Chaitra Navratri 2023 : महाअष्टमीला करा विड्याच्या पानाचा खास उपाय, आर्थिक चणचण होईल दूर

| Updated on: Mar 25, 2023 | 6:00 PM

चैत्र नवरात्रोत्सव सुरु असून सप्तमी आणि अष्टमीचं विशेष असं महत्त्व आहे. या दिवशी पूजन केल्याने इच्छित फळ मिळतं अशी मान्यता आहे. अष्टमीला पानाच्या विड्याचे काही उपाय केल्यास अपेक्षित यश मिळतं.

Chaitra Navratri 2023 : महाअष्टमीला करा विड्याच्या पानाचा खास उपाय, आर्थिक चणचण होईल दूर
चैत्र नवरात्रीतील अष्टमीला देवी दुर्गेला द्या विड्याचा पानाचा मान, पैशांची उणीव भासणार नाही
Image Credit source: फाईल फोटो
Follow us on

मुंबई : चैत्र नवरात्रोत्सव सुरु असून 30 मार्च म्हणजेच रामनवमीला समापन होईल. नवरात्रोत्सवात अष्टमी सर्वात खास मानली जाते. यावेळी जातकांनी काही उपाय केल्यास त्यांना अडचणीतून मार्ग सापडतो. महाअष्टमीला काही उपाय करून समस्यांवर मात करता येईल, असं ज्योतिषशास्त्रात सांगितलं आहे. चैत्र नवरात्रीतील अष्टमीला ग्रहांचा विशेष योगही तयार होत आहे. त्यामुळे या काळात काही तोडगे वापरल्यास फलदायी ठरू शकतात. यावेळी अष्टमी बुधवारी असून विड्याच्या पानाचा तोडगा करू शकता.

बुधवार हा गणपती बाप्पा आणि लाल किताबनुसार देवी दुर्गेला समर्पित दिवस. तसेच बुध ग्रहाचा वार आहे. त्यामुळे ज्या जातकांच्या कुंडलीत बुध ग्रह कमकुवत आहे त्यांनी या दिवशी उपाय केल्यास मानसिक, शारीरिक आणि आर्थिक समस्येतून सुटका होईल.

स्कंद पुराणानुसार देवांनी समुद्र मंथनावेळी विड्याच्या पानाचा उपाय केला होता. यामुळेच पुजनात विड्याचं पानाचं महत्त्व आहे. हिंदु धर्म मान्यतेनुसार शुभ कार्यापूर्वी पुजापाठात विड्याची पानाद्वारे देवांचं आव्हान केलं जातं. धार्मिक मान्यतेनुसार विड्याचं पान पवित्र मानलं जातं.

महाअष्टमीला विड्याचे पानाचे तोडगे

  • चैत्र अष्टमीच्या दिवशी विड्याच्या पानावर गुलाबच्या पाकल्या टाका आणि देवी दुर्गेला अर्पण करा. यामुळे आर्थिक अडचण दूर होते आणि धनप्राप्तीचा योग जुळून येतो.
  • चैत्र अष्टमीला देवीला विड्याच्या पानावर वेलची आणि लवंग ठेवून अर्पण करा. यामुळे प्रत्येक प्रकारच्या कर्जातून मुक्ती मिळते.
  • नवरात्रीत विड्याच्या पानाला दोन्ही बाजूने मोहरीचं तेल लावून देवी दुर्गेला अर्पण करा. त्यानंतर रात्री हे पान उशाखाली ठेवून झोपा. सकाळी स्नान वगैरे झाल्यानंतर पान दुर्गा देवीच्या मंदिरात ठेवून या. यामुळे नोकरीत अपेक्षित यश मिळतं.
  • वैवाहित समस्या दूर करण्यासाठी नवरात्रीत मंगळवारी किंवा शनिवारी पानाच्या पुढच्या बाजूला सिंदुरने जय श्रीराम लिहा आणि हनुमानाच्या मंदिरात जाऊन हातावर ठेवा.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)