AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Baba Vanga: सुखं म्हणजे काय असतं? या राशींना जॅकपॉट, बाबा वेंगाचं भाकीत वाचलं का?

Baba Vanga Prediction Weekly Horoscope: या राशींसाठी सुखाचे दार उघडणार आहे. या राशींना जॅकपॉट लागणार आहे. बाबा वेंगाचं ते भाकीत तुम्ही वाचलं का? कोणत्या आहेत त्या लकी राशी? कुणाला लागणार जॅकपॉट?

Baba Vanga: सुखं म्हणजे काय असतं? या राशींना जॅकपॉट, बाबा वेंगाचं भाकीत वाचलं का?
बाबा वेंगाची भविष्यवाणीImage Credit source: एजन्सी
| Updated on: May 09, 2026 | 4:33 PM
Share

Baba Vanga Prediction Weekly Lucky Rashifal 2026: बाबा वेंगा ही तिच्या भाकि‍तासाठी ओळखली जाते. 11 ते 17 मे या आठवड्यात या राशींसाठी सुख म्हणजे काय असतं, याची अनुभूती येणार आहे. त्यांना सुखी माणसाचा सदरा काय असतो ते कळणार आहे. त्यांच्यावर ग्रह हे खूश असतील. त्यांच्या भाग्याचे दरवाजे उघडतील. त्यांना चांगला फायदा होणार आहे. या पाच राशींसाठी अत्यंत शुभ संकेत मिळत आहेत. करिअर, आर्थिक स्थिती, कौटुंबिक जीवन, आरोग्य या प्रत्येक क्षेत्रात सकारात्मक परिणाम दिसेल.

वृषभ राशी- बाबा वेंगानुसार, वृषभ राशीच्या लोकांसाठी 11 ते 17 मे हा कालावधी विशेष असेल. या कालावधीत गेल्या अनेक दिवसांपासूनची कामं मार्गी लागतील. नोकरी आणि व्यवसाय, व्यापार उद्यमात लाभ मिळतील. आर्थिक बाजू अधिक मजबूत होईल. जीवनसाथीशी सूर जुळतील. तर गुंतवणुकीतून काही फायदे दिसून येतील. या आठवड्याची सुरुवातच शुभ फळांनी होईल.

कर्क राशी – कर्क राशीच्या लोकांसाठी मानसिक शांती आणि कौटुंबिक सुख काय असते याची जाणीव होईल. घरात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या अडचणी, भांडणं , कुरबुर अचानक गायब होतील. मानसिक शांतीचा अनुभव होईल. नोकरदारांना त्यांच्या बॉसचे सहकार्य मिळेल. बॉस त्यांच्या कामावर खूश असतील. तर नवीन नोकरीचे ऑफर लेटर अथवा बोलावणे आल्यास आश्चर्य वाटू देऊ नका. ग्रह तुमच्यावर सध्या लट्टू आहेत.

सिंह राशी- बाबा वेंगानुसार सिंह राशीच्या लोकांना 11 ते 17 मे हा आठवडा उत्साहवर्धक आणि ऊर्जावान जाणवेल. भाग्याची पूर्ण साथ मिळेल. अनेक दिवसांपासून व्यवसायात येत असलेल्या अडचणी दूर होतील. उत्पन्नाचे नवीन साधनं, स्त्रोत मिळतील. आर्थिक बाजू भक्कम असेल. वैवाहिक जीवनात गोडवा येईल. तर या काळात जमीन , घर खरेदीचे योग ही तयार होत आहे.

धनू राशी- धनु राशीच्या लोकांना आगामी आठवडा हा सुखाचा, समाधानाचा आणि सुखद धक्क्यांचा असेल. गेल्या अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेली कामे मार्गी लागतील. तर करिअरमध्ये नवीन संधी चालून येईल. व्यवसायातील भागीदार मदतीला पुढे येईल. व्यवसाय ,व्यापार करणाऱ्यांना फायदा होईल. लव्ह लाईफमध्ये चारचांद लावणारे क्षण आपोआप घडतील. तुमचा मान-सन्मान वाढेल.

कुंभ राशी- 11 ते 17 मे या काळात नवीन संधी दार ठोठावेल. ग्रहांच्या शुभ संकेतामुळे कुंभ राशीला आर्थिक लाभासह करिअरमध्ये नवीन उंची गाठता येईल. या काळात धार्मिक यात्रा अथवा मंदिरात जाऊन एखादी पुजा घडू शकते. त्यामुळे मनाची अस्थिरता कमी होईल. मनाला शांती लाभेल. गेल्या अनेक दिवसांपासून तुम्ही नोकरी बदलण्याचा विचार करत असाल तर हा आठवडा त्यासाठी उत्तम आहे. संधी आल्यास ती अजिबात सोडू नका. अथवा नवीन नोकरीसाठी प्रयत्न जरूर करा.

(डिस्क्लेमर : बाबा वांगा यांची भविष्यवाणी ही केवळ माहिती म्हणून देण्यात येत आहे. टीव्ही ९ मराठी त्याविषयी कोणताही दावा करत नाही.)

Follow Us
मनोज जरांगेंच्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद!
Manoj Jarange | मनोज जरांगेंच्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद! फडणवीसांसमोर मंत्र्यांनी व्यक्त केली नाराजी
मला मुंबईत जाऊन मरू द्या! मनोज जरांगे पाटील भावुक; आरक्षणासाठी...
Manoj Jarange | मला मुंबईत जाऊन मरू द्या! मनोज जरांगे पाटील भावुक; आरक्षणासाठी प्राणाची आहुती देण्याची तयारी
UPI वापरणाऱ्यांसाठी मोठी बातमी! ग्राहकांना नाही तर दुकानदारांना...
UPI वापरणाऱ्यांसाठी मोठी बातमी! ग्राहकांना नाही तर दुकानदारांना भरावे लागणार शुल्क, व्हिडिओ बघाच
थेट उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच प्रश्नचिन्ह; शिंदे गटाचा...
थेट उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच प्रश्न चिन्ह, शिंदे गटाचा युत्किवाद ठाकरेंचं टेन्शन वाढवणार?
बीडच्या पाटोद्यात मराठा आंदोलकांसाठी जेवण आणि पाण्याची व्यवस्था
Beed Maratha Protesters | बीडच्या पाटोद्यात मराठा आंदोलकांसाठी जेवण आणि पाण्याची मोठी व्यवस्था
अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या घरी बाप्पाचे आगमन, नवनीत राणांनी घेतले...
अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या घरी बाप्पाचे आगमन, नवनीत राणांनी घेतले दर्शन; खास सजावटीने वेधले लक्ष!
कागदी परवान्याला ब्रेक! आता महाराष्ट्रात खनिजांवर असेल डिजिटल वॉच...
कागदी परवान्याला ब्रेक! आता महाराष्ट्रात खनिजांवर असेल डिजिटल वॉच, नेमका अर्थ काय?
नवनीत राणांचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप; दिशा सालियन प्रकरणात...
नवनीत राणांचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप; दिशा सालियन प्रकरणात... नेमकं काय म्हणाल्या?
जरांगेंनी वापरलेल्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद, थेट सभेत...
Manoj Jarange Patil : जरांगेंनी वापरलेल्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद, थेट सभेत मंत्र्यांनी व्यक्त केली नाराजी
शिवसेना पक्ष, चिन्हावरील आजची सुनावणी संपली; मात्र आजच्या सुनावणीत...
Shivsena Hearing Big Update | शिवसेना पक्ष, चिन्हावरील आजची सुनावणी संपली; मात्र आजच्या सुनावणीत असं काय घडलं?