लक्ष्मीपूजनाच्या दिवशी चुकूनही करू नका या चुका, देवी लक्ष्मीची कृपा हवी असेल तर लक्षात ठेवा या गोष्टी!

दिवाळीत लक्ष्मीपूजनाला विशेष महत्त्व असते. देवी लक्ष्मीची कृपा आणि आशीर्वाद मिळावेत यासाठी पूजा करताना काही नियमांचे पालन करणे आवश्यक मानले जाते. लक्ष्मीपूजनाच्या वेळी कोणत्या चुका टाळाव्यात आणि कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी, जाणून घेऊया.

लक्ष्मीपूजनाच्या दिवशी चुकूनही करू नका या चुका, देवी लक्ष्मीची कृपा हवी असेल तर लक्षात ठेवा या गोष्टी!
laxmi Pujan
Image Credit source: टीव्ही ९ मराठी
| Edited By: | Updated on: Nov 07, 2026 | 10:11 PM

दिवाळीत लक्ष्मीपूजनाच्या दिवशी देवी लक्ष्मीची कृपा मिळावी, यासाठी तुम्हीही विशेष तयारी करता का? पण पूजेदरम्यान झालेली छोटीशी चूकही पूजेचे फळ कमी करू शकते, असे मानले जाते. दिव्यांचा आणि आनंदाचा हा पवित्र सण यंदा रविवार, ८ नोव्हेंबर २०२६ रोजी देशभरात मोठ्या उत्साहात साजरा केला जाणार आहे. या खास दिवशी घराघरांत देवी लक्ष्मी आणि गणपतीची पूजा केली जाते. मात्र, पूजेच्या वेळी काही नियम आणि महत्त्वाच्या गोष्टींचे पालन करणे आवश्यक मानले जाते. घरात सुख-समृद्धी नांदावी, अशी इच्छा असेल तर लक्ष्मीपूजन करताना कोणत्या चुका टाळाव्यात, हे आधीच जाणून घेणे महत्त्वाचे आहे.

कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी?
लक्ष्मीपूजनाच्या संध्याकाळी देवीच्या स्वागतासाठी घराची आणि स्वतःच्या स्वच्छतेची काळजी घ्यावी. मळकट किंवा फाटलेले कपडे घालून पूजेला बसू नये. तसेच पूजेच्या ठिकाणी अस्वच्छता किंवा खरकटी भांडी ठेवू नयेत. अंघोळ केल्यानंतरच पूजेची थाळी सजवावी. पूजा करताना मनात कोणाबद्दलही वाईट विचार न ठेवता श्रद्धेने आणि प्रसन्न मनाने पूजा करावी.
खंडित मूर्ती आणि फुटलेल्या दिव्यांचा वापर टाळा
लक्ष्मीपूजन करताना खंडित मूर्ती किंवा तुटलेल्या पूजेच्या साहित्याचा वापर करू नये, असे मानले जाते. देवी लक्ष्मी आणि गणपतीच्या मूर्तीचा कोणताही भाग तुटलेला किंवा त्याला तडा गेलेला असल्यास अशी मूर्ती पूजेसाठी वापरू नये. त्याचप्रमाणे तडे गेलेले किंवा फुटलेले दिवेही लावू नयेत. पूजेसाठी नेहमी स्वच्छ आणि सुस्थितीत असलेल्या मूर्ती व दिव्यांची निवड करावी.
पूजेच्या वेळी योग्य दिशा आणि नियम पाळा
लक्ष्मीपूजन करताना योग्य दिशेची निवड करणे महत्त्वाचे मानले जाते. पूजा करताना व्यक्तीचे तोंड पूर्व किंवा उत्तर दिशेला असावे, असे सांगितले जाते. दक्षिण दिशेला तोंड करून पूजा करणे टाळावे. तसेच पूजेदरम्यान मध्येच उठणे किंवा विनाकारण गप्पा मारू नयेत. आरती आणि नैवेद्य दाखवण्याची प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत संपूर्ण लक्ष पूजेकडे ठेवावे.
आरतीनंतर लगेच पूजेचे ठिकाण सोडू नका
अनेकजण पूजा आणि आरती पूर्ण झाल्यानंतर लगेच तेथून निघून जातात. मात्र, पूजेनंतर काही वेळ शांतपणे बसून प्रार्थना करावी, असे सांगितले जाते. घराच्या मुख्य दरवाजाजवळ लावलेला दिवा रात्रभर सुरक्षित राहील आणि विझणार नाही, याची काळजी घ्यावी. पूजेनंतर प्रसाद कुटुंबातील सर्व सदस्यांना आदराने वाटावा आणि तो तसाच विखुरलेला ठेवू नये.

Loading...

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us