AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Chanakya Niti | अत्यंत आदरणीय असतात हे 7 व्यक्ती, यांना चुकूनही पाय लावू नये

लहानपणी आपले पालक अनेकदा आपल्याला काही गोष्टींना पाय लागण्यापासून रोखतात. त्यांचा उद्देश आपल्याला हे शिकवणे आहे की आपण सर्व आदरणीय लोकांचा आणि गोष्टींचा आदर केला पाहिजे. बालपणात पालकांनी दिलेले हे संस्कार आपल्या व्यक्तिमत्त्वाचा पाया बनतात.

Chanakya Niti | अत्यंत आदरणीय असतात हे 7 व्यक्ती, यांना चुकूनही पाय लावू नये
जर तुम्हाला जीवनाचा मार्ग सुलभ करायचा असेल तर आचार्य चाणक्याच्या या गोष्टी लक्षात ठेवा
| Edited By: Nupur Chilkulwar | Updated on: Jul 21, 2021 | 7:58 AM
Share

मुंबई : लहानपणी आपले पालक अनेकदा आपल्याला काही गोष्टींना पाय लागण्यापासून रोखतात. त्यांचा उद्देश आपल्याला हे शिकवणे आहे की आपण सर्व आदरणीय लोकांचा आणि गोष्टींचा आदर केला पाहिजे. बालपणात पालकांनी दिलेले हे संस्कार आपल्या व्यक्तिमत्त्वाचा पाया बनतात (Acharya Chanakya Said Do Not Touch These 7 People With Your Feet Who Are Very Respectful).

आचार्य चाणक्य यांनी आपल्या चाणक्य नीति ग्रंथातील सातव्या अध्यायातील सहाव्या श्लोकात असे सात लोक सांगितले आहेत, ज्यांना चुकूनही पाय लागू नये. आचार्य चाणक्य हे प्रत्येक विषयाचे जाणकार होते आणि त्यांनी आयुष्यात जे काही सांगितले ते त्यांनी आपल्या अनुभवाच्या आधारे आणि लोकांचे हित लक्षात घेऊन सांगितले आहे. आचार्य यांनी आयुष्यभर लोकांना खूप मदत केली आणि आपल्या चाणक्य नीति या ग्रंथात त्यांनी आयुष्याशी संबंधित जवळजवळ प्रत्येक बाबींला स्पर्श केला आहे आणि अशा अनेक रहस्यमय गोष्टी सांगितल्या आहेत, ज्या एखाद्या व्यक्तीला समजल्या तर त्याचे आयुष्य सुधारु शकते.

पादाभ्यां न स्पृशेदग्निं गुरु ब्राह्मणमेव च नैव गां न कुमारीं च न वृद्धं न शिशुं तथा

? या श्लोकाद्वारे आचार्य यांनी सांगितले आहे की अग्नि, गुरू, ब्राह्मण, गाय, कुमारी, वृद्ध आणि लहान बाळाला कधीही पाय लागू नये. आचार्य यांनी सांगितल्याप्रमाणे हे समजून घ्या.

? शास्त्रांमध्ये अग्निला भगवानचा दर्जा देण्यात आला आहे, घरात यज्ञ वगैरे असेल तर अग्नी पेटवून शुद्धीकरण केले जाते. म्हणून अग्निला कधीही पाय लावू नये. अग्निचा अपमान करणे हा देवतांचा अपमान मानला जातो. या व्यतिरिक्त, जर आग तीव्र असेल तर ती आपल्यालाही नुकसान पोहोचवू शकते. म्हणून अग्नीला लांबून प्रणाम करा.

? गुरु, ब्राह्मण आणि वृद्ध व्यक्ती आदरणीय मानले जातात आणि आमचे संस्कार म्हणतात की ज्याला आदरणीय असतील पूजनीय असतात त्यांच्या पायांना नेहमी हाताने स्पर्श करुन आशीर्वाद घ्यावा. त्यांना कधीच आपला पाय लागू देऊ नये.

