Chanakya Niti : साध्या, सरळ स्वभावाच्या व्यक्तींना नेहमीच त्रास दिला जातो

| Updated on: Jul 31, 2021 | 7:43 AM

आचार्य चाणक्य यांनी त्यांच्या चाणक्य नीति ग्रंथात ज्ञानाच्या अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. जर तुम्ही आचार्यांच्या गोष्टी समजून घेतल्या आणि आत्मसात केल्या तर तुम्ही स्वतःला अनेक प्रकारच्या अडचणींपासून वाचू शकता आणि तुमचे जीवन सोपे करू शकता.

Chanakya Niti : साध्या, सरळ स्वभावाच्या व्यक्तींना नेहमीच त्रास दिला जातो
Chanakya Niti
Follow us on

मुंबई : आचार्य चाणक्य यांनी त्यांच्या चाणक्य नीति ग्रंथात ज्ञानाच्या अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. जर तुम्ही आचार्यांच्या गोष्टी समजून घेतल्या आणि आत्मसात केल्या तर तुम्ही स्वतःला अनेक प्रकारच्या अडचणींपासून वाचू शकता आणि तुमचे जीवन सोपे करू शकता. आचार्य यांची धोरणे माणसाला योग्य आणि अयोग्य यात फरक करायला शिकवतात आणि नेहमी धर्माच्या मार्गावर चालण्याची प्रेरणा देतात (Acharya Chanakya Said People With Simple Nature Will Always Harassed By The Others In Chanakya Niti ).

आचार्य चाणक्य यांनी चाणक्य नीतिच्या सातव्या अध्यायातील बाराव्या श्लोकात सांगितले आहे की कोणत्या प्रकारच्या लोकांना त्यांच्या स्वभावामुळे नेहमीच त्रास दिला जातो.

नात्यन्तं सरलेन भाव्यं गत्वा पश्य वनस्थलीम्
छिद्यन्ते सरलास्तत्र कुब्जास्तिष्ठन्ति पादपाः

या श्लोकाद्वारे आचार्य म्हणतात की, ज्या लोकांचा स्वभाव अत्यंत सरळ आहे, त्यांच्यासाठी हे जीवन अत्यंत वेदनादायक बनते. याचे एक साधे उदाहरण म्हणजे जंगलात उपस्थित असलेली झाडे. जर तुम्ही बघितले तर तुम्हाला दिसेल की जी झाडे सरळ उभी आहेत ती प्रथम कापली जातात. हा मानवांसाठी एक धडा आहे ज्यापासून प्रत्येक व्यक्तीने शिकले पाहिजे.

चाणक्य म्हणतात की, ज्या व्यक्तीचा स्वभाव आवश्यकतेपेक्षा अधिक सरळ, साधा आणि सहज असतो, त्यांना समाजात शांततेने राहणे खूप कठीण होते. कोणाचेही नुकसान न करताही त्यांना अडकवले जाते. हुशार आणि चालाख लोक त्यांचा लाभ घेण्याची संधी कधीही सोडत नाहीत.

अशा लोकांना समाजात कमकुवत मानले जाते. म्हणूनच लोक त्यांना त्रास देतात. अशा लोक कुणालाही काहीही त्रास देत नसतानाही त्यांना त्रास दिला जातो. कारण प्रत्येकाला माहित आहे की ते कोणाचेही नुकसान करु शकत नाहीत. म्हणूनच समाजात राहणारे लोक त्याचा लाभ घेऊ नयेत म्हणून प्रत्येक व्यक्तीने थोडे हुशार आणि चालाख असणे अत्यंत आवश्यक आहे. आपण कोणाचेही नुकसान करु नये, परंतु स्वतःचे आणि आपल्या कुटुंबाचे भले करण्यासाठी बुद्धिमत्ता कौशल्य आणि शक्ती दोन्ही असणे आवश्यक आहे. तरच तुम्ही तुमच्या कुटुंबाचे पोट भरु शकाल आणि या समाजातील वाईट लोकांमध्ये सुरक्षित राहू शकाल.

Acharya Chanakya Said People With Simple Nature Will Always Harassed By The Others In Chanakya Niti

टीप – या लेखात देण्यात आलेली माहिती, सूचना आणि मान्यता ही उपलब्ध सामान्य माहितीवर आधारित आहे. कुठलाही उपाय करण्यापूर्वी ज्योतिष विषयातील जाणकारांशी संपर्क करा…

संबंधित बातम्या :

Chanakya Niti : या गोष्टी ठरतात एखाद्या व्यक्तीच्या वाईट काळाचे कारण, जाणून घ्या चाणक्य नीति काय म्हणते ते

Chanakya Niti | अत्यंत आदरणीय असतात हे 7 व्यक्ती, यांना चुकूनही पाय लावू नये