. त्यामुळे आपण वास्तुशास्त्राच्या सल्ल्यानुसार घरातील वस्तू ठेवत असतो. घरात ठेवलेल्या प्रत्येक वस्तूचा घरात राहणाऱ्या लोकांवर परिणाम होतो. तुम्ही स्वतःची निगा राखण्यापासून ते स्वतःच्या सौंदर्याचे कौतुक करण्यापर्यंत प्रत्येक गोष्टीसाठी जो आरसा वापरता, तो केवळ तुमचेच प्रतिबिंब दाखवत नाही तर तुमच्या घरातील सुदैव आणि दुर्दैवावरही प्रभाव टाकतो. वास्तुशास्त्रानुसार योग्य दिशेत आणि योग्य आकाराचा आरसा सुख आणि समृद्धी आणतो. तर चुकीच्या दिशेला लावलेला आरसा अनेकदा समस्या निर्माण करतात. चला आरशांशी संबंधित वास्तुशास्त्राची तत्त्वे सविस्तरपणे जाणून घेऊयात.

घरात आरसा लावण्याची योग्य दिशा

वास्तुशास्त्रानुसार घरात कोणत्याही चुकीच्या ठिकाणी किंवा दिशेला आरसा ठेवणे योग्य नसते. कारण तुम्ही जर चुकीच्या ठिकाणी आरसा लावल्यास त्यातील नकारात्मक ऊर्जा दुःख आणि दुर्दैवाला कारणीभूत ठरते. वास्तुशास्त्रानुसार उत्तर, पूर्व किंवा ईशान्य दिशेला लावलेला आरसा शुभ मानला जातो. वास्तुशास्त्रानुसार या दिशांना फक्त आयताकृती आरसा लावावा. कारण आयताकृती किंवा चौरसाकृती आरसा सकारात्मक ऊर्जेच्या प्रवाहाला चालना देतो.

घरात आरसा कुठे लावू नये?

वास्तुशास्त्रानुसार ज्या ठिकाणी पुरेसा प्रकाश पोहोचत नाही, अशा ठिकाणी आरसे कधीही ठेवू किंवा लावू नयेत. वास्तुशास्त्रानुसार ज्या ठिकाणी नैसर्गिक प्रकाश पोहोचत नाही, अशा ठिकाणी ठेवलेले आरसे नकारात्मक ऊर्जा आकर्षित करू शकतात.

वास्तूनुसार बेडरूममध्ये आरसा ठेवणे टाळावे. जर तो ठेवायचाच असेल, तर तो अशा प्रकारे ठेवावा की त्यात पलंगाचे प्रतिबिंब दिसणार नाही. वास्तूनुसार जर बेडरूममधील आरशात पलंगाचे प्रतिबिंब दिसत असेल तर त्यामुळे वास्तूदोष निर्माण होतो, ज्याचा परिणाम वैवाहिक जीवनावर होऊ शकतो.

वास्तूनुसार घराच्या दक्षिण दिशेला आरसा ठेवू नये, कारण ती यमाची दिशा मानली जाते. त्याचप्रमाणे स्वयंपाकघरासमोरही आरसा ठेवू नये. वास्तूनुसार स्वयंपाकघरासमोरील आरशात अग्नीच्या ज्वालेचे प्रतिबिंब पडल्याने नकारात्मक परिणाम होतो.

वास्तुशास्त्रानुसार केवळ दिशा किंवा स्थानच नव्हे तर काही विशिष्ट आरसेसुद्धा वास्तुदोष निर्माण करू शकतात.

वास्तुशास्त्राच्या तत्त्वांनुसार तुटलेला किंवा धूसर आरसा घरात कधीही ठेवू नये. यामुळे दुःख आणि दुर्दैव ओढवते.

( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही) 

Follow Us
संतोष पंडित यांना अखेर जामीन मंजूर, चंद्रकांत पाटील व्हिडिओ प्रकरणात..
संतोष पंडित यांना अखेर जामीन मंजूर, चंद्रकांत पाटील व्हिडिओ प्रकरणात दिलासा
गणेशोत्सवात आंदोलन करणं... चंद्रशेखर बावनकुळे यांचे जरांगे पाटलांना...
गणेशोत्सवात आंदोलन करणं... चंद्रशेखर बावनकुळे यांचे मनोज जरांगे पाटील यांना आवाहन
आमच्या वहिनी आहेत ना’ या अभियानांतर्गत राष्ट्रवादीचा मास्टर प्लॅन...
आमच्या वहिनी आहेत ना’ या अभियानांतर्गत राष्ट्रवादीचा मास्टर प्लॅन; रणनीतीकार प्रशांत किशोर यांच्या नेतृत्त्वात...
शिवसेना कुणाची हे तर... आजच सुनावणी पार पडली अन् शिंदे गटातील महिला...
शिवसेना कुणाची हे तर... आजच सुनावणी पार पडली अन् शिंदे गटातील महिला नेत्याचं मोठं विधान
दिशा सालियान प्रकरणात आदित्य ठाकरेंनी मांडली भूमिका, स्वतः ट्वीट...
दिशा सालियान प्रकरणात आदित्य ठाकरेंनी मांडली भूमिका, स्वतः ट्वीटद्वारे केला खुलासा!
माझा मुंबईत जाऊनच जीव निघालाा तर... जरांगे पाटलांची प्रतिक्रिया...
माझा मुंबईत जाऊनच जीव निघालाा तर...  आंदोलनाविषयी मनोज जरांगे पाटलांची मोठी प्रतिक्रिया!
त्यांच्यांतील लोकंच म्हणातात, जरांगे आंदोलनस्थळी... छगन भुजबळ नेमकं...
त्यांच्यांतील लोकंच म्हणातात, जरांगे आंदोलनस्थळी... छगन भुजबळ नेमकं काय म्हणाले?
बीड पाटोदा रस्त्यावर मराठा आंदोलकांचा रास्ता रोको; चलो मुंबईचा नारा...
बीड पाटोदा रस्त्यावर मराठा आंदोलकांचा रास्ता रोको; चलो मुंबईचा नारा...
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, डॉक्टरांनी दिली महत्त्वाची...
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, डॉक्टरांनी दिली महत्त्वाची माहिती
बिमारी का बहाना है, तुम्हे मुंबई... गुणरत्न सदावर्तेंनची जरांगेंवर...
बिमारी का बहाना है, तुम्हे मुंबई... गुणरत्न सदावर्तेंनची मनोज जरांगेंवर अजब कविता