? शास्त्रामध्ये गाय पूजनीय मानली जाते आणि मुलगी ही देवीचे रुप असल्याचे म्हटले जाते आणि मूल हे देवाचे रुप असल्याचे म्हटले जाते. अशा परिस्थितीत या तिघांनाही पाय लागू देऊ नये. अथर्ववेदात गायीला पाय लागल्यास शिक्षेची तरतूद आहे.

Acharya Chanakya Said Do Not Touch These 7 People With Your Feet Who Are Very Respectful

टीप – या लेखात देण्यात आलेली माहिती, सूचना आणि मान्यता ही उपलब्ध सामान्य माहितीवर आधारित आहे. कुठलाही उपाय करण्यापूर्वी ज्योतिष विषयातील जाणकारांशी संपर्क करा…

संबंधित बातम्या :

Chanakya Niti | या प्रकारच्या व्यक्तींचं स्वत:चं अस्तित्व नसते, जाणून घ्या आचार्य चाणक्य काय सांगतात

Chanakya Niti | या चार गोष्टींमध्ये महिला पुरुषांपेक्षा नेहमी असतात पुढे, जाणून घ्या आचार्य चाणक्य काय सांगतात

Follow Us
उत्तर प्रदेशात परतीच्या मान्सूनचा कहर, शेती व रस्ते पाण्याखाली
उत्तर प्रदेशात परतीच्या मान्सूनचा कहर, शेती व रस्ते पाण्याखाली, जनजीवन विस्कळीत
उत्तर प्रदेशात मुसळधार पावसाचा कहर; 48 तासांत 15 बळी, शेकडो कुटुंबांवर
Uttar Pradesh : उत्तर प्रदेशात मुसळधार पावसाचा कहर; 48 तासांत 15 बळी, शेकडो कुटुंबांवर संकट
मतांची चोरी नाही तर... राहुल गांधींचा मेंदू चोरीला गेलाय...
Devendra Fadnavis : मतांची चोरी नाही तर... राहुल गांधींचा मेंदू चोरीला गेलाय; फडणवीसांचा राहुल गांधींवर जोरदार हल्लाबोल
नुसते दौरे करण्यापेक्षा मदत घेऊन जा; राऊतांचा विरोधकांना...
नुसते दौरे करण्यापेक्षा मदत घेऊन शेतकऱ्यांकडे जा; संजय राऊतांचा विरोधकांना सल्ला
CM फडणवीसांचा विरोधकांवर निशाणा, निवडणूक आयोगावरील आरोपांवरून सुनावलं
CM फडणवीसांचा विरोधकांवर निशाणा, निवडणूक आयोगावरील आरोपांवरून सुनावलं
ठाकरे बंधूंची एकत्र पत्रकार परिषद! 4 ऑक्टोबरच्या मोर्चापूर्वी...
ठाकरे बंधूंची एकत्र पत्रकार परिषद! 4 ऑक्टोबरच्या मोर्चापूर्वी राज-उद्धव ठाकरे घेणार मोठा निर्णय?
EVM मॅनेज केला जात आहे? रोहित पवारांच्या दाव्यांनी राजकारणात खळबळ
EVM मॅनेज केला जात आहे? रोहित पवारांच्या दाव्यांनी राजकारणात खळबळ
आदित्य ठाकरेंचा दुष्काळ पाहणी दौरा, शेतकऱ्यांना तातडीने मदती करण्याची
आदित्य ठाकरेंचा दुष्काळ पाहणी दौरा, शेतकऱ्यांना तातडीने मदती करण्याची मागणी
दुष्काळात लग्न साधं करण्याच्या आवाहनावर राऊत आक्रमक; विखेंना...
दुष्काळात लग्न साधं करण्याच्या आवाहनावर राऊत आक्रमक; विखेंना दिलं उत्तर
मुंबईत गोंधळ केलेला चालणार नाही, तुम्हाला...ठाकरे बंधूंच्या मोर्चावर..
मुंबईत गोंधळ केलेला चालणार नाही, तुम्हाला...ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदावर्तेंचा थेट इशारा