AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

NCP Merge: राष्ट्रवादी विलीनीकरणासाठी त्या तीन अटी; अखेरच्या त्या शर्तींमुळे होणार घात? धर्मराव बाबा आत्राम यांचा दावा काय?

NCP Merger Three Condition: दोन्ही राष्ट्रवादीतील विलीनि‍करणाबाबत आता अटी आणि शर्तीची एंट्री झाली आहे. प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी एक अट घातल्यानंतर आता राष्ट्रवादीचे विदर्भातील बडे नेते धर्मराव बाबा आत्राम यांनी तीन नवीन अटी घातल्या आहेत. तिसरी शर्त तर सर्वात कठीण मानली जात आहे.

NCP Merge: राष्ट्रवादी विलीनीकरणासाठी त्या तीन अटी; अखेरच्या त्या शर्तींमुळे होणार घात? धर्मराव बाबा आत्राम यांचा दावा काय?
शरद पवार, अजित पवार, धर्मराव बाबा आत्रामImage Credit source: एएनआय
| Edited By: | Updated on: Feb 04, 2026 | 1:26 PM
Share

Dharmarao Baba Atram on Sharad Pawar-Ajit Pawar NCP Merge: दोन्ही राष्ट्रवादीतील विलीनि‍करणाचा मुद्दा सध्या गाजत आहे. आतापर्यंत अजितदादा गट या चर्चांवर कानावर हात ठेवत आला आहे. अजितदादा यांच्या अकाली एक्झिटमुळे दोन्ही राष्ट्रवाद एकत्रि‍करणाची प्रक्रिया मध्येच थांबल्याचा दावा करण्यात येत आहे. अजितदादांच्या राष्ट्रवादीचे बडे नेते आतापर्यंत विलीनीकरणाची कोणतीही चर्चा झाली नसल्याचा दावा करत होते. आता ते दोन पावलं पुढं सरकली आहेत. त्यांनी आता विलीनीकरणासाठी अटी घालायला सुरुवात केली आहे. अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी अशीच अट सकाळी दिलेल्या मुलाखतीत घातली. तर आता विदर्भातील बडे नेते धर्मराव बाबा आत्राम यांनी तर तीन अटी घातल्या आहेत. या अटी मान्य असतील तरच दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाचे जणू संकेत देण्यात येत आहेत.

विलीनीकरणावर दादा कधीच बोलले नाही

अजितदादा पवार कधीही दोन्ही राष्ट्रवादी विलीनीकरणाबाबत आमच्याशी बोलले नाही असा दावा राष्ट्रवादी दादा गटाचे नेते धर्मराव बाबा आत्राम यांनी केला. तर विलीनि‍करणाची १२ फेब्रुवारी ही तारीख ठरली नव्हती, तारीख ठरली असती तर दादांनी आम्हाला सांगीतलं असतं असे आत्राम म्हणाले. दोन राष्ट्रवादी एकत्र येणार असल्याचा दावा शरद पवार गटाकडून करण्यात येत आहे. शरद पवार यांनी आज सकाळी पत्रकार परिषद घेतली. त्यात अजितदादा आणि जयंत पाटील यांच्यात याविषयीची चर्चा सुरू असल्याचे ते म्हणाले. तर त्यानंतर दिलेल्या प्रतिक्रियेत प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी अशी काही चर्चा सुरू नसल्याचा दावा केला. दादांनी याविषयीची कोणतीही कल्पना दिली नसल्याचे ते म्हणाले. त्याचवेळी आम्ही NDA चे घटक पक्ष आहोत. त्यामुळे ज्यांना आमच्यासोबत याचचे आहे. त्यांना एनडीएसोबत यावे लागेल अशी अट त्यांनी घातली.

त्या तीन अटी कोणत्या?

तर राष्ट्रवादीचे नेते धर्मराव बाबा आत्राम यांनी सुद्धा तीन अटी घालण्यात आल्या आहेत. या तीन अटी मान्य असतील तर दोन्ही राष्ट्रवादीचं विलीनीकरण होऊ शकतं असे संकेतच त्यांनी दिले. त्यामुळे आता दोन्ही राष्ट्रवादीचे विलीनीकरण होणार की नाही हा मोठा प्रश्न उभा ठाकला आहे. आतापर्यंत कानावर हात ठेवणारे नेते आता विलीनीकरणासाठी अटी घालत असल्याचे दिसत आहे.

