Vastu Shastra : देवघरात चुकूनही ठेवू नका या 5 वस्तू, अन्यथा घरात गरिबी आलीच म्हणून समजा

हिंदू धर्मामध्ये वास्तुशास्त्राला खूप महत्त्व आहे, वास्तुशास्त्रानुसार अशा काही गोष्टी आहेत, ज्या देवघरात ठेवू नये असं सांगितलं जातं, त्याबद्दल आज आपण माहिती घेणार आहोत.

Vastu Shastra : देवघरात चुकूनही ठेवू नका या 5 वस्तू, अन्यथा घरात गरिबी आलीच म्हणून समजा
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Sep 14, 2025 | 1:31 PM

हिंदू धर्मामध्ये वास्तुशास्त्राला अनन्यसाधारण महत्त्व आहे, वास्तुशास्त्रामध्ये अशा अनेक गोष्टी सांगितल्या आहेत, ज्यामुळे तुमच्या घरातील नकरात्मक ऊर्जा नष्ट होऊन, घरात सकारात्मक ऊर्जेचा प्रभाव निर्माण होतो, ज्यामुळे तुमच्या आयुष्यातील सर्व समस्या दूर होतात, आरोग्याच्या समस्या निर्माण होत नाहीत, घरातील तिजोरीही सतत पैशांनी भरलेली राहाते, कधीच आर्थिक अडचण जाणवत नाही, असं शास्त्रामध्ये सांगण्यात आलं आहे, त्यामुळे आजही अनेक जाण आपलं घर बांधताना वास्तुशास्त्राचा आधार घेतात.

दरम्यान तुमच्या घरात सगळ्यात महत्त्वाचं असंत ते म्हणजे तुमच्या घरात असलेलं देवघर किंवा मंदिर, वास्तुशास्त्रानुसार अशा काही गोष्टी आहेत, ज्या देवघरात ठेवू नये, ज्यामुळे घरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट होऊन, घर नकारात्मक गोष्टीने भरू जातं. त्याचा मोठा फटका तुम्हाला बसू शकतो, त्या नेमक्या कोणत्या गोष्टी आहेत? आणि वास्तुशास्त्र काय सांगतं? याबद्दल आज आपण माहिती घेणार आहेत.

तुटलेली मूर्ती – वास्तुशास्त्रानुसार देवघरामध्ये कधीही तुटलेली देवाची मूर्ती असू नये, यामुळे नकारात्मक ऊर्जा निर्माण होते. त्याचा तुमच्या आर्थिक स्थितीवर परिणाम होतो.

फाटलेले किंवा जिर्ण झालेले ग्रंथ, पोथ्या – वास्तुशास्त्रानुसार देवघरामध्ये कधीही फाटलेले किंवा जीर्ण झालेले धार्मिक ग्रंथ असता कामा नये.

सुकलेल फूलं – अनेकांना सवय असते सकाळी पूजा केल्यानंतर जोपर्यंत निर्माल्याचं विसर्जन होत नाही तोपर्यंत ते फुलं तसेच देवघरात पडून राहतात. मात्र वास्तुशास्त्रानुसार सुकली फूल, किंवा फुलांचे हार देवघरात ठेवू नये, त्याचं योग्य पद्धतीनं विसर्जन करावं.

पितरांचे फोटो – अनेक जणांना अशी सवय असते की ते आपल्या पितरांचे अर्थात पूर्वजांचे फोटो देखील देवघरात ठेवतात, मात्र वास्तुशास्त्रानुसार असं करता कामा नये, देवघरामध्ये फक्त देवाचेच फोटो मूर्ती असाव्यात, तुम्ही पितरांचे फोटो घराच्या इतर ठिकाणी लावू शकतात. मात्र एक लक्षात ठेवा पितरांचा फोटो हा नेहमी दक्षिण दिशेलाच असावा.

अस्वच्छता – तुमचं घर नेहमी स्वच्छ असावं, देवघरात अस्वच्छता असू नये.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)