Ashta Lakshmi | आयुष्यात सर्व सुखं हवे असतील तर अष्ट लक्ष्मीची मनोभावे उपासना करा, जाणून घ्या कोणत्या पूजेने काय फळ मिळेल

| Updated on: Aug 20, 2021 | 1:04 PM

सनातन परंपरेत जीवनातील सर्व सुख उपभोगण्यासाठी देवी लक्ष्मीची उपासना करण्यास सांगितले गेले आहे. समुद्र मंथनातून उदयास आलेल्या श्रीमंतीची देवी लक्ष्मीच्या कृपेने व्यक्तीला आयुष्यात धन-धान्याचे सुख प्राप्त होते. भगवान विष्णूची पत्नी देवी लक्ष्मीला आदिशक्ती असेही म्हटले जाते, परंतु तुम्हाला माहित आहे का की लक्ष्मी देवीच्या एक नव्हे तर आठ रुपांची पूजा केली जाते.

Ashta Lakshmi | आयुष्यात सर्व सुखं हवे असतील तर अष्ट लक्ष्मीची मनोभावे उपासना करा, जाणून घ्या कोणत्या पूजेने काय फळ मिळेल
दिवाळीला अष्टलक्ष्मी साधना केल्यास पैशाशी संबंधित प्रत्येक इच्छा होईल पूर्ण
Follow us on

मुंबई : सनातन परंपरेत जीवनातील सर्व सुख उपभोगण्यासाठी देवी लक्ष्मीची उपासना करण्यास सांगितले गेले आहे. समुद्र मंथनातून उदयास आलेल्या श्रीमंतीची देवी लक्ष्मीच्या कृपेने व्यक्तीला आयुष्यात धन-धान्याचे सुख प्राप्त होते. भगवान विष्णूची पत्नी देवी लक्ष्मीला आदिशक्ती असेही म्हटले जाते, परंतु तुम्हाला माहित आहे का की लक्ष्मी देवीच्या एक नव्हे तर आठ रुपांची पूजा केली जाते.

अष्ट लक्ष्मीची साधना का करावी?

या कोरोना कालावधीत तुमचा व्यवसाय ठप्प झाला असेल किंवा उत्पन्नाची सर्व साधने संपली असतील आणि तुम्ही आर्थिकदृष्ट्या अडचणीत असाल तर आयुष्य सुखी आणि समृद्ध होण्यासाठी तुम्ही देवी लक्ष्मीच्या या आठ स्वरुपांची पूजा अवश्य करायला हवी. अष्ट लक्ष्मीची पूजा केल्याने तुम्हाला केवळ संपत्तीच नाही तर कीर्ती, आयु, वाहन, पुत्र, घर इत्यादींची प्राप्ती होते. अष्ट लक्ष्मीची साधना केल्याने तुम्हाला आठ प्रकारचे ऐश्वर्य मिळू लागते. देवी लक्ष्मीच्या आठ रुपांची भक्तीने पूजा केल्याने तुम्हाला तेज, सामर्थ्य, धैर्य, सौंदर्य आणि अनेक प्रकारचे आनंद मिळतात.

आदिलक्ष्मी

देवी लक्ष्मीचे पहिले रुप आदि लक्ष्मीचे आहे. त्यांची साधना केल्याने भक्ताला अनेक प्रकारचे सुख आणि संपत्ती मिळते.

धन लक्ष्मी

देवी लक्ष्मीच्या या स्वरुपाची पूजा, जप आणि ध्यान केल्याने भक्ताचे घर नेहमी संपत्तीने भरलेले असते. त्याला विविध स्रोतांमधून उत्पन्न मिळत राहाते.

ऐश्वर्य लक्ष्मी

देवी लक्ष्मीच्या या रुपाची पूजा केल्याने व्यक्तीला समाजात खूप प्रसिद्धी प्राप्त होते. त्याची कीर्ती आणि प्रतिष्ठा वाढते. तो जीवनात अनेक प्रकारचे ऐश्वर्य प्राप्त करतो.

संतान लक्ष्मी

आयुष्यात तुमच्याकडे कितीही पैसा असला तरी तुमच्या घरात मुले नसतील तर माणसाचा आनंद अपूर्ण असतो. श्रीमंतीच्या देवी लक्ष्मीच्या या स्वरुपाची पूजा केल्याने सुंदर, सद्गुणी आणि सुसंस्कृत संतानची प्राप्ती होते.

धान्य लक्ष्मी

जेव्हा आपण देवाकडे आनंदाची इच्छा व्यक्त करतो, तेव्हा नेहमी असे म्हणतो की आपले घर संपत्तीने परिपूर्ण असावे. देवीच्या या स्वरुपाची साधना केल्याने व्यक्तीचे घर नेहमी अन्नधान्याने भरलेले असते. देवी लक्ष्मी सदैव आपल्या घरात अन्नाच्या रुपात वास करते. ज्या लोकांच्या घरात अन्नाचा अपव्यय होतो, लक्ष्मी जी त्या घरापासून दूर जातात, कारण अन्न हे देखील लक्ष्मीचे प्रतीक आहे.

गज लक्ष्मी

गजावर स्वार असलेल्या देवी लक्ष्मीच्या या रुपाची पूजा केल्याने व्यक्तीला राजसत्ता, सरकार इत्यादीकडून अनेक प्रकारचे सुख प्राप्त होते. देवीचे हे रुप शेती करणाऱ्या लोकांसाठी वरदान मानले जाते. असे मानले जाते की देवीच्या या स्वरुपाची पूजा केल्याने शेतकऱ्यांना चांगले पीक मिळते.

वीर लक्ष्मी

वीर लक्ष्मी हे देवी कात्यायनीचे रुप मानले जाते. असे मानले जाते की शुद्ध अंतःकरणाने पूजा केल्याने देवी वीर लक्ष्मी आपल्या भक्ताला अकाली मृत्यूपासून वाचवते. आईच्या कृपेने भक्तामध्ये आत्मविश्वास आणि धैर्य येते.

विजय लक्ष्मी

जर तुम्ही कोणत्याही प्रकरणाबाबत न्यायालयाच्या कचाट्यात सापडले असाल किंवा तुम्हाला नेहमी शत्रूंची भीती वाटत असेल तर तुम्ही देवी विजय लक्ष्मीची साधना अवश्य करा. देवी विजय लक्ष्मीच्या कृपेने, शत्रू स्वतः आपला पराभव मानून तुमच्यापुढे गुडघे टेकतील.

टीप – या लेखात देण्यात आलेली माहिती, सूचना आणि मान्यता ही उपलब्ध सामान्य माहितीवर आधारित आहे. कुठलाही उपाय करण्यापूर्वी ज्योतिष विषयातील जाणकारांशी संपर्क करा…

संबंधित बातम्या :

Putrada Ekadashi 2021 | पुत्रदा एकादशीच्या दिवशी चुकूनही ही कामं करु नये, अन्यथा आयुष्यात अनेक समस्या उद्भवतील

Putrada Ekadashi 2021 | आज पुत्रदा एकादशी, जाणून घ्या शुभ मुहूर्त आणि पूजा विधी