Chanakya Neeti : जगातील सर्वात शक्तिमान गोष्ट कोणती? तुम्ही विचारही करू शकणार नाही, चाणक्य काय सांगतात?
चाणक्य हे एक भारतामधील महान विद्वान विचारवंत होते, त्यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला, या ग्रथांमध्ये ते शब्दाची ताकद समजून सांगताना म्हणतात की या जगात जर सर्वात काही शक्तिमान असेल तर ते म्हणजे तुमचे शब्द, त्यामुळे तुम्ही जेव्हा बोलता, तेव्हा नेहमी जपून बोललं पाहिजे, जाणून घेऊयात चाणक्य यांनी नेमकं काय म्हटलं आहे? त्याबद्दल.

चाणक्य हे एक महान कुटनीती तज्ज्ञ होते, तसेच ते अर्थतज्ज्ञ आणि विचारवंत देखील होते. त्यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला, या ग्रंथामध्ये त्यांनी माणसानं कसं वागावं? आणि कसं वागू नये याबद्दल अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. चाणक्य यांनी आपल्या या ग्रंथामध्ये मानवी जीवनाच्या जवळपास सर्वच पैलूंवर लिखाण केलं आहे. चाणक्य आपल्या या ग्रंथामध्ये सल्ला देताना म्हणतात की माणसानं नेहमी जपून बोललं पाहिजे, कारण या जगात शब्दा इतकं दुसरी कोणतीही शक्तिमान गोष्ट असूच शकत नाही. तुम्ही कसं बोलता? यावर तुम्ही कोण आहेत हे ठरतं. तुम्ही एखाद्या मानसावर हल्ला केला त्याला हाणमार केली तर ती जखम काळाच्या ओघात कधी न कधी भरून निघते, मात्र तुम्ही जर एखाद्याचा अपमान केला, तर तो व्यक्ती आपला अपमान आयुष्यभर विसरत नाही, शब्दामुळे झालेली जखम कधीच भरून निघत नाही.
समाज अशाच व्यक्तीचा आदर करतो
चाणक्य म्हणतात आपल्या शब्दात जेवढी ताकद आहेत, तेवढी ताकद कोणत्याही गोष्टीमध्ये नाही. त्यामुळे शब्द हे नेहमी जपून वापरले पाहिजे, एखाद्याचं मन आपल्या शब्दामुळे दुखवणार नाही, याची काळजी घेतली पाहिजे, कारण अनेकदा आपल्या बोलण्यामुळेच आपले अनेक शत्रू तयार होतात. त्यामुळे नेहमी आपलं आपल्या जीभेवर नियंत्रण पाहिजे. ज्या व्यक्तीचं त्याच्या जीभेवर नियंत्रण आहे, अशा व्यक्तीचा समाजात कायम सन्मान होतो. कारण असा व्यक्ती कोणाविरोधातही कधीच कटू बोलत नाही.
दिलेला शब्दा पाळा
चाणक्य म्हणतात जर तुम्ही एखाद्या व्यक्तीला शब्द दिला आहे, तर तुम्ही तुमच्या वचनावर ठाम रहा, तरच समाजामध्ये तुमच्या शब्दाला किंमत प्राप्त होईल, समाज तुम्हाला मान सन्मान देईल. कोणालाही शब्द देण्यापूर्वी आधी हजार वेळा त्यावर विचार करा, आणि नंतरच त्यावर बोला, असा सल्लाही चाणक्य देतात. चाणक्य म्हणतात जो व्यक्ती दिलेल्या शब्दावर ठाम रहात, त्याचा समाज नेहमीच आदर करतो.
(डिस्क्लेमर: वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)
