
आपल्यापैकी अनेक आई- वडील असे आहेत जे त्यांच्या मुलांचे अभ्यासावर लक्ष केंद्रित करण्यासाठी अनेक गोष्टींचा अवलंब करत असतात जेणेकरून त्यांच्या मुलांचा अभ्यास हा सोयीस्कर होईल. तसेच वास्तुशास्त्रानुसार पाहिले गेलं तर मुलं ज्या खोलीत अभ्यास करतात त्या खोलीचा रंग खूप महत्वाचा असतो. कारण खोलीतील रंग हा मुलांच्या मनावर आणि मेंदूवर परिणाम होत असतो. त्यामुळे योग्य रंग निवडल्याने मुलांच्या जीवनात सकारात्मकता, आनंद आणि यश येते
खोलीतील भिंतींच्या रंगांपासून ते त्यांच्या आवडत्या पुस्तकांच्या जागेपर्यंत, सर्वकाही गोष्टी या सकारात्मक ऊर्जा संतुलन करण्यास मदत करतात. वास्तूच्या नियमांचा अवलंब करून तुम्ही तुमच्या मुलांची खोली एक आनंददायी आणि प्रेरणादायी जागा बनवू शकता. लहान मुलांसाठी खोलीचा रंग आणि इतर गोष्टी कशा ठेवाव्यात हे वास्तुशास्त्रानुसार जाणून घेऊयात.
मुलं जेथे अभ्यास करतात त्या खोलीची दिशा खूप महत्त्वाची आहे, कारण त्याचा परिणाम त्यांच्या एकाग्रतेवर आणि यशावर होऊ शकतो. पश्चिम आणि नैऋत्य मधला कोपरा अभ्यासासाठी उत्तम जागा आहे. तुम्ही ईशान्य किंवा पूर्व दिशेला स्टडी रूम देखील बनवू शकता. यामुळे मुलांना अभ्यासावर लक्ष केंद्रित करण्यास आणि चांगले निकाल मिळण्यास मदत होईल.
अभ्यासासाठी स्वच्छ जागा खूप महत्त्वाची आहे. अभ्यासाचे टेबल व्यवस्थित असावे व पुस्तके व इतर गोष्टी व्यवस्थित ठेवाव्यात. कारण खोलीत जर वस्तू जागेवर नसल्यास लहान मुलांचे मन विचलित होते, म्हणून त्यांचे अभ्यास करण्याचे ठिकाण नेहमी व्यवस्थित आणि प्रेरणादायी बनवा.
जर खोलीत पश्चिम-दक्षिण-पश्चिम या दिशेला खेळणी, टीव्ही किंवा गेमिंग स्टेशन्स ठेवल्याने मुलांचे अभ्यासातून लक्ष विचलित होऊ शकते. त्याऐवजी गणपतीची मूर्ती अभ्यासाच्या टेबलावर ठेवल्याने स्मरणशक्ती आणि शिकण्याची क्षमता सुधारते.
वास्तुशास्त्रानुसार मुलांच्या खोलीचा रंग त्यांच्या आयुष्यात महत्त्वाची भूमिका बजावतो. योग्य रंग आणि इतर गोष्टी निवडून तुम्ही त्यांचे भविष्य उज्ज्वल करू शकता.
( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)