Chanakya Niti | पालकांनी मुलांसोबत कोणत्या वयात कसं वागावं, चाणक्य नीति काय सांगते जाणून घ्या

| Updated on: Aug 24, 2021 | 7:20 AM

आचार्य चाणक्य एक कुशल रणनीतिकार आणि अर्थशास्त्रज्ञ होते. त्यांनी आयुष्यात अनेक पुस्तके लिहिली. अर्थशास्त्र आणि नीतिशास्त्र ही त्यांची लोकप्रिय पुस्तके होती. चाणक्य यांच्या नीतिशास्त्रात जीवनाशी संबंधित प्रत्येक पैलू सांगितला गेला आहे. जर एखाद्या व्यक्तीने या पुस्तकात लिहिलेल्या गोष्टींचे अनुसरण केले तर त्याला नक्कीच यश मिळते.

Chanakya Niti | पालकांनी मुलांसोबत कोणत्या वयात कसं वागावं, चाणक्य नीति काय सांगते जाणून घ्या
स्वतःचे त्रास स्वत: पर्यंत ठेवा - चाणक्य नीतीनुसार, तुमच्या आयुष्यातील त्रास इतरांना शेअर करणे टाळले पाहिजे. तुमची समस्या जाणून घेतल्यानंतर लोक तुमची थट्टा करतील. तुम्हाला त्यांच्या कडून कोणतीच मदत होणार नाही.
Follow us on

मुंबई : आचार्य चाणक्य एक कुशल रणनीतिकार आणि अर्थशास्त्रज्ञ होते. त्यांनी आयुष्यात अनेक पुस्तके लिहिली. अर्थशास्त्र आणि नीतिशास्त्र ही त्यांची लोकप्रिय पुस्तके होती. चाणक्य यांच्या नीतिशास्त्रात जीवनाशी संबंधित प्रत्येक पैलू सांगितला गेला आहे. जर एखाद्या व्यक्तीने या पुस्तकात लिहिलेल्या गोष्टींचे अनुसरण केले तर त्याला नक्कीच यश मिळते.

प्रत्येक पालक आपल्या पद्धतीने मुलांची काळजी घेतात. त्याला चांगली मूल्ये देण्यात पालकांचे सर्वात मोठे योगदान आहे. म्हणूनच मुलांशी पालक कसे वागतात हे जाणून घेणे फार महत्वाचे आहे. मुलाच्या वाढत्या वयाबरोबर, त्यांच्याशी वागणूक बदलणे खूप महत्वाचे आहे. आचार्य चाणक्य यांनी नीतिशास्त्रात याबद्दल सांगितले आहे. पालकांनी मुलांशी कसे वागावे? त्याबद्दल जाणून घेऊया –

पांच वर्ष लौं लालिये, दस लौं ताड़न देई,
सुतहीं सोलह बरस में, मित्र सरसि गनि लेई

आचार्य चाणक्य यांनी या श्लोकात सांगितले आहे की, पालकांनी कोणत्या वयात मुलांशी कसे वागावे. या श्लोकाचा अर्थ असा आहे की पालकांनी मुलांवर पाच वर्षे खूप प्रेम केले पाहिजे. कारण, यावेळी मूल निर्दोष असतात. या वयात, मुलांना योग्य आणि अयोग्य समजत नाही. या वयात केलेली चूक हेतुपुरस्सर नाही.

चाणक्य म्हणतात की, मूल पाच वर्षांचे झाल्यावर त्याला चूक केल्याबद्दल फटकारले पाहिजे. कारण या वयात त्याला गोष्टी समजायला लागतात. म्हणून, जेव्हा आवश्यक असेल तेव्हा मुलांचा लाड करण्याबरोबरच त्यांना खडसावले देखील पाहिजे.

जेव्हा मुलं 10 वर्षांची असतात

आचार्य चाणक्य यांच्या मते, जेव्हा एखादे मूल 10 ते 15 वर्षांचे होते, तेव्हा त्याच्याशी कठोरपणे वागावे. कारण या काळात मुलं हट्टी होऊ लागते, मग त्यांच्याशी काही कठोर वर्तन करणे आवश्यक असते. जर मुलाने चुकीच्या गोष्टीचा आग्रह धरला तर त्याला कठोर शिक्षा केली जाऊ शकते. परंतु पालकांनी मुलांशी वागताना संयम बाळगावा, भाषेवर नियंत्रण ठेवावे.

16 व्या वर्षी मुलांशी कसे वागावे

आचार्य चाणक्य म्हणतात की, जेव्हा एखादे मूल 16 वर्षांचे असते तेव्हा त्याला मारणे आणि रागावण्याऐवजी त्याला मित्रासारखे वागवले पाहिजे. हे वय खूप नाजूक आहे. या वयात पालकांनी मुलांना समजावून सांगून त्यांची चूक लक्षात आणून दिली पाहिजे.

टीप – या लेखात देण्यात आलेली माहिती, सूचना आणि मान्यता ही उपलब्ध सामान्य माहितीवर आधारित आहे. कुठलाही उपाय करण्यापूर्वी ज्योतिष विषयातील जाणकारांशी संपर्क करा…

संबंधित बातम्या :

Chanakya Niti | जर तुमच्या आयुष्यात ही दोन नाती असतील तर तुमच्यापेक्षा श्रीमंत या जगात कोणी नाही

Chanakya Niti | ज्या व्यक्तीच्या आयुष्यात ही 3 सुख असतात, तो स्वर्गाचीही इच्छा करत नाही, कारण…