
‘बाल्कनच्या नोस्ट्राडेमस’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बल्गेरियातील रहस्यमय भविष्यवक्ता बाबा वेंगा यांच्या भविष्यवाण्या नेहमीच जगभरात चर्चेचा विषय ठरल्या आहेत. त्यांनी आत्तापर्यंत अनेक महत्वाची भाकितं केली असून ती बहुतांश वळा खरीही ठरल्याचे दिसून आले आहे. आता त्यांची आणखी एक भविष्यवाणी चर्चेत आली असून त्यामुळे अनेकांची उत्सुकता वाढू शकते. बाबा वेंगा यांच्या भाकितानुसार, 2028 मध्येच मानवता एका नवीन युगात प्रवेश करेल, ज्यामध्ये पुढील तीन वर्षांत चमत्कारिक बदल होतील आणि लोकं त्या बदलाचे साक्षीदार ठरतील .
बाबा वेंगा यांच्या या भाकिताचा अर्थ काय आहे आणि त्याचा आपल्या भविष्यावर कसा परिणाम होऊ शकतो ते जाणून घेऊया.
बाबा वेंगा: एक रहस्यमयी भविष्यवक्ता
बाबा वेंगा, यांचे खरे नाव व्हँजेलिया पांडेवा दिमित्रोवा होते, त्यांचा जन्म 1911 साली झाला. बालपणी एका वादळात दृष्टी गमावल्यानंतर, तिला भविष्य पाहण्याची अद्भुत शक्ती मिळाली. त्यांनी आत्तापर्यंत अनेक महत्वाची भाकित केली असून त्यांच्या भाकितामध्ये 9/11 चा दहशतवादी हल्ला, चेर्नोबिल दुर्घटना आणि कोविड-19 साथीच्या आजारासारख्या घटनांचा समावेश आहे, ज्यांना बरेच जण अचूक मानतात. 1996 मध्ये त्यांचे निधन झाले, परंतु त्यांच्या भाकितांमुळे आजही लोकां मोहित होत असतात.
एका नव्या युगाचे होणार आगमन
अजून 3 वर्षांनी, म्हणजेच 2028 साली मानवता एका नवीन युगात प्रवेश करेल. या काळात, एक नवीन ऊर्जा स्रोत शोधला जाईल, ज्यामुळे जगातून उपासमार दूर होईल. याशिवाय, मानव शुक्र ग्रहावर प्रवास करण्यास सुरुवात करेल, ज्यामुळे ऊर्जा संसाधनांचे नवीन दरवाजे उघडतील. हा वैज्ञानिक प्रगती आणि सामाजिक बदलांचा काळ असेल, जो मानवी संस्कृतीला एक नवीन दिशा देईल.
तीन वर्षांत चमत्कारी बदल
पुढील तीन वर्षांत, म्हणजे 2025 ते 2028 सालापर्यंत, बाबा वेंगा यांनी अनेक महत्त्वाच्या बदलांबद्दल भाकीत केले आहे. या काळात, हवामान बदल आणि समुद्र पातळी वाढणे यासारख्या पर्यावरणीय आव्हानांचा जगावर परिणाम होईल. तथापि, कृत्रिम अवयवांचे उत्पादन आणि कर्करोग उपचारातील प्रगती यासारख्या वैज्ञानिक शोधांमुळे मानवी जीवन सुधारेल. की या काळात मानवतेचे आध्यात्मिक जागरण होईल, ज्यामुळे समाजात सकारात्मक बदल होतील,असेही बाबा वेंगा यांनी नमूद केलं आहे.
तज्ज्ञ काय सांगतात ?
ज्योतिष आणि भविष्यवाणी तज्ञांचा असा विश्वास आहे की बाबा वेंगा यांच्या भविष्यवाण्या प्रतीकात्मक असू शकतात. त्यांच्या भविष्यवाण्या समजून घेण्यासाठी त्यांचे सखोल विश्लेषण आवश्यक आहे. काही तज्ञांचे म्हणणे आहे की नवीन ऊर्जा स्रोत सौर ऊर्जा किंवा न्यूक्लिअर फ्यूजन सारख्या तंत्रज्ञानाशी संबंधित असू शकतो. त्याच वेळी, शुक्राचा प्रवास अवकाश संशोधनातील नवीन कामगिरीचे संकेत देतात.
( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)