
आर्य चाणक्य हे एक कुटनीती तज्ज्ञ होते, त्यामुळे त्यांनी आपल्या चाणक्य नीती नावाच्या ग्रंथामध्ये राज्यकारभारासंदर्भात अनेक महत्त्वाच्या गोष्टी सांगून ठेवल्या आहेत, जसं की मित्र कसा ओळखायचा? आपला शत्रू कोण असू शकतो? राजाची कर्तव्य काय आहेत? समाजात वावरताना आपला व्यवहार कसा असला पाहिजे? अशा एक ना अनेक गोष्टी चाणक्य यांनी आपल्या या ग्रंथामध्ये सांगितल्या आहेत, मात्र चाणक्य हे केवळ कुटनीती तज्ज्ञच नव्हते तर ते एक अर्थतज्ज्ञ देखील होते. त्यामुळे आयुष्यात पैसा किती महत्त्वचा आहे? आणि त्याची बचत कशी केली पाहिजे, याबद्दल चाणक्य यांनी अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. चाणक्य म्हणतात अशी तीन घरं असतात ज्या घरांवर सतत लक्ष्मी मातेची कृपा असते, अशा घरात कधीच पैशांची कमी भासत नाही, चला तर मग जाणून घेऊयात चाणक्य यांनी नेमकं काय म्हटलं आहे? त्याबद्दल.
गुणवान लोकांचा सन्मान – चाणक्य म्हणतात ज्या घरात नेहमी विद्वानांचा आदर केला जातो, त्या घरावर सदैव लक्ष्मी मातेची कृपा राहते, कारण जे लोक विद्वान असतात, गुणवान असतात. त्यांच्याकडून नेहमी कोणती न कोणती गोष्ट आपल्याला शिकायला मिळत असते, त्यामुळे आपली प्रगती होते.
भांडणं आणि वादापासून दूर – चाणक्य म्हणतात ज्या घरात नेहमी शांतता असते, घरात कधीही भांडणं होत नाहीत, कुटुंबातील सर्व सदस्य एकमेकांसोबत प्रेमानं राहतात त्या घरात कधीही पैशांची कमी नसते, अशा घरावर लक्ष्मी मातेचा सदैव आशीर्वाद असतो.
अन्नाचा सन्मान – चाणक्य म्हणतात अशी अनेक घर असतात जिथे अन्नाची प्रचंड प्रमाणात नासाडी केली जाते, गरज नसताना किंवा भूक नसताना देखील जास्तीच जेवण बनवलं जातं, त्यानंतर ते अन्न वाया जातं. ज्या घरात अन्न वाया जातं त्या घरात कधीही बरकत नसते, त्यामुळे अन्नाचा सन्मान केला पाहिजे, ज्या घरात अन्नाचा सन्मान केला जातो, त्या घरावर सदैव लक्ष्मी मातेची कृपा राहते.
( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेले आहेत. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही. तसेच आमचा अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)