1. दोन ताईंपैकी सुनेत्रा ताई आमच्या नेत्या आहेत. आम्ही आमचा नेता निवडला आहे. आमच्या पक्षात शरद पवार यांचा पक्ष विलीन झाल्यावर, सुप्रिया ताईंचा रोल काय राहील हे ठरवू. पण नेतृत्व सुनेत्रा ताई यांच्याकडे असेल अशी अट आत्राम यांनी पुढे केली.

2. आम्हाला एनडीए सोबत रहायचं आहे. आमचं चिन्ह घडी आहे. या चिन्हाखाली त्यांनी एकत्र यावं शरद पवार गटाने घडी स्वीकारून एकत्र यावं, सुनेत्रा ताई आमच्या पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष असतील.

3. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येत असतील तर एनडीए सोबत राहणं गरजेचं आहे, अशी तिसरी अट धर्मराव बाबा आत्राम यांनी घातली. एनडीएसोबत येत नसेल तर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊन फायदा नाही असा दावा त्यांनी केला.

Follow Us
फक्त 10 मिनिटांच्या पावसाने कल्याण-नगर महामार्ग जलमय! वाहतूक कोंडीने..
Kalyan Nagar Highway | Rain | फक्त 10 मिनिटांच्या पावसाने कल्याण-नगर महामार्ग जलमय! वाहतूक कोंडीने प्रवाशांचे हाल
दुष्काळसदृश परिस्थितीवर मोठी घोषणा, 5 तारखेपासून पिकांच्या नुकसानीच्या
Eknath Shinde : दुष्काळसदृश परिस्थितीवर मोठी घोषणा, 5 तारखेपासून पिकांच्या नुकसानीच्या पंचनाम्यांसाठी प्रशासनाला तयारीचे आदेश
मराठमोळ्या गोंधळ सिनेमाची ऑस्कर 2027 साठी भारताकडून अधिकृत निवड
Oscar2027 | मराठी सिनेमाची जगभरात दणदणीत एन्ट्री! गोंधळची ऑस्कर 2027 साठी भारताकडून अधिकृत निवड
आदित्य ठाकरेंना अटक करा, दिशा सालियन प्रकरणावर राणेंची थेट मागणी
Nitesh Rane | आदित्य ठाकरेंना अटक करा, चौकशी करा...दिशा सालियन प्रकरणावर नितेश राणेंची थेट मागणी; उद्धव ठाकरेंच्या आरोपांनाही  दिलं प्रत्युत्तर
ममता बॅनर्जींच्या गटाला फुटबॉल, ऋतब्रत गटाला लिफाफा...
TMC | ममता बॅनर्जींच्या गटाला फुटबॉल, ऋतब्रत गटाला लिफाफा! तृणमूल काँग्रेसच्या दोन गटांना निवडणूक आयोगाकडून नवी नावं-नवी चिन्हं जाहीर
Maharashtra Education | महाराष्ट्रात येणार 7 परदेशी विद्यापीठांचे, कॅम
Maharashtra Education | महाराष्ट्रात येणार 7 परदेशी विद्यापीठांचे, कॅम्पस फडणवीस म्हणाले...
ठाकरे सेनेचे आमदार सुनील प्रभू यांच्या गाडीची पादचाऱ्याला धडक
Sunil Prabhu | ठाकरे सेनेचे आमदार सुनील प्रभू यांच्या गाडीची पादचाऱ्याला धडक; 1 जण जखमी
सरकार 100 टक्के शेतकऱ्यांच्या पाठिशी! रवींद्र चव्हाणांचं मोठं आश्वासन
Ravindra Chavan | सरकार 100 टक्के शेतकऱ्यांच्या पाठिशी! रवींद्र चव्हाणांचं मोठं आश्वासन; मराठवाडा-विदर्भातील पावसाच्या स्थितीवर दिली महत्त्वाची माहिती, म्हणाले...
खेळता खेळता कारमध्ये शिरला, दरवाजा बंद झाला अन्...
Yavatmal | खेळता खेळता कारमध्ये शिरला, दरवाजा बंद झाला अन्..; 4 वर्षाच्या चिमुकल्याचं आयुष्य संपलं
तृणमूल काँग्रेसला मोठा धक्का! निवडणूक आयोगाने पक्षाचं नाव अन्...
TMC : तृणमूल काँग्रेसला मोठा धक्का! निवडणूक आयोगाने पक्षाचं नाव चिन्हच गोठवलं